Pathaan: तो सीन सुरू होताच चाहते स्क्रीन समोर बेभान होऊन नाचू लागले; पाहा व्हिडिओ..

0

Pathaan: गेल्या काही दिवसापासून कमालीचा चर्चेत असणारा पठाण (pathaan) हा चित्रपट काल रिलीज झाला. शाहरुख खान (shahrukh khan) आणि दीपिका पादुकोण (deepika padukone) यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट जगभरात प्रदर्शित करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आणि वादात असणारा हा चित्रपट बॉयकॉट देखील करण्यात आला. मात्र तरी देखील पहिल्याच दिवशी या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. रेकॉर्ड ब्रेक कमाई बरोबरच चाहत्यांनी हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

पठाण या चित्रपटाने ‘बॉक्स ऑफिस’वर धुमाकूळ तर घातलाच, मात्र शाहरुख खानच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आलं. सोशल मीडियावर या संदर्भातला एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, ‘झुमें जो पठान’ (jumme Jo Pathan) हे गाणं सुरू झाल्यानंतर चित्रपटगृहामधील प्रेक्षक अक्षरशः स्क्रीन समोर बेभान होऊन नाचत असल्याचे पाहायला मिळालं.

बॉलीवूडवर (Bollywood) सध्या बॉयकॉट ट्रेंडचं (boycott) सावट आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पठाण या चित्रपटावर देखील बॉयकॉट हा ट्रेंड चालवण्यात आला. बॉयकॉट ट्रेंडमुळे हा चित्रपट ब्लॉक तर नाही होणार ना, अशी भीती चित्रपट कलाकारांबरोबर निर्मात्यांना देखील होती. मात्र रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटाचे अनेक शो बुकिंग करण्यात आले. पठाण या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. Kgf 2 सारख्या चित्रपटांचा देखील शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने पहिल्याच दिवशी विक्रम मोडला आहे.

सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शन केलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगला पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळत असून, येणाऱ्या काही दिवसांमध्येच हा चित्रपट विक्रमी कमाई करेल असा अंदाज चित्रपट समीक्षकांनी व्यक्त केला आहे. चित्रपट पाहताना अनेक दृश्यांसाठी प्रेक्षक टाळ्या आणि शिट्या वाजवत असल्याचं पाहायला मिळत असल्याने आता चित्रपट पाहण्याची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

केजीएफ २, बाहुबली या सिनेमाच्या यादीत पठाण हा चित्रपट जाऊन बसेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जबरदस्त ॲक्शन, रोमान्स, जॉन अब्राहम याची भूमिका या सगळ्यांचे पॅकेज पाहण्यासाठी चाहते आता उत्स्फूर्तपणे चित्रपटगृहामध्ये येत आहेत. महत्त्वाचं म्हणजे सलमान खानचा कॅमियो (Salman Khan cameo) देखील या चित्रपटात दाखवण्यात आला असल्याने या चित्रपट पाहण्याविषयी चाहत्यांना आणखीन उत्सुकता लागली आहे.

हे देखील वाचाHair fall tips: म्हणून गळतात पुरुषाचे केस; त्वरित थांबवा या चुका तरच टक्कल पडण्यापासून वाचाल..

KL Rahul Athiya Shetty marriage: विराट धोनी कडून केएल राहुला दोन कोटीहून अधिक किमतीच्या वस्तू भेट; जाणून घ्या काय दिल्या भेट वस्तू..

INDvsNZ T20 series: टी-ट्वेण्टी संघात निवड करूनही पृथ्वी शॉला BCCI चा दणका..

msrtc recruitment 2023: 8वी 10वी उत्तीर्णांसाठी एसटी महामंडळात मोठी भरती; जाणून घ्या डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.