MSRTC Recruitment 2023: ST महामंडळात या उमेदवारांसाठी तब्बल इतक्या पदांची मेगा भरती; लगेच करा अर्ज..

0

MSRTC Recruitment 2023: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत आता मोठी भरती केली जाणार असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत धुळे या ठिकाणी तब्बल 110 रिक्त जागा भरण्यात येणार असून, या संदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे. जाणून घेऊया या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर.

पदानुसार रिक्त जागा आणि शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत धुळे या ठिकाणी 110 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. कोणत्या पदासाठी किती जागा भरण्यात येणार आहेत? त्याचबरोबर उमेदवारांची पदानुसार शैक्षणिक पात्रता काय निश्चित करण्यात आली आहे? याविषयी जाणून घेऊया सविस्तर. ”मोटार मेकॅनिक” या पदासाठी एकूण 39 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता दहावी पास त्याचबरोबरच आय.टी.आय. मोटार मेकॅनिक व्हेईकल इत्यादी पात्रता ठेवण्यात आली आहे.

इलेक्ट्रीशियन या पदासाठी एकूण 10 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच आय.टी.आय. इलेक्ट्रीशियन कोर्स देखील केलेला असणे आवश्यक आहे. डिझेल मेकॅनिक या पदासाठी एकूण 20 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण त्याचबरोबर आय.टी.आय. डिझेल मेकॅनिकचा केलेला असणे आवश्यक आहे. मोटार व्हेईकल बॉडी फिटर या पदासाठी एकूण 24 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच आय.टी.आय. शिटमेटल कोर्स पास असणे देखील आवश्यक आहे.

वेल्डर या पदासाठी एकूण 6 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण ठेवण्यात आली आहे. सोबतच वेल्डींग या ट्रेडमध्ये आय.टी.आय. उत्तीर्ण असणे देखील आवश्यक आहे. पेन्टर या पदासाठी एकूण 06 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण ठेवण्यात आली आहे. सोबतच या ट्रेड मधील आय.टी.आय देखील उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ‘टर्नर‘ या पदासाठी एकूण 02 रीक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी पास सोबतच टर्नर कोर्स या ट्रेड मधील आय.टी.आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अकौन्टसी अँड ऑडीटींग’ या पदासाठी एकूण 39 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मात्र १०२ व्होकेशनल व्यवसायातील अकौन्टसी आणि ऑडीटींग एम-१ एम-२ एम-३ इत्यादी कोड नंबर असलेले विषय अभ्यासक्रमात असणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी/बी.ई. या पदासाठी एकूण 39 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता अभियांत्रिकी या शाखेतील ऑटो/मोबाईल ही पदवी संपादन केलेली असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा जाणून घ्यायची झाल्यास 20 फेब्रुवारी 2023 रोजी उमेदवारांचे वय 16 ते 33 या दरम्यान असणे आवश्यक आहे. सरकारी नियमानुसार वयामध्ये सूट दिली जाणार आहे. एससी आणि एसटी उमेदवारांसाठी पाच वर्षाची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे. तर ओबीसी उमेदवारांना तीन वर्षाची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे.

परीक्षा फी आणि अर्ज पद्धत

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत होणाऱ्या ११० रिक्त जागांसाठी उमेदवारांना 500 रुपये परीक्षा फी आकारली जाणार आहे. मात्र एससी आणि एसटी उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना धुळे विभागात नोकरी करावी लागणार आहे. उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून, अर्ज करण्याचा पत्ता खालील प्रमाणे: विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे. जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा. जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा.

हे देखील वाचा Job: या उमेदवारांसाठी दूरसंचार विभागात नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या लगेच..

Income Tax Recruitment 2023: आयकर विभागात या उमेदवारांसाठी मोठी भरती; जाणून घ्या डिटेल्स..

Chanakya Niti: ..म्हणून विवाहित पुरूष दुसऱ्यांच्या बायकांकडे होतात आकर्षित; चाणक्यांनी सांगितलेली चार कारणे जाणून बसेल धक्का..

Hug Day: मित्र आणि जोडीदाराला मारलेल्या मिठीतला हा फरक माहीत असायलाच हवा अन्यथा गमवाल..

IND vs AUS: स्मिथ-वॉर्नर प्रमाणे जडेजानेही केली चेंडू सोबत छेडछाड; व्हिडिओ समोर आल्याने उडाली खळबळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.