CT 2025 Semifinal: SA vs NZ सेमीफायनल सामना पाऊसामुळे होणार रद्द; जाजून घ्या फायनलचे गणित..

0

CT 2025 Semifinal: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (champions trophy2025) स्पर्धेचे सेमीफायनलिस्ट मिळाले आहेत. उद्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia 1st semifinal) पहिला सेमीफायनल दुबई, तर पाच तारखेला न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दुसरा सेमीफायनल सामना खेळण्यात येणार आहे. सामना पाकिस्तानमध्ये खेळवला जाणार आहे.

स्पर्धा सुरू झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे तीन सामने रद्द करण्यात आले. फायनल सामन्यावर देखील पावसाचे सावट असून, हा सामना देखील रद्द होण्याची दाट शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका आणि न्युझीलंड यांच्यामध्ये पाकिस्तान येथे होणारा सेमीफायनल सामना जर रद्द झाला तर कसं असेल अंतिम फेरीचं गणित जाणून घेऊया सविस्तर…

उद्या चार तारखेला ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यामध्ये पहिला सेमी फायनल सामना खेळण्यात येणार आहे. दुबईमध्ये हा सामना होणार असल्याने पावसाची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे निश्चित उद्या क्रिकेट चाहत्यांना एक फायनलिस्ट मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय संघ सर्वोत्तम संघ म्हणून समोर आला असला तरी, नॉकआऊट सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेहमीच दमदार खेळ सादर केला आहे. त्यामुळे हा सामना कोण जिंकणार, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

दुसरा सेमीफायनल सामना गद्दाफी स्टेडियममध्ये होणार आहे. याच मैदानावर अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळला गेलेल्या सामना पावसामुळे रद्द झाला होता. फायनल देखील याच मैदानावर होणार असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रमता निर्माण झाली आहे.

पाच तारखेला होणारा दुसरा सेमी फायनल सामना जर पावसामुळे रद्द झाला, तर राखीव दिवस ठेवण्यात आलेला आहे. सहा मार्चला हा सामना खेळण्यात येणार आहे. मात्र जर सहा तारखेला देखील पाऊससामुळे हा सामना रद्द झाला, तर मात्र न्युझीलंड संघाला याचा फटका बसणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ ब गटातून गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे. दुसरीकडे अ गटातून न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला थेट फायनलचे तिकीट मिळणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 9 मार्चला खेळवण्यात येणार आहे.

हे देखील वाचा  Swargate ST Stand: नराधम दत्ता गाडेने बलात्कारापूर्वी देखील केलेत काळे धंदे; अशी आहे त्याच्या घरची परिस्थिती…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.