पोटनिवडणूक: टिळकांच्या मरणाची गिधाडाप्रमाणे वाट पाहणाऱ्याला तिकीट देताना लाज वाटली नाही? शैलेश टिळकांचा फडणवीसांवर हल्लाबोल..
पोटनिवडणूक: राज्यातील कसबा (kasaba) आणि चिंचवड (Chinchwad) या दोन विधानसभा पोटनिवडणुकीकडे देशाचे लक्ष लागून राहलं आहे. खुद्द देशाचे गृहमंत्री या पोटनिवडणुकीत प्रचारसभा घेणार आहेत. महाविकास आघाडी (mahavikas aaghadi) या दोन्ही पोटनिवडणुका एकत्र लढत असल्याने भाजपसाठी हे मोठं आव्हान मानलं जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक आणि पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला पाच पैकी केवळ एका जागेवर विजय मिळवता आला. आता या दोन्ही पोटनिवडणुकीत देखील भाजपचा कस लागणार आहे. अशातच आता हेमंत रासने यांच्या विषयी मोठा गौप्यस्फोट करण्यात आल्याने भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे.
भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या मृत्यूनंतर कसबा विधानसभा मतदार संघात लागलेल्या पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने (Hemant rasane) यांना उमेदवारी देण्यात आली. सुरुवातीला टिळक कुटुंबात उमेदवारी देण्यात येणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र अचानक टिळक कुटुंबात उमेदवारी न देता हेमंत रासने हे नाव पुढे आले. आणि ब्राह्मण समाजात नाराजीचे सूर देखील उमटले. अशातच आता काँग्रेसचे नेते अरविंद शिंदे यांनी उमेदवार हेमंत रासने यांच्यावर गंभीर आरोप करत अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
भाजपच्या नेत्या मुक्ता टिळक दोन वर्षापासून आजारी होत्या. अनेक विरोधक देखील मुक्ता टिळकांना भेटण्यासाठी जात होते. मात्र काही इच्छुक उमेदवार मुक्ता टिळक यांच्या मरणाची गिधाडासारखी वाट पाहत होते, असा गंभीर आरोप अरविंद शिंदे यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर केला आहे. एवढेच नाही तर अरविंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची देखील लाज काढताना मोठा आरोप केला आहे. मुक्ता टिळक यांनी केलेली विकास कामे रोखण्याचे देखील काम रासने यांनी केल्याच्या आरोप शिंदे यांनी केला.
विशेष म्हणजे, अरविंद शिंदे यांनी हा आरोप करताना फडणवीसांना देखील लक्ष केले. मुक्ता टिळक यांचे पती ‘शैलेश टिळक’ यांनी आमच्या मरणाची वाट पाहणाऱ्या उमेदवारांना तुम्ही उमेदवारी देताना, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. असं स्वतः शैलेश टिळकांनी देवेंद्र फडणवीसांजवळ आपला संताप व्यक्त केला. असा आरोप अरविंद शिंदे केला आहे. अरविंद शिंदे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या एका कोपरा प्रचारसभेत रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारानिम्मित बोलत होते.
काँग्रेस नेते अरविंद शिंदे यांनी केलेल्या आरोपानंतर आता कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांची लोकप्रियता, दांडगा जनसंपर्क यामुळे ही निवडणूक काँग्रेससाठी सोपी मानली जात आहे. त्यातच कुटुंबात उमेदवारी न मिळाल्याने ब्राह्मण समाज देखील नाराज असल्याचे बोलले जात आहे. रवींद्र धंगेकर यांच्यासाठी ही निवडणूक सोपी मानली जात असली तरी भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावली असल्याने या निवडणुकीकडे राज्यासह देशाचे देखील लक्ष लागलं आहे.
हे देखील वाचा Hardik Pandya Wedding: ..म्हणून पांड्याने घेतला अचानक दुसऱ्यांदा लग्न करण्याचा निर्णय; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..
OnePlus Smartphone: OnePlus चा हा स्मार्टफोन Amazon वर मिळतोय तब्बल वीस हजारांनी स्वस्त..
Ration Card: सरकारचा मोठा निर्णय! या 14 जिल्ह्यांना मिळणार रेशन ऐवजी वर्षाला 36 हजार रुपये..
MSRTC Recruitment 2023: ST महामंडळात या उमेदवारांसाठी तब्बल इतक्या पदांची मेगा भरती; लगेच करा अर्ज..
Yuzvendra Chahal: चहल होणार पिता, इतक्या महिन्यांची गरोदर आहे धनश्री; पाहा व्हिडिओ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम