Amruta fadnavis: मुस्लिम मुलासोबत नवीन करिअर सुरू करणं अमृता फडणवीसांना चांगलंच भोवलं; पाहा काय झालं..

0

Amruta fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta fadnavis) या कायम चर्चेत असतात. नुकतेच त्यांचे एक गाणे प्रदर्शित झाले. “मुड बना लिया” (mud bana liya) असे या गाण्याचे नाव असून, सध्या सोशल मिडीयावर (social media) हे गाणे धुमाकुळ घालत आहे. विशेष म्हणजे अमृता फडणवीसांनी या गाण्याला केवळ आवाजच दिलेला नाही, तर या गाण्यावर डान्स सुद्धा केला आहे. या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया येत असल्याचं बघायला मिळत आहे. अनेकांनी अमृता फडणवीसांच्या या गाण्याबद्दल कौतूक केले आहे तर दुसरीकडे त्यांना ट्रोल सुद्धा करण्यात आले आहे.

अमृता फडणवीसांच्या आवाजावरुन त्यांना नेहमीच ट्रोल करण्यात येतं. इंटरनेटवर ट्रोलर्स त्यांना ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशातच अमृता फडणवीस यांनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देणारा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला होता. ज्यामध्ये त्यांनी पाश्चिमात्य कपडे परिधान केले होते. तसेच स्पष्ट मराठीत बोलण्याऐवजी, इंग्रजी बोलत असल्यासारख्या आवाजात त्यांनी या व्हिडीओमध्ये सर्वांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांच्या या व्हिडीओमुळे त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. आता त्यात आणखी भर पडली आहे.

नुकताच अमृता फडणवीसांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये त्या मुस्लिम मुलासोबत डान्स करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अमृता फडणवीस ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या आहेत. सोशल मीडियावर सर्वत्र त्यांच्यावर टीका केली जात आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिंदुत्व आणि संस्कृतीच्या मोठ-मोठाल्या गोष्टी करतात, आणि दुसरीकडे त्यांचीच पत्नी मुस्लिम मुलासोबत डान्स करतात. एवढेच नव्हे, तर या त्या पूर्णत: वेस्टर्न लुकमध्ये दिसत आहेत. अशी टीका त्यांच्यावर सोशल मीडियावर होत आहे. त्यामुळे आता अमृता फडणवीसांसोबत देवेंद्र फडणवीसांना सुद्धा नेटकर्‍यांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या मुशीत घडलेले असल्यामुळे, हिंदुत्ववादी नेते अशी देवेंद्र फडणवीसांची ओळख आहे. फडणवीस नेहमीच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर खुलेआम बोलत असतात. हिंदुत्व आणि भारतीय संस्कृती या मुद्द्यांना राजकीय वळण देऊन ते कायम चर्चेत येत असतात. परंतू त्याचवेळी त्यांच्या पत्नीने मात्र मुस्लिम मुलासोबत डान्स केल्याने त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. “एकीकडे कट्टरतावाद, धार्मिक तेढ निर्माण करुन आपली राजकीय पोळी शेकायची आणि त्याचवेळी स्वत: मात्र काही केलं तरी चालतं” फडणवीस अशा पोकळ हिंदुत्वाचे पुरस्कर्ते असल्याची टीका सुद्धा देवेंद्र फडणवीसांवर केली जात आहे.

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. त्यामुळेच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना प्रसिद्धी मिळते. अन्यथा त्यांना कोहोही संधी दिली नसती. याशिवाय सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राच्या एका मोठ्या नेत्याची पत्नी असल्याचे भान सुद्धा त्यांनी ठेवायला हवे. अशी देखील टीका त्यांच्यावर होत आहे. एकीकडे संस्कृतीच्या मोठ-मोठाल्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे मुस्लिम मुलासोबत डान्स करत आपल्या गाण्याचे प्रमोशन करायचे, अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. यादरम्यान हा मुस्लिम मुलगा नेमका कोण आहे? आणि अमृता फडणवीसांनी त्याच्यासोबत डान्स का केला असेल? हा प्रश्न निर्माण होतो.

कोण आहे तो मुलगा

अमृता फडणवीसांसोबत त्या व्हिडीओमध्ये दिसणार्‍या मुस्लिम मुलाचे नाव रियाज अली (Riyaz Ali) आहे. रियाज हा टीक टॉक स्टार (tik tok Star) असून सध्या तो ईन्स्टाग्रामवर रील्स बनवत असतो. विशेष म्हणजे, रियाज केवळ १९ वर्षांचा आहे. मात्र सोशल मिडीयावर तो खुप प्रसिद्ध आहे. रियाजच्या फॉलोअर्सची संख्या प्रचंड आहे. रियाजने टीक टॉकवर व्हिडीओ बनवण्यापासून सुरुवात केली. अल्पावधीतच तो प्रसिद्ध झाला. सोशल मिडीयावर त्याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.

रियाजने थेट उपमुख्यमंत्री यांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. त्याचवेळी त्याने अमृता फडणवीसांसोबत हा व्हडिओ बनवला. मात्र हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, अमृता फडणवीसांना यावरुन जोरदार ट्रोलींगचा सामना करावा लागत आहे. रियाजने देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो सुद्धा त्याच्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले आहेत.

हे देखील वाचा Amruta fadnavis: मकर संक्रांतीच्या या शुभेच्छामुळे अमृता फडणवीस पुन्हा ट्रोल; पाहा व्हिडिओ..

Malaika Arora: मलायका माझ्या आयुष्यात आल्यामुळे आता मला रोज रात्री..,; अर्जन कपूरचे खळबळजनक विधान..

IND vs NZ: द्विशतकानंतरही तुला संधी का मिळाली नाही? इशान किशनच्या उत्तराने रोहित शर्माची बोलतीच बंद; पाहा व्हिडिओ..

Relationship tips: महिलांच्या या पाच अवयवांकडे पुरुष होतात सर्वाधिक आकर्षित; पाचवा आहे खूपच रंजक..

Health Tips: घशात खवखव करत असेल तर हे उपाय; झटक्यात मोकळा होईल घसा..

Chanakya Niti: लग्नापूर्वी या गोष्टींची काळजी घेतल्यास पती-पत्निमध्ये कधीच उद्भवत नाहीत समस्या..

Babar Azam Sexting Video: मित्राच्या गर्लफ्रेंड सोबत बाबर आझमचे तसले व्हिडिओ व्हायरल; क्रिकेट विश्वात एकच खळबळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.