Gautami Patil: गौतमी पाटीलला कोर्टाचा दणका; अखेर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर बंदी..

0

Gautami Patil: आपल्या अश्लील नृत्याने घराघरात पोहोचलेली गौतमी पाटील (Gautami Patil) आता अडचणीत आली आहे. महाराष्ट्राचा ग्रामीण (gramin Maharashtra) भागात गौतमी पाटील हे नाव घराघरात पोहचलं असून, गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी उसळत असल्याचं पाहायला मिळते. आता गौतमी पाटीलला कार्यक्रम संदर्भात कोर्टाने दणका दिला असून, गौतमी पाटील अडचणीत आली आहे. गौतमी पाटील बाबतची ही गोष्ट जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

गेल्या वर्षभरापासून गौतमी पाटील हे नाव महाराष्ट्रभर चांगलेच चर्चेत राहिले. गौतमी पाटीलच्या अदा पाहण्यासाठी तरुणाची अक्षरशः झुंबड उडते. गर्दीमुळे गौतमीच्या अनेक कार्यक्रमामध्ये राडा देखील झाला आहे. एवढंच नाही, गौतमीच्या एका कार्यक्रमात तरुणाच्या संशयास्पद मृत्यूची नोंदही झाली आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात अश्लील नृत्य करत तरुणांना उत्साहित करत असल्याचे देखील आरोप अनेक संघटनांनी केले आहेत. एवढं सगळं असून, देखील अजूनही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी जमते.

गौतमी पाटील अश्लील नृत्य करत असल्याचा आरोप अनेकांनी केल्याने गौतमी पाटीलने देखील जाहीर माफी मागत यापुढे मी असलं कृत्य करणार नसल्याची कबुली दिली. एकीकडे गौतमी पाटीलने जाहीर माफी मागितली असली तरी देखील दुसरीकडे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी केली जात असल्याचं पाहायला मिळते. गौतमी पाटीलचा कार्यक्रम वादात असतानाच आता सातारा कोर्टाने गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

गौतमी पाटीलने अश्लील डान्स केल्याने तिच्या कार्यक्रमात तरुणांनी हैदोस घातला. नृत्य कमी आणि अश्लील हावभाव, हातवारे करत असल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भातली तक्रार ‘प्रतिभा शेलार’ यांनी केली होती. तक्रार दाखल केल्यानंतर, सातारा कोर्टाने गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देखील दिले आहेत. गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश कोर्टाने दिल्यामुळे आता तिच्या अडचणीत वाढ झाली आहे.

गौतमी पाटील हिचे कार्यक्रम वादग्रस्त असले तरी देखील कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतं. खास करून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात गौतमीची तरुणांमध्ये खूप मोठी क्रेझ असल्याचं पाहायला मिळते. गौतम पाटीलचा कार्यक्रम असल्याचं कळताच, हजारोंच्या संख्येने चाहते गौतमी पाटील येण्यापूर्वीच कार्यक्रम स्थळी दाखल होतात. अनेक कार्यक्रमात राडा झाल्यापासून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात येतो.

गौतमी पाटील एका कार्यक्रमाचे दीड ते दोन लाख रुपये मानधन घेते. तब्बल दोन महिने अगोदर गौतमीचे कार्यक्रम बुकिंग असतात. तिच्या कार्यक्रमात नृत्य कमी आणि अश्लीलता जास्त असल्याने या कार्यक्रमांना तरुणांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असते. असा देखील आरोप करण्यात येतो. अशातच आता कोर्टाने गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने गौतमी पाटीलच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

हे देखील वाचा Bank of Maharashtra Bharti 2023: या उमेदवारांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये विविध पदांची मेगा भरती.. 

Pathaan: तो सीन सुरू होताच चाहते स्क्रीन समोर बेभान होऊन नाचू लागले; पाहा व्हिडिओ..

Hair fall tips: म्हणून गळतात पुरुषाचे केस; त्वरित थांबवा या चुका तरच टक्कल पडण्यापासून वाचाल..

KL Rahul Athiya Shetty marriage: विराट धोनी कडून केएल राहुला दोन कोटीहून अधिक किमतीच्या वस्तू भेट; जाणून घ्या काय दिल्या भेट वस्तू..

ICF Recruitment 2023: दहावी बारावी उमेदवारांसाठी या विभागात मोठी भरती; परीक्षा विना अशी केली जाणार निवड..

Kissing Tips: पहिलं kiss चुकलं तर होईल सत्यानाश; जाणून घ्या पहिल्यांदा किस करताना कोणती काळजी घ्यायची..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.