Relationship Tips: फॅमिली प्लॅनिंग करताना या गोष्टीची घ्या काळजी अन्यथा क्षणात व्हाल उध्वस्त..

0

Relationship Tips: वयाच्या ३०-३२ वर्षांनंतर आयुष्याचा एक नवा टप्पा सुरू होतो. लग्न, अपत्य, त्यांचं शिक्षण, आरोग्याच्या अडचणी या सगळ्या गोष्टी त्यात येतात. त्यामुळे आपल्याला आर्थिक नियोजन करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्या आधी आपल्या पगारावर फक्त आपल्या स्वतः चा खर्च असतो. त्यामुळे शॉपिंग, हॉटेलिंग, मित्रांसोबत पार्ट्या या सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये असतात. मात्र लग्नानंतर फॅमिली प्लॅनिंग करताना आपल्याला मुलांच्या भविष्याचा विचार करून त्यानुसार प्लानिंग करायचं असतं. लग्न झाल्यावर आपल्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी येते ती म्हणजे, आपल्या मुलांची.

सद्याच्या काळात अपत्य जन्माला घालणे मोठं खर्चिक झाले आहे. प्रेग्नेंसीच्या अगदी पहिल्या महिन्यापासून हॉस्पिटलचा खर्च चालू होतो. त्यामुळे आपल्याला आर्थिक नियोजन करणे फार गरजेचे आहे. त्यामुळे लग्न झाल्यावर वडील होण्याआधी आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. साहजिकच साहजिकच पिता होना पुरी तुम्ही काही गोष्टींकडे काळजीपूर्व पाहणे आवश्यक आहे. जाणून घेऊया या संदर्भात सविस्तर.

लग्नानंतर फॅमिली प्लॅनींग लगेच नको

लग्न झाल्यानंतर लगेच फॅमिली प्लॅनिंग केलं तर आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे जेव्हा वडील होण्याचा विचार करत असाल, तेव्हा तुम्ही आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत का ? हे पाहिले पाहिजे. लग्न झाल्यावर २-३ वर्षांनी फॅमिली प्लॅनींग केल तर ते आर्थिक दृष्ट्या फायद्याचे राहील. त्या तीन वर्षात तुम्हाला सेविंग करण्यासाठी वेळ मिळतो. कारण हॉस्पिटल इमर्जन्सी कधी येईल, ते सांगता येत नाही. त्यामुळे लग्नानंतर फॅमिली प्लॅनींग लगेच करू नका.

बचत

वडील होण्याआधी दोन-तीन वर्ष तुम्ही सेविंग करायला सुरुवात करायला हवी. यामुळे अचानक संकट आले तरी देखील पैशाची उणीव भासणार नाही. त्यामुळे वडील होण्याचा विचार करत असाल, तर बचत करायला सुरुवात करणे फार आवश्यक आहे. अनावश्यक गोष्टीवर खर्च करणे टाळा, बाहेर जेवण करणे किंवा पार्सल आणणे कमी करा, प्रत्येक विकेंडला फिरायला जाणे टाळा. मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. सेव्हिंग्स अकाऊंटचा वापर दर महिन्याच्या खर्चासाठी करू नका. बचत खातं स्वतंत्र असूद्या, आणि खर्च वेगळ्या खात्यातून करा.

जीवन विमा म्हणजे, टर्म इन्शुरन्स पॉलिसी या गोष्टीकडे देखील तुम्ही गांभीर्याने पाहिले पाहिजे. आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या १५ टक्के इतकी रक्कम असलेली टर्म पॉलिसी घेण्यास हरकत नाही. सोबतच सुरुवातीस तीन लाखांचे कवच असणारी आरोग्य विमा पॉलिसी घ्यावी. याचा आपल्याला खूप फायदा होतो. काळजीपूर्वक आणि योग्य पद्धतीने केलेले आर्थिक नियोजन उज्वल भविष्याचा पाया असतो.

निर्णय स्वतः घ्या- तुम्ही गुंतवणूक करताना सहकारी, नातेवाईकांचे अनुकरण करू नका. त्यांच्या आणि तुमच्या आर्थिक परिस्थितीत आणि गरजांमध्ये फरक असू शकतो. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करताना स्वतःचे बजेट पाहून गुंतवणूक करा. अवास्तव परतावा, तसेच फसव्या किंवा बेकायदेशीर योजनांपासून चार हात दूर राहा. तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊनच गुंतवणूक करा.

कर्जाची परतफेड- तुम्ही जर कोणाकडून कर्ज घेतले असेल, तर कर्जाची परतफेड लवकर करा. कारण तुम्हाला क्रेडिट कार्ड किंवा बँकेच्या कर्जावर दरमहा ईएमआय भरावा लागतो. अशा पद्धतीने तुम्ही कर्ज भरले तर तुम्ही गुंतवणूक करू शकणार नाही. त्यामुळेच शक्य तितक्या लवकर कर्जाची परतफेड करा. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे कोणाचे कर्ज नसावे याची काळजी घ्या. अशा पद्धतीने आपण वडील होण्यासाठी पैशांचं नियोजन केलं, तर तुम्हाला प्रसूतीच्या वेळी किंवा नंतरही जास्त पळापळ करावी लागणार नाही.

हे देखील वाचा Relationship Advice: बायको रागावली? झटक्यात राग दूर करण्यासाठी फॉलो करा या टिप्स..

IND vs AUS: अखेर दुसऱ्या कसोटी सामन्यात केएल राहुलचा पत्ता होणार कट..

Chetan Sharma: विराट कोहली खोटारडा, हे खेळाडू घेतात तसले इंजेक्शन; चेतन शर्माच्या विधानाने BCCI मध्ये भूकंप, पाहा व्हिडिओ..

पोटनिवडणूक: टिळकांच्या मरणाची गिधाडाप्रमाणे वाट पाहणाऱ्याला तिकीट देताना लाज वाटली नाही? शैलेश टिळकांचा फडणवीसांवर हल्लाबोल..

Hardik Pandya Wedding: ..म्हणून पांड्याने घेतला अचानक दुसऱ्यांदा लग्न करण्याचा निर्णय; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.