Chanakya niti: कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होण्याचे चाणक्य यांचे हे चार मूलमंत्र माहीत असायलाच हवे..

0

Chanakya niti: आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कोणीतरी वाट दाखवणार देखील हवं असतं. अनेकदा योग्य मार्गदर्शक नसल्यामुळे गुणवत्ता असून देखील आपल्याला गंजत पडावं लागतं. आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल, तर तुम्हाला अनेक महापुरुषांची मूल्य आणि नीती अवलंबावी लागते. आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) यांनी देखील आपल्या चाणक्य नीती (Chanakya Niti) या ग्रंथांमध्ये मानवाच्या कल्याणासाठी अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. जर तुम्ही देखील आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या चार मूलमंत्राचा अवलंब केला, तर जीवनात यशस्वी होऊ शकता.

आचार्य चाणक्य हे मोठे विचारवंत होते. त्यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथांमध्ये पती-पत्नी नातेसंबंध, त्याचबरोबर व्यावसायिक जीवनावर देखील लिहून ठेवलं आहे. समाजात असंख्य जण प्रचंड स्वार्थी असल्याचं आचार्य चाणक्य सांगतात. समाजात तुम्हाला नाव कमवायचे असेल, तर काही नीतीचा अवलंब देखील करणे गरजेचे आहे. पावलोपावली तुम्हाला फसवणारी लोक भेटत असतात. अशा लोकांपासून तुम्हाला दोन हात दूर राहावं लागेल. तरच तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता असं आचार्य चाणक्य सांगतात.

माणुस कितीही यशस्वी असला तरी देखील त्याच्यावर वाईट काळ येऊ शकतो. मानवाला वाईट काळ येण्यापासून नेहमी सावध राहावं लागेल, असं चाणक्य सांगतात. आपल्यावर वाईट काळ यावाअसं कोणालाही वाटत नाही. मात्र त्यासाठी आपण तयार देखील राहणं आवश्यक असतं. याविषयी बोलताना आचार्य चाणक्य सांगतात, मानवामध्ये संयम असणं फार आवश्यक असतं. कितीही आव्हानं आली तरी देखील परिस्थिती तुम्ही मोठ्या धैर्याने हाताळणे आवश्यक असतं. तरच तुम्ही संकटावर सहजरीत्या मात करू शकता.

आचार्य चाणक्य सांगतात, मानवावर संकट कधी आणि कोणती येतील हे कधीही सांगता येत नाही. मात्र प्रत्येक संकट परतून लावण्यासाठी आपण नेहमी तयार राहायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही संयम गमावत नाही, किंवा घाबरून जात नाही, त्यावेळेस तुमची बुद्धी नेहमी प्रकाशमय राहते. आणि संकटाचा सामना करण्यासाठी तुमच्यामध्ये नेहमी हिंमत निर्माण होते. वाईट काळ आल्यानंतर देखील तुम्ही अजिबात घाबरायचे नाही. जर तुम्ही असं केलं तर तुम्ही खूप मोठं संकट आलं तरी देखील त्याचा सामना सहज करू शकता, असं चाणक्य सांगतात.

आचार्य चाणक्य सांगतात, जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल, तर तुम्हाला भविष्याची चिंता करणं आवश्यक असतं. कोणतंही काम हाती घेण्यापूर्वी तुम्ही त्या कामासंदर्भात योजना आखणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही गेला तरी देखील भविष्यासाठी तुम्ही नेहमी तयार असलं पाहिजे, तरच तुमच्यात संकटावर मात कण्याची क्षमता येते, असं आचार्य चाणक्य सांगतात.

हे देखील वाचा India Post Recruitment 2023: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पोस्ट विभागात सर्वात मोठी भरती; जाणून घ्या साविस्तर..

Karthik vajir: लोकशाही असूनही शिक्षक अतिरेक्यासारखं पायदळी तुडवतात, हे सांगणाऱ्या लेकराची परिस्थिति पाहून वाहतील अश्रू; पाहा व्हिडिओ..

Driving Licence: मोठी बातमी! आता ड्रायव्हिंग लायसन्स नसले तरीही पोलीस काहीच करू शकणार नाहीत..

IND vs AUS: T20 नंतर कसोटी संघातूनही केएल राहुलचा पत्ता कट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.