KL Rahul Wedding: शाहरुख, विराटसह हे दिग्गज उपस्थिती; अशी आहे जय्यत तयारी, जाणून घ्या कुठे आणि किती वाजता होणार लग्न..

0

KL Rahul Wedding: स्टार क्रिकेटर केएल राहूल (KL Rahul) आणि बॉलिवूड (bollywood) अभिनेत्री अथिया शेट्टी (athiya Shetty) यांचा विवाह अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. २३ जानेवारीला मोठ्या धुमधडाक्यात ही स्टार जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे मोठ्या थाटामाटात या लग्नाची तयारी सुरु आहे. परंतू केएल राहूल आणि अथियाची काही विशेष पाहुण्यांच्या उपस्थितीतच लग्न करण्याची इच्छा असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे काही निवडक व्यक्तींनाच या लग्नाचे आमंत्रण मिळणार असण्याची शक्यता आहे.

बर्‍याच दिवसांपासून केएल राहूल आणि अथिया एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर आता दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे दोघांच्या घरच्यांनी लगेच या लग्नाला परवानगी दिली. अथियाचे वडिल सुनिल शेट्टी (sunil Shetty) तर या लग्लाला प्रचंड उत्सुक आहेत. आपल्या मुलीचे लग्न जोरदार व्हावे याकरिता सुनिल शेट्टी जोमाने कामाला लागले आहेत. लग्नासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या लग्न सोहळ्यासाठी विराट कोहली किंग खान शाहरुख खान यांची देखील उपस्थिती असणार असल्याची माहिती आहे.

सुनिल शेट्टीचे बॉलीवुडमधील संबंध लक्षात घेता, सलमान खान या लग्न सोहळ्यात उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासोबतच केएल राहूलमुळे विराट कोहली सुद्धा या लग्नसोहळ्यात हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जवळच्या काही निवडक लोकांच्या उपस्थितीतच लग्न पार पाडणार असल्याचे सुनिल शेट्टीने सांगितले आहे. मात्र लग्नासाठी करण्यात येत असलेली तयारी पाहून अनेक मोठे सेलिब्रिटी आणि क्रिकेटर या लग्न सोहळ्यात उपस्थित राहणार असल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे.

खंडाळा भागातील जश्न बंगल्यात हे लग्न पार पडणार आहे. २१ जानेवारीपासूनच या लग्नसोहळ्याला सुरुवात करण्यात येणार आहे. यादरम्यान काही महत्वाचे विधी पार पडणार आहेत. यामुळे सुनिल शेट्टी आणि केएल राहूलचे जवळचे नातेवाईक खंडाळ्यात दाखल झाले आहेत. २१ जानेवारीच्या संध्याकाळी पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी नाईट संगीतचे खास आयोजन करण्यात आलेले आहे.

सुनिल शेट्टी आणि त्याची पत्नी माना शेट्टी या लग्नासाठी प्रचंड उत्सुक आहेत. जश्न बंगल्यामधील ८ बेडरुम विशेष पाहुण्यांसाठी सजवण्यात आलेली आहेत. याशिवाय जश्न बंगल्यासमोर मोठे मैदान आहे. ज्यावर काही महत्वाचे प्रोग्राम ठेवण्यात आले आहेत. सुनिल शेट्टी आणि त्याची पत्नी मुलीच्या लग्नासाठी कोणतीही कसर सोडण्यास इच्छुक नाही. मात्र त्याचवेळी अथिया आणि केएल राहूल यांंची साध्या पद्धतीने लग्न करण्याची इच्छा असल्याचे सुनिल शेट्टीने सांगितले आहे. त्यामुळे काही निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीतच हा लग्नसोहळा पार पडणार आहे.

हे देखील वाचा Couple Blood Group: लग्नापूर्वी रक्तगट माहीत असायलाच हवा; रक्तगट सारखाच असेल तर? जाणून घ्या सविस्तर..

Rishabh Pant: क्रिकेट विश्वात खळबळ, ऋषभ पंतवर हे काय बोलून गेला रिकी पाँटिंग..

IND vs NZ: द्विशतकानंतरही तुला संधी का मिळाली नाही? इशान किशनच्या उत्तराने रोहित शर्माची बोलतीच बंद; पाहा व्हिडिओ..

Women Like Condom: महिलांना हा कंडोम आवडतो सर्वाधिक; लैंगिक संबंधा दरम्यान देतो जास्त आनंद..

Sikandar Shaikh: मोठा निर्णय! सिकंदर वरील अन्यायामुळे पुन्हा रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार..

Relationship tips: महिलांच्या या पाच अवयवांकडे पुरुष होतात सर्वाधिक आकर्षित; पाचवा आहे खूपच रंजक..

Kissing Tips: पहिलं kiss चुकलं तर होईल सत्यानाश; जाणून घ्या पहिल्यांदा किस करताना कोणती काळजी घ्यायची..

Age for marriage: लग्न करण्याचे योग्य वय जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.