India Post Recruitment 2023: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पोस्ट विभागात सर्वात मोठी भरती; जाणून घ्या साविस्तर..

0

India Post Recruitment 2023: देशातल्या तरुणांना मोठ्या बेरोजगारीतून जावे लागत आहे. उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळण्याची काहीही खात्री नसल्याने, आता अनेकजण दहावी बारावी नंतरच कुठे तरी चार पैशाची नोकरी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. जर तुमची देखील दहावी झाली असेल, आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही खूप मोठी बातमी आहे. कारण भारतीय डाक विभागात खूप मोठी भरती केली जाणार आहे.

भारतीय डाक विभागात 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी तब्बल 40 हजार 889 रुपयांची भरती केली जाणार असून, या संदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छूक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी पर्यंत असणार आहे. अर्ज करण्याची मुदत 27 जानेवारी पासून सुरू झाली आहे. जाणून घेऊया या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर. (India Post Bharti 2023)

भारतीय पोस्ट विभागात केल्या जाणाऱ्या भरतीसाठी 40 हजार 889 जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रात एकूण दोन हजार पाचशे आठ जागांची तरतूद करण्यात आली आहे. चाळीस हजार 889 जागा ह्या शाखा पोस्टमास्टर, सहाय्यक शाखा पोस्टमास्टर, डाक सेवक या पदासाठी भरण्यात येणार आहेत. आता आपण पदानुसार उमेदवारांची शैक्षणिक पात्रता काय ठेवण्यात आली आहे? हे देखील जाणून घेऊ.

या भरतीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता लक्षात घ्यायची झाल्यास, मान्यता प्राप्त शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवारांना संगणकाचे ज्ञान देखील आवश्यक आहे. स्थानिक भाषेचा दहावीपर्यंत अभ्यास केलेला असणे आवश्यक आहे. सोबतच सायकलिंग येणे देखील आवश्यक असल्याचं अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे. आता आपण उमेदवारांचे वय जाणून घेऊ.

वय आणि परीक्षा फी

भारतीय डाक विभागामध्ये केल्या जाणाऱ्या या भरतीसाठी उमेदवारांची वय हे 18ते 40 ठेवण्यात आले आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी सरकारी नियमानुसार वयोमर्यादामध्ये सूट दिली जाणार आहे. यामध्ये एससी आणि एसटी उमेदवारांसाठी पाच तर ओबीसी उमेदवारांना तीन वर्षाची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे. ओपन आणि ओबीसी उमेदवारांना परीक्षा फी 100 रुपये आकारण्यात येणार आहे. तर एससी आणि एसटी तसेच PwD उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड ही गुणवत्ता यादी मार्फत केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना 10वी मध्ये सर्वाधिक गुण असतील अशा उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. भारतीय डाक विभाग गुणांच्या आधारे एक यादी तयार करणार आहे. ही यादी भारतीय डाक विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर पोस्ट करण्यात येणार आहे. या वेबसाईटवर ज्यांची नावे यादीत असणार आहेत. अशा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यात येणार आहे.

पगार किती?

शाखा पोस्टमास्टर या पदासाठी उमेदवारांना 12,000 ते 29,380 इतका पगार मिळणार आहे. सहाय्यक शाखा पोस्टमास्टर या पदासाठी उमेदवारांना 10,000 ते 24,470 रुपये पगार मिळणार आहे. डाक सेवक या पदासाठी उमेदवारांना 10,000 ते 24,470 इतका पगार मिळणार आहे. निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना भारतात कुठेही नोकरी करावी लागणार आहे.

भारतीय डाक विभागात उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईल मधील क्रोम वर जाऊन https://indiapostgdsonline.gov.in/ असं सर्च करायचं आहे. यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर सविस्तर अर्ज करू शकता. यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट अर्ज देखील करू शकता. https://indiapostgdsonline.cept.gov.in/HomePageS/D14.aspx अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी ठेवण्यात आली आहे.

हे देखील वाचा Karthik vajir: लोकशाही असूनही शिक्षक अतिरेक्यासारखं पायदळी तुडवतात, हे सांगणाऱ्या लेकराची परिस्थिति पाहून वाहतील अश्रू; पाहा व्हिडिओ..

Driving Licence: मोठी बातमी! आता ड्रायव्हिंग लायसन्स नसले तरीही पोलीस काहीच करू शकणार नाहीत..

IND vs AUS: T20 नंतर कसोटी संघातूनही केएल राहुलचा पत्ता कट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.