Income Tax Recruitment 2023: आयकर विभागात या उमेदवारांसाठी मोठी भरती; जाणून घ्या डिटेल्स..

0

Income Tax Recruitment 2023: दहावी आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी आयकर विभागात मोठी भरती निघाली असून, यासंदर्भात अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 24 मार्च 2023 पर्यंत नोकरीसाठी अर्ज करू शकतात. आयकर विभागात एकूण 71 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. जाणून घेऊया पदानुसार रिक्त जागांचा तपशील.

आयकर विभागात भरण्यात येणाऱ्या 71 रिक्त जागांची विविध विभागामध्ये विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये ‘आयकर निरीक्षक’ या पदासाठी एकूण दहा रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ‘कर सहाय्यक’ या पदासाठी 30 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘मल्टी-टास्किंग स्टाफ’ या पदासाठी एकूण 29 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

पदानुसार उमेदवारांची पात्रता

‘आयकर निरीक्षक’ या पदासाठी एकूण दहा रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांची पात्रता पदवीधर ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर उमेदवारांना क्रीडा संबंधित पात्रता देखील निश्चित करण्यात आली आहे. ‘कर सहाय्यक’ या पदासाठी भरण्यात येणाऱ्या एकूण 32 जागांसाठी उमेदवारांची पात्रता पदवीधर आणि संबंधित क्रीडा पात्रता ठेवण्यात आली आहे. ‘मल्टी-टास्किंग स्टाफ’ पदासाठी एकूण 29 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण मंडळातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच संबंधित क्रीडा पात्रता देखील आवश्यक आहे.

वयोमर्यादा 

आयकर विभागात केल्या जाणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांच्या वयोमर्यादेचा विचार करायचा झाल्यास, उमेदवाराचे वय एक जानेवारी 2023 पर्यंत ‘आयकर निरीक्षक’ या पदासाठी 30 वर्ष असणे आवश्यक आहे. ‘कर सहाय्यक’ या पदासाठी 18 ते 27 या दरम्यान असणे आवश्यक आहे. ‘मल्टी-टास्किंग स्टाफ’ या पदासाठी उमेदवारांचे वय 18 ते 25 दरम्यान असणे आवश्यक आहे. सरकारी नियमानुसार कॅटेगरी नुसार उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाणार आहे.

शुल्क आणि मासिक पगार

आयकर विभागात अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 100 रुपये फी आकारली जाणार आहे. मात्र SC त्याचबरोबर ST तसेच महिला आणि माजी सैनिक/PWBD या उमेदवारांना मात्र कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. आयकर विभागात निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना दरमहा 44900 ते 142400 पर्यंत पगार दिला जाणार आहे. कर सहाय्यक या पदासाठी 25500 ते 81100 दरमहा पगार दिला जाणार आहे. मल्टी-टास्किंग स्टाफ या पदासाठी 18000 ते 56900 दरमहा पगार दिला जाणार आहे.

अर्ज पद्धत

आयकर विभागात नोकरी करण्यासाठी पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. जाणून घेऊया अर्ज पाठविण्याचा पत्ता. आयकर आयुक्त (प्रशासन आणि TPS), प्रधान मुख्य आयकर आयुक्त, कर्नाटक आणि गोवा क्षेत्र, केंद्रीय महसूल इमारत, क्रमांक 1, क्वीन्स रोड, बेंगळुरू, कर्नाटक – 560001 अधिकृत संकेतस्थळ https://incometaxbengaluru.org/

हे देखील वाचा Chanakya Niti: ..म्हणून विवाहित पुरूष दुसऱ्यांच्या बायकांकडे होतात आकर्षित; चाणक्यांनी सांगितलेली चार कारणे जाणून बसेल धक्का..

Job: या उमेदवारांसाठी दूरसंचार विभागात नोकरीची मोठी संधी; जाणून घ्या लगेच..

Kiara Advani: कियारा अडवाणीही आलिया प्रमाणे लग्नापूर्वीच प्रेग्नेंट; व्हिडिओ आला समोर..

Workout Tips: रिकाम्या पोटी वर्कआऊट करत असाल तर त्वरित थांबवा; जाणून घ्या व्यायामाची योग्य वेळ..

Life Hacks: या ट्रीकचा वापर करा, स्वयंपाक गॅस सिलेंडर चालेल दुप्पट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.