Hardik Pandya Wedding: ..म्हणून पांड्याने घेतला अचानक दुसऱ्यांदा लग्न करण्याचा निर्णय; जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य..

0

Hardik Pandya Wedding: भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहे. हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक (Nataša Stanković) 14 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या लग्नसोहळ्यासाठी हार्दिकने राजस्थान मधील उदयपूर ठिकाणाची निवड केली आहे. उदयपूर हे शहर जगभरात डेस्टिनेशन वेडिंगसाठी प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी हार्दिक आणि नताशा 14 फेब्रुवारी अर्थात ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी विवाहबंधनात अडकणार आहेत. (Hardik Pandya Nataša Stanković weding ceremony)

हार्दिक पांड्याने यापूर्वी 2020 मध्ये नताशासोबत कोर्ट मॅरेज केले होते. मात्र त्यावेळी कोरोनाचा काळ असल्याने लग्नाला घरातील सदस्यच उपस्थित होते. आता हार्दिक पांड्या लग्नाच्या तीन वर्षांनंतर काही मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत लग्न करणार आहे. हार्दिक पांड्या त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक, कुणाल पंड्या आणि इतर कुटुंबीयांसह सोमवारी (13 फेब्रुवारी) सकाळी मुंबई विमानतळावरून निघून उदयपूरच्या दाबोक विमानतळावर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.

लग्नासाठी ठरवली ‘व्हाईट थिम’

हार्दिक-नताशा या दोघांचेही कुटुंबीय मुंबईहून उदयपूरला पोहोचले आहेत. या लग्नकार्यातील कार्यक्रमांना 13 फेब्रुवारीपासूनच सुरुवात झाली आहे. यात मेहंदी व संगीत कार्यक्रम 13 फेब्रुवारी रोजी पार पडला. 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लग्नकार्यात हार्दिक आणि नताशा पांढऱ्या रंगाचे कपडे घालणार असल्याचे समजले आहे. हार्दिक व नताशा सोबतच उपस्थित पाहुणे मंडळी सुद्धा व्हाईट थिमचे अनुकरण करणार असल्याचे समोर आले आहे. हा संपूर्ण लग्नसोहळा 16 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. विशेष म्हणजे, या समारंभात अनेक क्रिकेटपटू सहभागी होण्याची शक्यता आहे. भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) देखील कार्यक्रमासाठी उदयपूर येथे दाखल झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

..म्हणून घेतला निर्णय

या लग्नात हॉलिवूड स्टार, क्रिकेटर्स, उद्योगपती आणि बॉलिवूडशी संबंधित अनेक सेलिब्रिटी सहभागी होऊ शकतात. हे लग्न तीन दिवस चालणार आहे. हार्दिक पांड्याचे लग्न उदयपूरच्या रामपुरा स्क्वेअरच्या पुढे असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार असल्याची माहिती आहे. लग्नाचे सर्व कार्यक्रम अतिशय खाजगी ठेवण्यात आले आहेत. सर्व तयारीही गोपनीय पद्धतीने पूर्ण करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात कोर्ट मॅरेज करताना कौटुंबिक रितीरिवाजांची पूर्तता होऊ न शकल्याने हार्दिक पांड्या त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचसोबत पूर्ण विधींसह पुनर्विवाह करणार असल्याचे समजले आहे. मात्र अद्याप या लग्न सोहळ्यात कोणकोणते मान्यवर उपस्थित राहणार आहेत? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

गेल्य़ाच आठवड्यात कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनीही राजस्थानमध्ये लग्न केले. त्यामुळेच जगातील सुंदर आणि सर्वोत्तम वेडिंग डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध असलेल्या उदयपूरमध्ये हार्दिक पांड्या पुन्हा एकदा पत्नीसोबत लग्नाचे विधी पूर्ण करणार असल्याचे मानले जात आहे. नुकतेच बॉलिवूडचे लोकप्रिय जोडपे कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये सात फेऱ्या मारल्या. त्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आपल्या मुलीचे लग्न राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील प्रसिद्ध खिवनसार किल्ल्यावर केले. यांच्याशिवायही अनेक हाय प्रोफाईल लग्नसोहळे राजस्तानातील उदयपूर येथे पार पडले आहेत. उदयपूरमधील लग्नसोहळ्यांच्या यादीत आता आणखी एका सोहळ्याची भर पडणार आहे.

हार्दिकचे वादग्रस्त करिअर

दरम्यान, हार्दिक पांड्या त्याच्या कारदकिर्दीच्या सुरुवातीपासूनच अनेक विविध विषयामुळे चर्चेत राहिला आहे. काही वर्षांपूर्वी त्याच्या हातात असणाऱ्या घड्याळामुळे त्याची सर्वत्र चर्चा झाली होती. याशिवाय बॉलिवूड स्टार करण जोहर याचा टॉक शो ‘कॉफि विथ करण’ या कार्यक्रमात पांड्याने केलेल्या विधानामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर टिका करण्यात आली होती. विशेष म्हणजे, या विधानानंतर हार्दिक आणि केएल राहुल यांच्यावर काही काळापूर्ती बंदी घालण्यात आली होती.

त्यानंतर 2018 साली झालेल्या आशिया चषकाच्या एका सामन्यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळी त्याला थेट स्ट्रेचरच्या सहाय्याने मैदानाबाहेर नेण्यात आले होते. त्यानंतर हार्दिकने जोरदार पुनरागमन करत भारताला अनेक सामने जिंकवून दिले. 2022 साली झालेल्या आयपीएल लिलावात हार्दिकला मुंबई इंडियन्स संघाकडून डच्चू देण्यात आला होता. त्यावेळी त्याला गुजरात टायटनसच्या संघाने कर्णधार पदावर विराजमान केले. आणि हार्दिकने पहिल्याच हंगामात संघाला विजेतेपदाचा बहुमान मिळवून दिला. सध्या हार्दिक पंड्या भारताच्या टी20 संघाच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळत आहे.

हे देखील वाचा India Post Recruitment 2023: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पोस्ट विभागात सर्वात मोठी भरती; जाणून घ्या साविस्तर..

Relationship tips: महिलांच्या या पाच अवयवांकडे पुरुष होतात सर्वाधिक आकर्षित; पाचवा आहे खूपच रंजक..

Chanakya niti: कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होण्याचे चाणक्य यांचे हे चार मूलमंत्र माहीत असायलाच हवे..

OnePlus Smartphone: OnePlus चा हा स्मार्टफोन Amazon वर मिळतोय तब्बल वीस हजारांनी स्वस्त..

Kissing Tips: पहिलं kiss चुकलं तर होईल सत्यानाश; जाणून घ्या पहिल्यांदा किस करताना कोणती काळजी घ्यायची..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.