Driving licence: आता घरबसल्या काढता येणार ड्रायव्हिंग लायसन्स; जाणून घ्या सविस्तर प्रोसेस..

0

Driving licence: गाडी चालवत असणार्‍या प्रत्येकाकडे ड्रायव्हींग लायसन्स असणे बंधनकारक आहे. “ट्रॅफिकच्या सर्व नियमांचे पालन करुन तुम्ही रस्त्यावर गाडी चालवण्या योग्य आहात” याची पुष्टी ड्रायव्हींग लायसन्स करते. त्यामुळे भारतात कुठेही गाडी चालवायची असल्यास तुमच्याकडे ड्रायव्हींग लायसन्स असलेच पाहिजे. विना लायसन्सची गाडी चालवणे हा एक प्रकारचा गुन्हा आहे. त्यामुळे जर तुम्ही विना ड्रायव्हींग लायसन्सची गाडी चालवत असाल, तर तुमच्यावर कायदेशीर होऊ शकते. याशिवाय तुम्हाला दंड सुद्धा होऊ शकतो.

गाडी चालवताना लायसन्स असणे बंधनकारक केले असून देखील आजही अनेकजण विना ड्रायव्हींग लायसन्सची गाडी चालवतात. मग लायसन्स एवढं महत्वाचं असून सुद्धा लोकं अशी का वागतात? असा प्रश्न पडतो. मात्र लायसन्स काढण्यासाठीची क्लिष्ट प्रक्रिया हे या प्रश्नाचे ऊत्तर आहे. विना ड्रायव्हिंग लायसन्सची गाडी चालवण्याची कुणालाच हौस नाही. मात्र लायसन्स काढण्यासाठी लागणारा वेळ अनेकांना परवडेनासा आहे. त्यामुळे लोकं लायसन्स काढण्या अगोदर गाडी चालवायला सुरुवात करताय. परंतू सरकारने लोकांची ही समस्या ओळखून लायसन्स काढण्याच्या प्रक्रियेत मोठे बदल केले आहे. सरकारकडून करण्यात आलेल्या त्या बदलांबद्दलच आपण येथे जाणून घेणार आहोत.

लायसन्स काढण्यासाठी या अगोदर RTO ऑफीसमध्ये जावं लागायचं. RTO ऑफीसमध्ये लायसन्स काढणार्‍यांची झालेली गर्दी बघून लायसन्स काढण्याची अर्धी ईच्छा तिथेच मरुन जायची. मात्र आता असे होणार नाही. लायसन्स काढण्यासाठी आता RTO ऑफीसला जाण्याची वेळच तुमच्यावर येणार नाही. सरकारकडूनच तशी तजवीज करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता घरबसल्या अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे ड्रायव्हींग लायसन्स काढू शकता. यासाठी तुम्हाला घरुनच ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. नेमका हा अर्ज कसा करायचा याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.

https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do ही रस्ते व वाहतूक मंत्रालयाची वेबसाईट आहे. सर्वप्रथम तुम्हाला वेबसाईटवर जावे लागेल. येथे तुम्हाला तुमच्या राज्याची निवड करावी लागेल. जसे की महाराष्ट्रातील अर्ज करणार्‍यांना येथे महाराष्ट्र निवडावे लागेल. त्यानंतर “फॉर अ लर्नर्स” असे ऑप्शन तुम्हाला तिथे दिसेल. त्या ऑप्शनवर गेल्यानंतर तुम्हाला शिकाऊ ड्रायव्हींग लायसन्सचा फॉर्म त्याठिकाणी दिसेल. तो फॉर्म व्यवस्थितपणे पूर्ण भरायचा आहे.

शिकाऊ ड्रायव्हींग लायसन्सच्या फॉर्ममध्ये सर्व माहिती भरल्यानंतर आधार कार्डद्वारे अर्जदार निवडावा लागेल. त्यानंतर आधार प्रणाली करणाद्वारे सबमिट करुन, सबमिट करा यावर क्लिक करावं लागेल. यानंतर आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर त्याठिकाणी टाकून जनरेट ओटीपीवर क्लिक करावं लागेल. मोबाईल क्रमांक टाकताना मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे की नाही याची खात्री करुन घेणे जरुरी आहे. यानंतर लगेच तुम्ही प्रविष्ट केलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. आलेला ओटीपी त्याठिकाणी प्रविष्ट करुन पुढे जावे लागेल.

ओटीपी प्रविष्ट करताच तुम्हाला अटी व शर्ती दिसू लागतील. तुम्हाला सर्व अटी व शर्तींचा स्विकार करायचा आहे. नंतर ऑथेंटिकेशन बटणावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर लायसन्स पेमेंटचा पर्याय तुम्हाला दिसेल. त्या पर्यायावर जाऊन पेमेंट करायचं आहे. ऑनलाईन चाचणीची वेळ आणि तारीख निवडून तुम्हाला चाचणी द्यायची आहे. चाचणी ऊत्तीर्ण झाल्यास तुम्हाला त्यांच्याकडून पुष्टी मिळेल. अशाप्रकारे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने घरबसल्या तुम्हाला लायसन्स मिळवता येणार आहे.

हे देखील वाचा Virat Kohli: इच्छा नसूनही रोहीत शर्मामुळे BCCI ला द्यावा लागतोय विराट कोहलीचा बळी..

Bigg Boss season 16: बिग बॉस 16 च्या विजेत्या स्पर्धकाचे नाव आले समोर; जाणून घ्या धुमाकुळ घालणाऱ्या या स्पर्धकाचे नाव..

BCCI: भूकंप! BCCI संधीच देत नसल्याने या खेळाडूने अखेर दुसर्‍या देशाकडून खेळण्याचा घेतला निर्णय..

Women Facts: सून आणि सासूचं का पटत नाही? जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Relationship tips: महिलांच्या या पाच अवयवांकडे पुरुष होतात सर्वाधिक आकर्षित; पाचवा आहे खूपच रंजक..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.