Cricket Love Story: कार्तिक मुरली विजय घटनेची पुनरावृत्ती; या खेळाडूने मित्राच्या पत्नी सोबतच लग्न केल्याने खळबळ..

0

Cricket Love Story: प्रेम कधीही कुठेही कोणासोबतही होऊ शकतं, याच्या घटना आपल्या आसपास देखील पाहायला मिळतात. दिग्गज खेळाडू देखील यापासून लांब नाहीत. अनेक क्रिकेटरांनी विवाहित महिलांसोबत आपला संसार थाटलाच्या घटना अनेक आहेत. मात्र आपल्याच सहकाऱ्याच्या पत्नीसोबत प्रेम संबंध आणि नंतर तिच्याबरोबर लग्न अशाशी काही अजब घटना आहेत.

भारताचा स्टार क्रिकेटर दिनेश कार्तिक आणि त्याचा मित्र मुरली विजय (Dinesh Karthik and Murli Vijay) या दोघांची घटना तुम्हा सगळ्यांनाच माहीत आहे. तमिळनाडू संघाकडून खेळताना दोघांची चांगली मैत्री झाली. साहजिकच यामुळे दिनेश कार्तिकच्या पत्नीसोबतही मुरली विजयची देखील ओळख झाली. या ओळखीचा पुढे प्रेमात रूपांतर झालं. दोघेही एकमेकांना डेट करू लागले. मात्र याची किंचितही खबर दिनेश कार्तिकला लागली नाही.

एक दिवस अचानक दिनेश कार्तिकच्या पत्नीने माझ्या पोटात असणारं बाळ मुरली विजयचं असल्याचं सांगितलं. आणि दिनेश कार्तिकच्या पायाखालची वाळूच सरकली. पुढे या दोघांनी घटस्फोट घेतल्यानंतर मुरली विजय आणि निकिता वंजारा (Nikita Vanjara) या दोघांनी लग्न केले. आता याच घटनेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा झाली आहे. श्रीलंकेचा माजी विस्पोटक फलंदाज तिलकरत्ने दिलशान (tilakrat ne Dilshan) यांच्याबाबतीत घडली आहे.

श्रीलंकेचा माजी सलामीवीर उपुल थरंगाने (upul tharanga) आपलाच सहकारी तिलकरत्न दिलशानच्या पत्नी सोबत अफेअर केले. विशेष म्हणजे दिलशानची पहिली पत्नी निलांकाला उपुल थरंगाने तब्बल एक वर्ष डेट केले. मात्र तरीदेखील दिलशानला याची खबरही लागली नाही. दिलशानला आपली पत्नी आपल्या सहकाऱ्याला डेट करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर दिलशानने निलांका सोबत घटस्फोट घेतला. निलांका पासून त्याला एक मुलगा देखील आहे. सध्या तो आपला सावत्र पिता तरंगा आणि आई निलांकाकडे राहतो.

दिलशान आणि निलांकाने घटस्फोट घेतल्यानंतर उपुल थरंगाने आपली प्रेमिका निलांगा सोबत नवीन संसार थाटला. थरंगाने देखील आपली प्रेमिका निलांकाला दिलशान पासून झालेल्या मुलाचा स्वीकार करत नवीन आयुष्याची सुरुवात केली. असं असलं तरी दिलशानकडून मुलाचा सांभाळ करण्यासाठी नीलांका दर महिन्याला पोटगी घेते. विशेष म्हणजे पोटगीसाठी तिने दिलशान विरोधात कोर्टात धाव देखील घेतली होती.

दिलशान आणि नीलांका यांच्या घटस्फोटा नंतर दिलशानने देखील आपला संसार थाटला. दिलशानने अभिनेत्री मंजुला हिच्यासोबत विवाह केला. या विवाहापासून दोघांनाही दोन मुली आणि दोन मुले आहेत. या दोघांना एकूण चार अपत्य असून सहा जणांचे कुटुंब आता प्रचंड आनंदी असल्याचं पाहायला मिळते. दिलशान आपल्या पत्नी सोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमी पोस्ट करत असतो.

हे देखील वाचा LIC: एलआयसी मध्ये या उमेदवारांसाठी 9400 जागांची मेगाभरती; जाणून घ्या सविस्तर..

MPSC: MPSC च्या 8 हजाराहून अधिक जागांची मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Belly fat: पोट सुटण्याची ही आहेत प्रमुख करणे; जाणून घ्या पोट कमी करण्याचे उपाय..

Pankaja Munde: देवेंद्र फडणवीसच पंकजाताईंना बदनाम करत आहेत? बावनकुळेंच्या विधानाने खळबळ; पाहा व्हिडिओ..

IND vs NZ: सामन्यापूर्वी हे पदार्थ खातात भारतीय खेळाडू; जाणून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडिओ..

Rohit Sharma: सगळ्यांना चकवून बारक्याची रोहित शर्माला कडकडून मिठी; सिक्यूरीटीला विनंती करत रोहीत म्हणाला..

KL Rahul Wedding: शाहरुख, विराटसह हे दिग्गज उपस्थिती; अशी आहे जय्यत तयारी, जाणून घ्या कुठे आणि किती वाजता होणार लग्न..

SSC recruitment 2023: स्टाफ सिलेक्शन विभागात या उमेदवारांसाठी 11 हजाराहून अधिक पदांची मेगा भरती; जाणून घ्या डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.