Wrestling Protest: खेळाडूंच्या रूम समोर रूम घेऊन, दरवाजा उघडा ठेऊन बृजभूषण सिंह करायचा हा घाणेरडे कृत्य..

0

Wrestling Protest: सध्या संपूर्ण देशात कुस्ती (Wrestling) हा खेळ चर्चेचा विषय ठरत आहे. महाराष्ट्रात नुकतीच महाराष्ट्र केसरी (maharashtra Kesari) ही स्पर्धा पार पडली. सिकंदर शेख (Sikandar Shaikh) या खेळाडूवर अन्याय झाला असल्याचा आरोप काही कुस्ती प्रेमींकडून करण्यात आला. मात्र राष्ट्रीय पातळीवर सुद्धा कुस्ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. प्रसिद्ध महिला कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) हीने कुस्ती महासंघ आणि बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर महिला खेळाडूंवर शोषण केल्याचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Abuse of female athletes)

भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा खेळाडूंकडून करण्यात आली आहे. यासाठी खेळाडू दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर आंदोलन देखील करत आहेत. भारताची प्रसिद्ध महिला कुस्तीपटू विनेश फोगटने बृजभूषण सिंहवर हे गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे, इतर खेळाडूंचा सुद्धा तिला पाठिंबा आहे. दिल्लीच्या जंतर मंतरवर (Delhi jantar mantar) भारतातील सर्व आघाडीच्या कुस्तीपटूंनी एकत्र येत बृजभूषण सिंहचा निषेध केला आहे. तसेच सिंह यांच्यावर बडतर्फीची कारवाई होईपर्यंत येथून उठणार नसल्याची भूमिका खेळाडूंनी घेतली आहे.

बृजभूषण सिंह यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत अनेक महिला खेळाडूंसोबत गैरवर्तन केले आहे. अतिशय घाणेरडे कृत्य तो महिला खेळाडूंसोबत करत असल्याचे यावेळी विनेश फोगट यांनी सांगितले. बृजभूषण सिंहने माझ्या अनेक सहकारी महिला खेळाडूंवर अन्याय केला आहे. त्याने अनेक महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केले आहे. काही महिला खेळाडूंना तर बृजभूषणच्या कृत्यांबद्दल सांगताना, त्यांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी येते. मात्र त्याविरोधात बोलण्याची त्यांची हिंमत झाली नाही. परंतू आता आम्ही सर्व एकत्र आलो आहोत, आणि एकत्रितपणे आम्ही ही लढाई लढणार असल्याचे विनेश फोगट यांनी सांगितले.

बजरंग पुनिया, साक्षि मलीक यासारख्या इतरही खेळाडूंनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. क्रिडा मंत्रालयाकडून या खेळाडूंना बोलावण्यात आले असल्याची माहिती मिळते आहे. मात्र क्रिडा मंत्रालयाकडे अद्यापपर्यंत याप्रकरणी कोणतीही तक्रार आली नसल्याचे सांगण्यात आले आहे. क्रिडा मंत्रालयाला तक्रार प्राप्त झाल्यानंतरच फेडरेशनच्या अध्यक्षावर कारवाई करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असे क्रिडा मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान बृजभूषण सिंह यांनी यावर मौन सोडले आहे.

बृजभूषण सिंह यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. “माझ्यावर करण्यात आलेला एकही आरोप खरा ठरला तर मला फाशी देण्यात यावी” असे बृजभूषण सिंह म्हणाले आहे. तसेच क्रिडा मंत्र्यांशी यावर बोलणे झाले असून, त्यांना यावर स्पष्टीकरण दिले असल्याचे सुद्धा बृजभूषण सिंह यांनी सांगितले. २२ ते २८ या वयोगटात कुस्तीपटू चमकदार कामगिरी करत असतात. मात्र काही खेळाडूंना विरोध केला असता, त्याचे रुपांतर संतापात झाले. त्यातूनच हे आरोप केले जात असल्याचे सुद्धा बृजभूषण सिंह यांनी सांगितले.

अंशू मलीक या महिला खेळाडूने सुद्धा ब्रिजभूषण सिंहवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहे. आम्हाला मिळालेल्या रूमसमोर रुम घेऊन दरवाजा उघडा ठेवायचे. आणि आमचे शोषण करायचे. असा गंभीर आरोप दिल्लीच्या जंतर नंतर मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या खेळाडूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर केला आहे. त्यांनी अनेक महिला खेळाडूंचे शोषण केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्याची मागनी अंशू मलीक सोबतच सर्व खेळाडूंनी केली आहे. बजरंग पुनिया आणि साक्षी मलीक सारख्या दिग्गज खेळाडूंनी बृजभूषण सिंहवर कारवाईची मागणी केली आहे.

हे देखील वाचा Amruta fadnavis: मुस्लिम मुलासोबत नवीन करिअर सुरू करणं अमृता फडणवीसांना चांगलंच भोवलं; पाहा काय झालं..

Relationship tips: महिलांच्या या पाच अवयवांकडे पुरुष होतात सर्वाधिक आकर्षित; पाचवा आहे खूपच रंजक..

Age for marriage: लग्न करण्याचे योग्य वय जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Alia bhatt pregnant: मुलीच्या जन्मानंतर दोन महिन्यांतच आलिया पुन्हा प्रेग्नंट; पोस्ट करून स्वतः दिली माहिती..

Money laundering case: जॅकलीन, नोरा कशा अडकल्या सुकेशच्या जाळ्यात? जॅकलीनला तर रात्रीत चार वेळा..

digital voter ID: आता घरबसल्या मोबाईलवर डाउनलोड करता येणार डिजिटल मतदार ओळखपत्र; जाणून घ्या प्रोसेस .. 

Chanakya Niti: तुमच्यामध्ये हे चार गुण असतील तर अफाट कष्ट करूनही मिळणार नाही यश..

Electric bike: केवळ इतक्या पैशात आता पेट्रोलच्या टू-व्हीलरला करता येणार ईलेट्रीक बाईक; जाणून घ्या सविस्तर..

Chanakya Niti: कुटुंबात वाईट काळ सुरू होण्यापूर्वी हे पाच संकेत देतात इशारा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.