IND vs NZ: द्विशतकानंतरही तुला संधी का मिळाली नाही? इशान किशनच्या उत्तराने रोहित शर्माची बोलतीच बंद; पाहा व्हिडिओ..

0

IND vs NZ: हैदराबादच्या (Hyderabad) राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ 1st ODI) यांच्यामध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 12 धावांनी थरारक विजय मिळवत तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. (India beat New Zealand 12 runs) एकीकडे ठराविक अंतराने विकेट जात असताना दुसरीकडे सलामीवीर शुबमन गिलने (Shubman Gill) एकहाती लढा देत द्विशतक झळकावले.

न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या कालच्या सामनात भारताकडून 34 धावांचा सेकंड हायेस्ट स्कोअर होता. मात्र शुबमन गिलच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंड समोर 350 धावांचे मोठे आव्हान उभा केले. गिलने 149 चेंडूत 208 धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने तब्बल नऊ षटकार आणि एकोणीस चौकार लगावले. कमी वयात असा कारनामा करणारा शुभमन गिल जगातला पहिला खेळाडू ठरला.

विजयानंतर कॅप्टन रोहित शर्मा (captain rohit sharma) आणि इशान किशनने (Ishan Kishan) शुबमन गिल सोबत संवाद साधला. गिलचे कौतुक करताना रोहित शर्माने या खेळीचे रहस्य विचारले. यावर शुबमन म्हणाला, श्रीलंके विरुद्धच्या सिरीजमध्ये देखील मला चांगली सुरुवात मिळत होती. मात्र मोठी खेळी करण्यात मी अपयशी ठरत होतो. यावेळी देखील मला चांगली सुरुवात मिळाली. चांगल्या सुरुवातीचं रूपांतर एका मोठ्या खेळीत करण्याचा माझा विचार होता. प्रत्येक चेंडूला मी माझ्या पद्धतीने रिऍक्ट होत गेलो, आणि माझ्या बॅटमधून मोठी खेळी साकारली.

रोहित शर्माने साधलेल्या संवादादरम्यान काही मजेशीर गोष्टी देखील घडल्या. रोहित शर्माने गिलचे टू-हंड्रेड क्लबमध्ये स्वागत करताना इशान किशनची चांगलीच फिरकी घेतली. रोहित शर्माच्या टोमण्याला ईशान किशनने देखील त्याच शैलीत उत्तर दिल्याने रोहित शर्माची बोलतीच बंद झाली. बांगलादेश विरुद्ध खेळलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इशान किशनने द्विशतक झळकावले होते. मात्र श्रीलंके विरुद्ध झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत इशान किशनला खेळण्याची संधी मिळाली नाही.

श्रीलंके विरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत इशान किशन ऐवजी सलामीला शुबमन गिलला संधी देण्यात आली. यामुळे इशान किशनला बाहेर बसावं लागलं. काल रोहित शर्माने साधलेल्या संवादामध्ये इशान किशन तू द्विशतक झळकावून देखील तीन सामन्यांत तुला संधी कशी मिळाली नाही? असा प्रश्न विचारला. यावर इशान किशन म्हणाला, कॅप्टन तर तू आहेस, आणि मला संधी मिळाली नाही असं काही विचारतोय? असा प्रश्न विचारत रोहीत शर्माची बोलतीच बंद केली.

आपली झालेली पंचायत लक्षात घेऊन रोहित शर्माने इशान किशनला तुला चार नंबरला फलंदाजी करायला आवडतं का? असा प्रश्न विचारला. यावर नाईलाजाने इशान किशन देखील मला चार नंबरवर फलंदाजी करायला आवडतं असं म्हणाला. बीसीसीच्या अधिकृत वेबसाईटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून, सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

हे देखील वाचा Malaika Arora: मलायका माझ्या आयुष्यात आल्यामुळे आता मला रोज रात्री..”,; अर्जन कपूरचे खळबळजनक विधान..

Virat Kohli: इच्छा नसूनही रोहीत शर्मामुळे BCCI ला द्यावा लागतोय विराट कोहलीचा बळी..

Relationship tips: महिलांच्या या पाच अवयवांकडे पुरुष होतात सर्वाधिक आकर्षित; पाचवा आहे खूपच रंजक..

Health Tips: घशात खवखव करत असेल तर हे उपाय; झटक्यात मोकळा होईल घसा..

Marriage Tips: लग्नापूर्वी दोघांनाही या गोष्टी माहिती असायला हव्याच, अन्यथा महिन्यात तुटू शकतं नातं..

PM Kisan Yojana: म्हणून PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या होतेय कमी; आत्ताच जाणून घ्या, अन्यथा मिळणार नाही १३ वा हप्ता..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.