IND vs NZ: सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याने जाहीर केली धक्का बसणारी प्लेइंग इलेवन..

0

IND vs NZ: हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात आज भारत-न्यूझीलंड विरुद्ध पहिला टी ट्वेंटी (IND vs NZ 1st T20) सामना रांची (Ranchi) येथे खेळणार आहे. एकदिवसीय सामन्याची मालिका 3-0 अशी खिशात घातल्यानंतर, आता हार्दिक पांड्या आणि संघ टी ट्वेंटी मालिका देखील जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत हार्दिक पांड्याने पहिल्या T20 साठी कशी असणार प्लेइंग इलेवन याविषयी देखील माहिती दिली आहे.

खूप वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर ‘पृथ्वी शॉ’ला (prithvi shaw) भारताच्या T20 संघात स्थान मिळाले आहे. पृथ्वीमध्ये भारताच्या सेहवागची झलक असल्याचं अनेक क्रिकेट दिग्गजांचे म्हणणं आहे. भारताच्या टी-ट्वेंटी संघात सलामीवीर म्हणून ‘पृथ्वी शॉ’ला संधी देणे आवश्यक असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. ‘पृथ्वी शॉ’ हा एक नैसर्गिक आक्रमक फलंदाज आहे. परिस्थिती कशीही असली त्याला काही फरक पडत नाही.

टी-ट्वेंटी संघात तुम्हाला अशा एका सलामीवीराची आवश्यकता असते, जो आपला नैसर्गिक खेळ करेल. खूप कमी फलंदाज असे आहेत, जे सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करू शकतात. यामध्ये सध्या पृथ्वी आघाडीवर आहे. पृथ्वीला परिस्थिती कशीही असली तरी देखील पहिल्या चेंडूपासूनच नैसर्गिक आक्रमक फलंदाजी करू शकतो. मात्र असे असले तरी देखील हार्दिक पांड्याने ‘पृथ्वी शॉ’ला आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे म्हंटले आहे.

गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग या दिग्गज फलंदाजांनी देखील टी-ट्वेंटी सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉ’ची निवड केली आहे. मात्र आता पाठीमागच्या चार डावात एकूण तीन दमदार शतके ठोकणाऱ्या गिल सोबत भारत पहिल्या टी-ट्वेण्टी सामन्यात उतरणार आहे. सलामीवीर शुभमन गिल सोबत यष्टीरक्षक इशान किशन सलामीला येणार असल्याने ‘पृथ्वी शॉ’ला अंतीम अकरामध्ये संधी मिळण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

काय म्हणाला हार्दिक

गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत हार्दिक पांड्याने पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात अंतिम अकरा कशी असणार याविषयी स्पष्ट शब्दात सांगितले. ‘पृथ्वी शॉ’ आक्रमक फलंदाज असला तरी देखील पाठीमागच्या काही सामन्यात गिलने कमालीचा फॉर्म दाखवला आहे. चार सामन्यात तीन दमदार शतके त्याने ठोकली असल्याने, पहिला सलामीवीर म्हणून त्याची निवड करावी लागेल. असे हार्दिक पांड्या म्हणाला.

धोनी सोबत काय झाली चर्चा?

काल भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) स्वतःहून अचानक ड्रेसिंग रूममध्ये पोहचला होता. धोनी ड्रेसिंग रूममध्ये पोहोचल्यानंतर, खेळाडूंनी त्याच्या भोवती गर्दी केल्याचं सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओत पाहिला मिळालं. धोनी सोबत काय चर्चा झाली? या प्रश्नावर हार्दिक पांड्या म्हणाला, आम्ही खेळापेक्षा अधिक चर्चा जीवनावर केली. जेव्हा कधी माही भाई सोबत भेट होते, तेव्हा आम्ही खेळावर कमी आणि आयुष्यावरचं जास्त बोलतो, असं हार्दिक पांड्या म्हणाला.

अशी असणार अंतिम अकरा

हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, अर्शदीप सिंग, शिवम मावी, युझवेंद्र चहल/ कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक

Also read INDvsNZ T20 series: टी-ट्वेण्टी संघात निवड करूनही पृथ्वी शॉला BCCI चा दणका..

Marriage Tips: ..म्हणून लग्नाआधी लावतात हळद; हळद लावण्याची सहा करणे जाऊन तुम्हालाही बसेल धक्का..

mahendra singh dhoni: म्हणून धोनी अचानक पोहचला ड्रेसिंग रूममध्ये; काय झाली चर्चा, पाहा व्हिडिओ..

Gautami Patil: गौतमी पाटीलला कोर्टाचा दणका; अखेर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर बंदी..

Bank of Maharashtra Bharti 2023: या उमेदवारांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये विविध पदांची मेगा भरती..

Hair fall tips: म्हणून गळतात पुरुषाचे केस; त्वरित थांबवा या चुका तरच टक्कल पडण्यापासून वाचाल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.