Relationship Tips: या प्रकारच्या पुरुषांवर महिला टाकतात जीव ओवाळून; नातेसंबंध जोडण्यास असतात कायम तयार..

0

Relationship Tips: पुरूषाला स्त्री आवडत,  हे जितके सामान्य आहे. तसेच स्त्रीला पुरूष आवडणे ही देखील सामान्य बाब आहे. एकविसाव्या शतकातील स्त्रिया यावर निर्भिडपणे बोलताना दिसतात. आपली मते उघडपणे मांडतात. मात्र असे असले तरी समुद्राची खोली मोजणे जितके कठीण असते, तसचे स्त्रीचे मन ओळखणे देखील कठीण आहे. म्हणूनच स्त्रियांना नेमके काय हवे असते? कोणत्या गोष्टी त्यांना आत्मिक आनंद देणाऱ्या असतात? या गोष्टींचे गुढ उकलण्याचा पुरूष नेहमीच प्रयत्न करत असतात. (Women intrest men)

पुरूषांना नेहमी एक प्रश्न पडत असतो, स्त्रियांना नेमके कोणत्या प्रकारचे पुरूष आवडतात. किंवा पुरुषांमध्ये त्यांना नेमके काय हवे असते? अशी कुजबूज पुरुषांमध्ये हल्ली पाहायला मिळते. याचबरोबर रिलेशनशिपमध्ये रस असणारेही याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. या विषयावर आतापर्यंत अनेक संशोधने समोर आली आहेत. हाच प्रश्न  कदाचित तुमच्याही मनात घोळत असेल, तर याचे उत्तर तुम्हाला या लेखात मिळणार आहे. याचे उत्तर ऐकून तुम्ही देखील आश्चर्यचकीत व्हाल. चला तर मग जाणून घेऊया महिलांना नेमके कसे पुरूष आवडतात?

हेलन ई-फिशर ही नावाजलेली लेखीका आहे. हेलन यांच्या पुस्तकांना जगात मोठी मागणी आहे. ती रुटर विद्यापीठात मानव वंशशास्त्रज्ञ देखील आहे. त्यांनी त्यांच्या संशोधनाच्या आधारे म्हटले आहे, स्त्रिया अभिव्यक्तीच्या जोरावर नात्यात पुढे जातात. जे पुरूष त्यांच्यावर दबाव आणतात अशा पुरुषांपासून महिला दूर राहणे पसंत करतात. तसेच त्यांच्यावर जोर जबरदस्ती करणारे पुरूष देखील त्यांना आवडत नाहीत. असेही त्या म्हणाल्या. याचा सरळ अर्थ असा आहे, स्त्रियांना असे पुरुष आवडतात, जे त्यांना समजून घेतात आणि त्यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकतात.

स्त्रिया आता पूर्वीपेक्षा वैचारिकदृष्ट्या अधिक ब्रॉड आणि बोल्ड झालेल्या आहेत. आणि हे बदलत्या काळाला अनुसरून आहे. महिला जशा शिक्षणात पूढे गेल्या, मोठमोठ्या पदावर कार्यरत झाल्या, तशा त्या उघडपणे व्यक्त देखील व्हायला लागल्यात. आजची स्त्री ही स्वावलंबी आहे. कित्येक घरात नवऱ्यापेक्षा बायकोचा पगार अधिक आहे. आणि याचा आदर राखणारे पुरूषही समाजात आहेत. म्हणूनच स्त्रियांना आता पुरुषांचा पैसा, बंगला, कार ही साधनं आकर्षित करू शकत नाहीत. तो पुरूष किती समजदार आहे, समोरच्याचा तो किती आदर राखतो, हे स्त्रियांच्या दृष्टीने महत्वाचे आहे. महिलांना पुरुषांचे व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षित करते.

3,770 महिलांवर आधारित 2010 च्या अभ्यासात असे दिसून आले, महिलांना त्यांच्या वयापेक्षा मोठे पुरुष आवडतात. या बरोबरच महिलांचा आदर करणारे पुरुष महिलांना अधिक आवडतात. स्त्रियांना पुरूषांची दाढी देखील आकर्षित करत असते. न्यू साउथ वेल्स विद्यापीठाच्या 2013 च्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. न्यू साउथ वेल्स विद्यापीठाच्या अभ्यासात असे दिसून आले, बहुतेक महिलांना स्वच्छ चेहरा, हलकी दाढी, जाड दाढी किंवा पूर्ण दाढी असलेले पुरुष इतर सामान्य पुरुषांच्या तुलनेत अधिक आवडतात.

एका सर्वेनुसार महिलांना हलकी दाढी असलेले पुरुष आवडतात. दयाळू, सौम्य स्वभाव, पुरुषांमधील काळजी घेण्याची वृत्ती, सेन्स ऑफ ह्युमर असणारे पुरुष देखील स्त्रियांना सर्वाधिक आवडतात. डोळ्यात डोळे घालून संवाद साधणारे पुरुष देखील महिलांना सर्वाधिक आकर्षित करतात. नजरेला नजर भिडवून बोलणाऱ्या पुरुषांमध्ये महिलांना अधिक आत्मविश्वास जाणवतो.

हे देखील वाचाBeer Benefits: बिअर पिण्याचे शरीरावर होणारे परिणाम जाणून जाल चक्रावून..

Relationship Tips: फॅमिली प्लॅनिंग करताना या गोष्टीची घ्या काळजी अन्यथा क्षणात व्हाल उध्वस्त..

Chanakya Niti: ..म्हणून विवाहित पुरूष दुसऱ्यांच्या बायकांकडे होतात आकर्षित; चाणक्यांनी सांगितलेली चार कारणे जाणून बसेल धक्का..

IND vs AUS: अखेर दुसऱ्या कसोटी सामन्यात केएल राहुलचा पत्ता होणार कट..

Relationship Advice: बायको रागावली? झटक्यात राग दूर करण्यासाठी फॉलो करा या टिप्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.