Malaika Arora: मलायका माझ्या आयुष्यात आल्यामुळे आता मला रोज रात्री..”,; अर्जन कपूरचे खळबळजनक विधान..

0

Malaika Arora: अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा (Arjun Kapoor and Malaika Arora relationship) यांच्यातील नात्यांबद्दल सर्वांनाच माहिती आहे. अर्जुन कपूरने सुद्धा त्यात काहीही लपवलेले नाही. गेल्या चार वर्षांपासून हे दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या वयामध्ये मोठ्या गॅप असल्यामुळे दोघांना टीकेचा सामना सुद्धा करावा लागला आहे. मात्र तरीही त्या दोघांनी एकमेकांची साथ कधीही सोडली नाही. त्यामुळे ही जोडी कायचच चर्चेत असते. अशातच अर्जुन कपूरने नुकतेच मलायका अरोराबाबत एक विधान केले आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा ही जोडी चर्चेत आली आहे.

आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी आणि आयटम सॉंगमधून आई वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मलायकाचा विवाह अरबाज खानसोबत झाला होता. मात्र काही वर्षातच त्या दोघांमध्ये बिनसले आणि त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर मलायका आणि अर्जून हळूहळू एकमेकांच्या जवळ येऊ लागले. अर्जुन कपूर मुळेच मलायकाने घटस्फोट घेतल्याच्या चर्चा त्याकाळी रंगल्याचे पाहायला मिळाले होते. मलायकाला एक अरहान नावाचा मुलगा सुद्धा आहे. घटस्फोट झाल्यानंतर अरहानची कस्टडी मलायकाला मिळाली.

त्यामुळे अरहान मलायकासोबतच राहतो. एवढं सगळं माहिती असून देखील अर्जन मलायकाच्या प्रेमात पडला आणि त्याने तिला स्विकारले. अर्जुनच्या या निर्णयावर अनेकदा संमिश्र प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या. मात्र अर्जुन त्याच्या निर्णयावर ठाम होता. अशातच मलायकाबाबतचे हे महत्वाचे विधान करत त्याचे मलायकावर किती प्रेम आहे हे पुन्हा एकदा सगळ्यांना दाखवून दिले.

अर्जुन कपूरचा “कुत्ते” हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर पाहिजे त्या प्रमाणात या चित्रपटाला प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे अर्जुन कपूर सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येच व्यस्थ आहे. यादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत त्याला मलायका आणि त्यांच्या नात्याबद्दल विचारण्यात आले. अर्जूनने मलायका संबंधित सगळ्या प्रश्नांची मनमोकळी ऊत्तरे दिली. यादरम्यानच त्याने मलायकाबाबत एक मोठे विधान केले. ज्यामुळे तो पुन्हा एकदा त्यांच्या नात्याला घेऊन चर्चेत आला आहे.

अर्जुन कपूरने यावेळी मलायका अरोरा त्याच्या आयुष्यात आल्यापासून त्याच्या जिवनात काय बदल झालेत याबद्दल सांगितलं. अर्जुन म्हणाला मलायकाच्या रुपात एक समजूतदार पार्टनर मला मिळाली आहे. ती मला वेळोवेळी समजून घेते. तसेच ती खुप सपोर्टीव्ह सुद्धा आहे. माझ्या प्रत्येक गोष्टीत ती मला प्रचंड सपोर्ट करते. त्यामुळे मला सुद्धा एक प्रकारे मोटीव्हेट झाल्यासारखं वाटतं. अशाप्रकारच्या भावना त्याने यावेळी व्यक्त केल्या.

अर्जुन पुढे बोलताना म्हणाला की, “मलायका माझ्या जिवनात येण्याने माझ्यात खुप मोठे बदल झाले आहेत. तिच्या येण्याचे माझ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला बदल जाणवतो. आम्ही मागील काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहोत. मलायकाचा माझ्या जिवनात येण्याने एक फार महत्वाचा बदल मी तुम्हाला सांगू इच्छितो, तो म्हणजे आता रोज रात्री मला श‍ांत झोप लागते. अर्जुन कपूरच्या या विधानाने त्याचे मलायकावर किती प्रेम आहे हे कळते.

मलायका-अर्जुन जोडीच्या चाहत्यांनी तर या विधानाचे भरभरुन कौतूक केले आहे. मलायका आणि अरबाज खान यांचा घटस्फोट झाल्यानंतर या दोघांमधील जवळीकता वाढली. हळूहळू या जवळीकतेचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांच्याही चाहत्यांनी या नात्याला भरभरुन सपोर्ट केला. मात्र अनेकांनी त्यांच्या या नात्यावर टीका सुद्धा केली. परंतू तरी देखील एकमेकांची साथ न सोडता दोघांनी एकमेकांना डेट केले. मलायका आणि अर्जुन बर्‍याच वर्षांपासून रिलेशनशीप मध्ये आहेत. त्यामुळे आता लग्नी कधी करणार असा सवाल त्यांच्या चाहत्यांकडून त्यांना विचारण्यात येत आहे.

हे देखील वाचा Marriage Tips: लग्नापूर्वी दोघांनाही या गोष्टी माहिती असायला हव्याच, अन्यथा महिन्यात तुटू शकतं नातं..

Relationship tips: महिलांच्या या पाच अवयवांकडे पुरुष होतात सर्वाधिक आकर्षित; पाचवा आहे खूपच रंजक..

Health Tips: घशात खवखव करत असेल तर हे उपाय; झटक्यात मोकळा होईल घसा..

BCCI: भूकंप! BCCI संधीच देत नसल्याने या खेळाडूने अखेर दुसर्‍या देशाकडून खेळण्याचा घेतला निर्णय..

Driving licence: आता घरबसल्या काढता येणार ड्रायव्हिंग लायसन्स; जाणून घ्या सविस्तर प्रोसेस..

Women Facts: सून आणि सासूचं का पटत नाही? जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

IB Recruitment 2023: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी या विभागात मेगा भरती; लगेच जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Sexual ability Tips: चाळीशीत हवीय पंचविशीतल्यासारखी लैंगिक क्षमता? लगेच करा हे काम..

Chanakya Niti: लग्नापूर्वी या गोष्टींची काळजी घेतल्यास पती-पत्निमध्ये कधीच उद्भवत नाहीत समस्या..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.