Karthik vajir: लोकशाही असूनही शिक्षक अतिरेक्यासारखं पायदळी तुडवतात, हे सांगणाऱ्या लेकराची परिस्थिति पाहून वाहतील अश्रू; पाहा व्हिडिओ..
Karthik vajir: नुकताच प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अंबलात आणण्यात आले. 26 जानेवारी पासून भारताने लोकशाही मार्गाचा अवलंब केला. आपण पाहतो, 26 जानेवारीला अनेकजण भाषण करतात. खासकरून शाळेत लहान मुलांना नेहमी भाषण करण्याची संधी दिली जाते. असाच एका शाळेतल्या चिमुकल्याने माझे शिक्षक लोकशाही कशी पायदळी तुडवतात हे सांगितलं. चिमुकल्याने केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे.
ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर चिमुकला भाषणासाठी उभा राहिला. आज पासून लोकशाही लागू झाली. या वाक्यापासून त्याने सुरुवात केली. मात्र पुढची तीन चार वाक्य तो असं काही बोलून गेला, ज्यामुळे उपस्थित असणारे श्रोते लोटपोट झाले. यामध्ये शिक्षकांचा देखील सहभाग होता. विद्यार्थी असं काही बोलेल, याचा अंदाज कोणालाही आला नसल्याने शाळेतले सर्व शिक्षक अवाक् झाल्याचे पाहायला मिळाले.
आज पासून लोकशाही लागू झाली, या वाक्याला सुरुवात केल्यानंतर चिमुकला म्हणाला, मला लोकशाही खूप आवडते. लोकशाहीमध्ये तुम्ही काहीही करू शकता. भांडू शकता, खेळू शकता, मैत्री करू शकता. प्रेमाने राहू शकता पण मला तर खूप खेळायची सवय आहे. मी माकडासारखा झाडावर देखील चढतो, खूप धिंगाणा घालतो. मला खोड्या करायला आवडतं. मी घरच्यांचं देखील ऐकत नाही. त्यांना माझे पटत नाही. मात्र माझे बाबा लोकशाही मानणारे असल्यामुळे, ते मला काहीही बोलत नाहीत.
मी खूप खोड्या मस्ती करत असलो तरी देखील माझे वडील लोकशाही मानत असल्याने ते काहीही करत नाहीत. मात्र गावातली बारकाली पोरं, माझं नाव सरांना सांगतात. माझे नाव सरांना सांगितल्यामुळे सर मात्र आतंकवादी ज्याप्रमाणे लोकशाहीची मूल्यं पायदळी तुडवतो त्याच पद्धतीने सर देखील मला पायदळी तुडवतात. चिमुकल्याच्या तोंडातून हे वाक्य निघतात उपस्थित असणारे श्रोते हसून हसून लोटपोट होऊ लागले. यात शिक्षकांचा देखील सहभाग होता.
चिमुकला एवढ्यावरच थांबला नाही, उपस्थित असणारे सर्वजन हसून लोटपोट होत असताना देखील त्याने आपले विचार प्रकट केले. तो म्हणाला, कधी-कधी मला कोंबडा बनवतात, आणि म्हणतात, तुझं वागणं लोकशाहीला धरून नाही. तुझ्या तक्रारी वारंवार बाहेर येतात. पण मी खरं सांगतो, माझ्यासारखा गरीब पोरगा तुम्हाला तालुक्यात देखील पाहायला मिळणार नाही. असा मिश्किल टोला देखील त्याने लगावतो. एवढेच नाही, तर आपल्या भाषण संपवताना तो म्हणाला, एवढं बोलून मी माझे अनमोल विचार थांबवतो.
या चिमुकल्याला हे भाषण त्याच्याच शिक्षकाने लिहून दिलं असलं तरी देखील त्याचं प्रेझेंटेशन कमाल होतं. अखेर तो ‘लोकशाही की जय’ असं म्हणत आपलं भाषण संपवतो. आणि उपस्थित असणारे श्रोते कडकडून टाळ्या वाजवतात. 26 जानेवारी नंतर काल हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला आहे. महाराष्ट्र लोकशाहीने या मुलाचा शोध घेत याची परिस्थिती जाणून घेतली आहे. या चिमुकल्याची परिस्थिती जाऊन तुमच्याही डोळ्यातून अश्रू ओघळतील.
कार्तिक जालिंदर वजीर (Karthik jalindar vajir) असं या चिमुकल्याचं नाव आहे. हा जालना (Jalna) जिल्ह्यातील अंबड (ambad) मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेवलगावमध्ये (revalgaon) शिकत असल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे, तो पहिल्याच इयत्तेत शिकत आहे. कार्तिकचे वडील शेतकरी असून, घरची परिस्थितीही फारच बिकट असल्याचं पाहायला मिळालं. कार्तिक हा पहिल्यापासूनच खोडकर आहे. कार्तिक खूपच गोरा असल्याने मित्रांनी त्याचे नाव भुऱ्या पाडलंय. कार्तिक प्रचंड खोडकर असला तरी आपल्या मधुर वाणीमुळे तो सर्वांना हवाहवासा वाटतो. मात्र रातआंधळेपणाने तो ग्रस्त असून दृष्टी कमी झाल्यानं कार्तिकला वर्गात फळ्याच्या जवळ बसावं लागतं.
वर्गात पाठीमागे बसल्यावर कार्तिकला काहीच दिसत नाही. म्हणून त्याचे शिक्षक भारत मस्के फळ्याजवळ बसवतात. कार्तिक शाळेत प्रचंड हुशार आहे. खेळात देखील त्याचा सहभाग प्रामुख्याने असतो. सुरूवातीला प्रजासत्ताक दिनी त्याला भाषण करण्याची संधी देण्यात आली नव्हती. मात्र त्याने हट्ट करून मला भाषण करायचं आहे, असं म्हणत भाषण केले. कार्तिकने केलेले भाषण हे त्याच्या शिक्षकांनी लिहून दिले होते. भाषणाची तयारी याच शाळेत शिकणाऱ्या त्याच्या बहिणीने करून घेतल्याची माहिती मिळाली. रातआंधळेपणा यावर लवकर उपचार व्हायला हवेत. असं सांगताना शिक्षक भारत म्हस्के प्रचंड भावून झाल्याचे दिसून आलं.
हे देखील वाचा msrtc recruitment 2023: 8वी 10वी उत्तीर्णांसाठी एसटी महामंडळात मोठी भरती; जाणून घ्या डिटेल्स..
Driving Licence: मोठी बातमी! आता ड्रायव्हिंग लायसन्स नसले तरीही पोलीस काहीच करू शकणार नाहीत..
IND vs AUS: T20 नंतर कसोटी संघातूनही केएल राहुलचा पत्ता कट..
IND vs NZ: सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याने जाहीर केली धक्का बसणारी प्लेइंग इलेवन..
Marriage Tips: ..म्हणून लग्नाआधी लावतात हळद; हळद लावण्याची सहा करणे जाऊन तुम्हालाही बसेल धक्का..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम