Life Hacks: या ट्रीकचा वापर करा, स्वयंपाक गॅस सिलेंडर चालेल दुप्पट..

0

Life Hacks: महागाई (inflation) बरोबरच इंधनाच्या (fuel price hike) किंमती देखील गगनाला भिडल्या असल्यामुळे आता सर्वसामान्यांच्या जीवनात याचा खूप मोठा परिणाम झाला आहे. एकीकडे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असताना दुसरीकडे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. इंधनाचे दर देखील दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने आता सर्वसामान्याच्या खर्चात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मात्र काही गोष्टींची विशेष काळजी घेऊन तुम्ही खर्चाची बचत करू शकता.

गेल्या काही वर्षात गॅसच्या किंमती तब्बल दुप्पट झाल्याचे पाहायला मिळते. गॅस ही एक अशी वस्तू आहे, ज्याचा वापर तुम्हाला नियमित करावाच लागतो. साहजिकच यामुळे तुमच्या अपेक्षेपेक्षा गॅस लवकर संपल्याचा अनुभव तुम्हाला वेळोवेळी येतो. जर तुम्हाला देखील वाटत असेल आपल्या स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडर आणखी काही दिवस चालवा, तर ही बातमी तुमच्याचसाठीच आहे. जाणून घेऊया सविस्तर.

गॅसच्या किंमती तब्बल दुप्पट झाल्यामुळे आता जेवण देखील प्रचंड महाग झालं आहे. गॅस दरवाढीचा परिणाम थेट गृहिणीचा बजेटवर झाला आहे. आपलं बजेट कोलमडू नये म्हणून गृहिणी देखील नेहमी काळजी घेत असते. जर तुम्ही गॅस सिलेंडर संबंधित काही गोष्टींची काळजी घेतली, तर तुमचा सिलेंडर आणखी काही दिवस चालू शकतो. स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडर जास्त दिवस चालण्यासाठी तुम्ही भांडी धुतल्यानंतर, पूर्णपणे सुकू द्यायची आहेत. भांडी धुतल्यानंतर लगेच तुम्ही गॅसवर ठेवत असाल, तर भांड्यामधील पाणी पूर्णपणे सुकेपर्यंत गॅस वाया जातो.

स्वयंपाक करत असताना अनेक गृहिणींना विचित्र सवय असते, गॅस पेटवून लगेच भांडे ठेवतात. आणि नंतर भाज्या, कांदा इत्यादी वस्तू कापतात. साहजिकच या वेळात गॅस सुरू राहिल्यामुळे, मोठ्या प्रमाणात वाया जातो. स्वयंपाक करत असताना स्वयंपाकाची सर्व तयारी झाल्यानंतरच, तुम्ही गॅस पेटवणं आवश्यक असतं. तरच तुमच्या गॅसची बचत होणार आहे. हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला गॅस लवकर संपत असल्याचा अनुभव येत असेल, तर तुम्ही गॅसची गळती तर होत नाही ना? याची खात्री करा. तीन-चार महिन्यानंतर गॅस सिलेंडरच्या पाईप मधून गॅस गळती होण्याची अधिक शक्यता असते. साहजिकच यामुळे तुमच्या अपेक्षेपेक्षा गॅस लवकर संपतो. आणि म्हणून चार महिन्यानंतर तुम्ही गॅस सिलेंडरची पाईप बदलणं आवश्यक असतं.

अनेक गृहिणींना स्वयंपाक करताना कढई किंवा पातेल्यावर कोणतंही भांडण न ठेवता स्वयंपाक करण्याची सवय असते. अन्न शिजवताना तुम्ही नेहमी भांड्यावर झाकण ठेवणं आवश्यक असतं. भांड्यावर झाकण ठेवल्याने अन्न लवकर शिजल्या जाते. आणि अर्थातच गॅसची मोठ्या प्रमाणात बचत होते. सोबतच अन्न नेहमी माध्यम आचेवरच शिजवणे आवश्यक असते.

हे देखील वाचा Job: या उमेदवारांसाठी दूरसंचार विभागात नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या लगेच..

IND vs AUS: स्मिथ-वॉर्नर प्रमाणे जडेजानेही केली चेंडू सोबत छेडछाड; व्हिडिओ समोर आल्याने उडाली खळबळ..

Chanakya Niti: ..म्हणून विवाहित पुरूष दुसऱ्यांच्या बायकांकडे होतात आकर्षित; चाणक्यांनी सांगितलेली चार कारणे जाणून बसेल धक्का..

Relationship Tips: लग्नानंतर पार्टनर सोबत असं केलं तरच प्रेम आणि सन्मान वाढतो..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.