Chetan Sharma: विराट कोहली खोटारडा, हे खेळाडू घेतात तसले इंजेक्शन; चेतन शर्माच्या विधानाने BCCI मध्ये भूकंप, पाहा व्हिडिओ..
Chetan Sharma: निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशनने भारतीय क्रिकेटमध्ये मोठा भूकंप झाला आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड देखील आता चिंतेत असून चेतन शर्मा यांच्यावर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनने चेतन शर्मा यांनी अनेक मोठे खुलासे केल्याने भारतीय क्रिकेट आणि बीसीसीआय अडचणीत सापडली आहे. एवढेच नाही तर अनेक खेळाडूंविषयी केलेल्या गौप्यस्फोटमुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. (Chetan Sharma Sting operation)
काल झी मीडिया या वाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी अनेक वादग्रस्त खुलासे केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यामध्ये (Virat Kohli sourav ganguly) झालेल्या मतभेदाविषयी देखील भाष्य केले आहे. एवढेच नाही तर भारतीय खेळाडू फिट नसताना देखील इंजेक्शन घेऊन मैदानात उतरत असल्याचा देखील दावा केला आहे. विशेष म्हणजे भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराचे नाव घेऊन हा दावा केला असल्याने आता मोठा वाद निर्माण झाला आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत सुमार कामगिरी राहिल्यानंतर निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांची हकलपट्टी करण्यात आली होती. मात्र पुन्हा त्यांची निवड करण्यात आली. परंतु आता पुन्हा एकदा चेतन शर्मा स्टिंग ऑपरेशनमुळे चर्चेत आले असून, BCCI त्यांची हकलपट्टी देखील करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय संघाचा प्रमुख खेळाडूंवर चेतन शर्माने केलेल्या आरोपामुळे चेतन शर्मा यांची हकालपट्टी करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.
विराटला ठरवलं खोटं
विराट कोहलीने टी20 संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यानंतर एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदावरून देखील विराट कोहलीची हकालपट्टी करण्यात आली. व्हाईट-बॉल क्रिकेट प्रकारात दोन वेगवेगळे कर्णधार निवडीवर आम्ही अनुकूल नसल्यामुळे एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदावरून विराट कोहलीला काढून टाकण्यात आले. राजीनामा देण्यापूर्वी विचार करा असा सल्ला मी विराट कोहलीला दिला होता. असं देखील सौरव गांगुली त्यावेळी म्हणाला होता. मात्र विराट कोहलीने पत्रकार परिषदेत टी-ट्वेंटी विश्वचषकानंतर मी टी-ट्वेंटी कर्णधार पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे, आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. असं सांगण्यात आलं होतं.
आता हा वाद पुन्हा एकदा चेतन शर्मा यांनी उकरून काढला आहे. सौरभ गांगुली आणि विराट कोहली या दोघांमध्ये अहंकाराची लढाई होती. असा आरोप चेतन शर्मा यांनी केला आहे. एवढंच नाही, तर विराट कोहली खोटं बोलत असल्याचा अप्रत्यक्ष हवाला देखील चेतन शर्मा यांनी दिला आहे. विराट कोहली राजीनामा देत असताना सौरभ गांगुली तुम्ही राजीनामा देऊ नका, यावर विचार करा असं म्हणाले होते. मात्र विराट कोहलीने ऐकलं नाही. विराट कोहलीने मात्र त्यावेळी मला राजीनामा देताना विचार करा, असं अजिबात सांगण्यात आलं नव्हतं. या उलट तुम्ही घेतलेला निर्णय योग्य असल्याचं म्हटलं होतं. साहजिकच यामुळे आता विराट कोहली खोटं बोलत असल्याचं मत चेतन शर्मा यांच्या दाव्यातून स्पष्ट होत आहे.
The explosive Chetan Sharma Sting which has blown away the entire Indian cricketing fraternity!
Chairman of Selectors spills beans on the Virat Kohli-Sourav Ganguly stir and much more!#ChetanSharmaSting pic.twitter.com/ziLUwbOs1p— OneCricket (@OneCricketApp) February 15, 2023
जसप्रीत बुमरा घेतो इंजेक्शन?
भारतीय संघातील अनेक खेळाडू पूर्णपणे फिट नसताना देखील क्रिकेट खेळण्यासाठी इंजेक्शन घेतात. असा देखील गौप्यस्फोट चेतन शर्मा यांनी केला आहे. विशेष म्हणजे, हा आरोप करताना चेतन शर्मा यांनी जसप्रीत बुमराचे नाव घेतले. याविषयी बोलताना चेतन शर्मा म्हणाले, खेळाडू जे इंजेक्शन घेतात, ते पेन किलरचे इंजेक्शन नसतं. ते दुसरेच इंजेक्शन घेतात. जी डोपिंग चाचणीत ही औषधे सापडत नाहीत.
हे देखील वाचा Hair fall tips: म्हणून गळतात पुरुषाचे केस; त्वरित थांबवा या चुका तरच टक्कल पडण्यापासून वाचाल..
MSRTC Recruitment 2023: ST महामंडळात या उमेदवारांसाठी तब्बल इतक्या पदांची मेगा भरती; लगेच करा अर्ज..
Relationship Tips: लग्नानंतर पार्टनर सोबत असं केलं तरच प्रेम आणि सन्मान वाढतो..
Marriage Tips: ..म्हणून लग्नाआधी लावतात हळद; हळद लावण्याची सहा करणे जाऊन तुम्हालाही बसेल धक्का..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम