Rishabh Pant: क्रिकेट विश्वात खळबळ, ऋषभ पंतवर हे काय बोलून गेला रिकी पाँटिंग..

0

Rishabh Pant: गेल्या काही वर्षापासून भारतीय क्रिकेट संघाला अनेक नवोदित तरुण खेळाडू मिळत आहेत. कमालीची प्रतिभा असणारे तरुण खेळाडू संधी मिळाल्यानंतर त्या संधीचा सोनं देखील करून दाखवत आहेत. ऋषभ पंत (Rishabh Pant) हा त्यापैकीच एक खेळाडू आहे. आपल्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर त्याने खूप कमी काळात यश संपादन करत जगभरात आपला नावलौकिक मिळवला आहे. खास करून टेस्ट क्रिकेटमध्ये (test cricket) ऋषभ पंतने जो कारनामा केला आहे, तो अनेक महान खेळाडूंना जमलेला नाही.

ऋषभ पंतने टेस्ट क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असली तरी आता त्याला क्रिकेट पासून काही महिने दूर राहावं लागणार आहे. गेल्या महिन्यात दिल्लीवरून (Delhi) डेहराडूनकडे (dehradun) आपल्या रूडकी (Roorkee) या घरी जात असताना ऋषभ पंतचा कार अपघात झाला. (Rishabh Pant Car accident) या अपघातात तो थोडक्यात बचावला. त्याच्या पाठीला, डोक्याला आणि पायाला जबर मार लागल्या असल्याने आता सात आठ महिने क्रिकेट पासून दूर राहावं लागणार आहे. अशातच आता रिकी पाँटिंगच्या (Ricky ponting) एका विधानाने एकच खळबळ उडाली आहे.

आयसीसीच्या (ICC) रिव्ह्यूमध्ये पाँटिंग म्हणाला, ऋषभ पंतसारख्या खेळाडूची जागा तुम्ही कधीच घेऊ शकत नाही. ऋषभ पंत सारखे खेळाडू झाडांवर येत नाहीत. आयपीएल पर्यंत तो फिट होतो की नाही, हे आम्ही पाहणार आहे. तो जर शारीरिकदृष्ट्या मैदानामध्ये उतरण्यास सक्षम होऊ शकला नाही, तर आम्ही त्याला ड्रेसिंग रूममध्ये ठेवणं पसंत करेन. खेळाडू आणि कॅप्टन म्हणून ऋषभ पंतची जागा कोणीही घेऊ शकत नाही. मात्र तो शारीरिकदृष्ट्या सक्षम नसेल तर, आम्हाला इतर कर्णधाराचा पर्याय निवडावा लागेल.

एका आयसीसी इव्हेंटमध्ये बोलताना रिकी पॉंटिंगने ऋषभ पंतचे तोंड भरून कौतुक केलं. ऋषभ पंत हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. त्यासोबतच तो एक उत्तम कर्णधार देखील आहे. त्याच्या नेतृत्वात खेळाडूंना खेळणं आवडत असल्याचं रिकी पॉंटिंग म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य संघामध्ये तणाव निर्माण करत नसल्याचे पॉंटिंग म्हणाला. एवढेच नाही तर पुढे बोलताना रिकी पाँटिंग म्हणाला, मला खात्री आहे आयपीएलमध्ये ऋषभ पंत पुनरागमन करेल.

रिकी पॉंटिंगने ऋषभ पंतवर केलेल्या या विधानामुळे सोशल मीडियावर आता एकच खळबळ उडाली आहे. एवढ्या कमी वेळेत ऋषभ पंत मैदानावर कसा काय उपलब्ध होऊ शकतो? असा प्रश्न ऋषभ पंतच्या चाहत्यांना पडला आहे. ऋषभ पंतची पूर्णपणे रिकव्हरी न होता जर तो मैदानात उतरला तर हे योग्य होणार नाही. आयपीएलसाठी (IPL 2023) घाई न करता त्याने पूर्णपणे फिट होऊनच मैदानात उतरावं, असं सोशल मीडियावर बोललं जात आहे.

रिकी पॉंटिंग पुढे म्हणाले, जर तो मैदानात उतरण्यासाठी पूर्णपणे फिट झाला नाही, तर आमच्या सोबत ड्रेसिंग रूममध्ये त्याला ठेवणं आम्ही पसंत करेन. पंत सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये असेल तर, खेळाडूंना देखील प्रोत्साहन मिळेल, असं रिकी पाँटिंगचं म्हणणं आहे. ऋषभ डग आऊटमध्ये असावा अशी संघ व्यवस्थापकांची इच्छा असली तरी ऋषभ पंत काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

हे देखील वाचा Gautami Patil: गौतमी पाटील बाबतची ही गोष्ट जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

IND vs NZ: द्विशतकानंतरही तुला संधी का मिळाली नाही? इशान किशनच्या उत्तराने रोहित शर्माची बोलतीच बंद; पाहा व्हिडिओ..

Virat Kohli: इच्छा नसूनही रोहीत शर्मामुळे BCCI ला द्यावा लागतोय विराट कोहलीचा बळी..

Shikhar Dhawan: मिस्टर आयसीसीचे करिअर संपुष्टात; BCCI ने संपवलं शिखर धवनचे करिअर..

Relationship tips: महिलांच्या या पाच अवयवांकडे पुरुष होतात सर्वाधिक आकर्षित; पाचवा आहे खूपच रंजक..

Viral Video: भर रस्त्यावरच तरुणी आली खळीला; बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसून करू लागली घाणेरडा खेळ, पाहा व्हिडिओ..

Wrestling Protest: खेळाडूंच्या रूम समोर रूम घेऊन, दरवाजा उघडा ठेऊन बृजभूषण सिंह करायचा हा घाणेरडे कृत्य..

Amruta fadnavis: मुस्लिम मुलासोबत नवीन करिअर सुरू करणं अमृता फडणवीसांना चांगलंच भोवलं; पाहा काय झालं..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.