KL Rahul Athiya Shetty marriage: विराट धोनी कडून केएल राहुला दोन कोटीहून अधिक किमतीच्या वस्तू भेट; जाणून घ्या काय दिल्या भेट वस्तू..

0

KL Rahul Athiya Shetty marriage: भारताचा स्टार क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul) आणि बॉलीवूड सुपरस्टार सुनील शेट्टी (Sunil Shetty) यांची मुलगी अथिया शेट्टी (athiya Shetty) यांचा विवाह सोहळा 23 जानेवारीला खंडाळा (Khandala) येथील सुनील शेट्टीच्या फार्म हाऊसवर (Sunil Shetty farm house) पार पडला. प्रोटोकॉलमुळे अनेक क्रिकेट दिग्गज आणि बॉलीवूड दिग्गजांना या विवाह सोहळ्याला हजेरी लावता आली नाही. दोन्ही कुटुंबातल्या काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. आपल्या मित्राच्या लग्नाला जाता आलं नसलं, तरी महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh dhoni) आणि विराट कोहलीने (Virat Kohli) केएल राहुलला कोट्यावधी रुपयांच्या वस्तू भेट दिल्या आहेत.

विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर सुनील शेट्टी यांनी सर्वांचे आभार मानत शुभेच्छांचा स्वीकार केला. याबरोबर सुनील शेट्टी यांनी ग्रँड रिसेप्शन पार्टी (grand reception party) देखील होणार असून, या संदर्भात निर्णय देखील घेतला आहे. आयपीएल २०२३ स्पर्धा (IPL 2023) पार पडल्यानंतर, लगेच ग्रँड रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं जाईल, असं सुनील शेट्टी यांनी माध्यमांना सांगितले. आगामी बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका अत्यंत महत्त्वाची असल्याने केएल राहुलने हनिमूनला न जाता आपल्या संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला. (KL Rahul Athiya Shetty marriage ceremony)

विराट कोहली (Virat kohli) महेंद्रसिंग धोनी (mahendra singh dhoni) केएल राहुल हे तिघेही उत्तम मित्र असल्याचं बोललं जातं. न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिका सुरू असल्याने विराट कोहलीला राहुलच्या लग्नासाठी जाता आलं नाही. मात्र रिसेप्शन पार्टीसाठी अनेक बॉलीवूड आणि क्रिकेट दिग्गज उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. नवदाम्पत्याला विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीने कोट्यावधी रुपयांच्या वस्तू भेट दिल्या आहेत.

भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांनी केएल राहुल आणि अथिया शेट्टी या दोघांच्याही आवडत्या भेटवस्तू दिल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. मीडिया रिपोर्ट नुसार अथिया शेट्टी आणि राहुलला विराट कोहलीने तब्बल 2 कोटी 17 लाख रुपयांची BMW कार भेट दिली आहे. विशेष म्हणजे, केएल राहुल आणि अथिया शेट्टी या दोघांची ही आवडती कार आहे. (Virat Kohli gifted Rahul a BMW car)

विराट कोहली बरोबरच भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने देखील स्वतःकडे असणारी आणि सर्वात लोकप्रिय बाईक राहुलला भेटवस्तू म्हणून दिली आहे. विशेष म्हणजे, केएल राहुलला देखील ही बाईक प्रचंड आवडत होती. महेंद्रसिंग धोनीने कावासाकी कंपनीची निंजा ही बाईक राहुलला भेट दिली आहे. महेंद्रसिंग धोनीच्या हृदयाजवळ ही बाईक होती असं सांगण्यात येतं. मात्र आपल्या मित्रासाठी महेंद्रसिंग धोनीने ही बाईक त्याला भेटू म्हणून दिली आहे. या बाईकची किंमत ८० लाख रुपये आहे.

हे देखील वाचा INDvsNZ T20 series: टी-ट्वेण्टी संघात निवड करूनही ‘पृथ्वी शॉ’ला BCCI चा दणका..

Rahul Dravid: ..म्हणून कोहली रोहीतला टी-ट्वेंटी टीममधून वगळले; राहूल द्रविडच्या विधानाने खळबळ..

msrtc recruitment 2023: 8वी 10वी उत्तीर्णांसाठी एसटी महामंडळात मोठी भरती; जाणून घ्या डिटेल्स..

ICF Recruitment 2023: दहावी बारावी उमेदवारांसाठी या विभागात मोठी भरती; परीक्षा विना अशी केली जाणार निवड..

Ration Card: ब्रेकिंग! राज्य सरकारने जारी केला आदेश; गहू-तांदळाबरोबर या वस्तू मिळणार मोफत..

BPL Ration Card: आता बीपीएल रेशन कार्डसाठी तुम्हालाही करता येणार अर्ज; जाणून घ्या फायदे आणि असा करा अर्ज..

Cricket Love Story: कार्तिक मुरली विजय घटनेची पुनरावृत्ती; या खेळाडूने मित्राच्या पत्नी सोबतच लग्न केल्याने खळबळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.