Alia bhatt pregnant: मुलीच्या जन्मानंतर दोन महिन्यांतच आलिया पुन्हा प्रेग्नंट; पोस्ट करून स्वतः दिली माहिती..

0

Alia bhatt pregnant: अभिनेत्री आलिया भट्टने (alia bhatt) आपल्या मनमोहक अदा आणि उत्कृष्ट अभिनयाने बॉलीवूडवर (Bollywood) आपली छाप पाडली आहे. फिल्म इंडस्ट्रीत पाऊल टाकताच अल्पवाधीतच तिने लोकप्रियता मिळवली. चित्रपटांमधील तिच्या विविध भूमिकांमुळे ती कायम चर्चेत असते. मात्र मागिल वर्षी तिने सर्वांना धक्काच दिला होता. अचानक रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सोबत लग्न करण्याचे तिने जाहीर केले आणि गेल्या वर्षी एप्रीलमध्ये रणबीर आणि आलियाने लग्न केले. (Alia Bhatt Ranbir Kapoor married) लग्नानंतर काही महिन्यातच दुसर्‍या बातमीने सगळ्यांना धक्का बसला. लग्नानंतर दोन महिन्यातच आलिया प्रेग्नंट असल्याची बातमी आली आणि मागिल वर्षी नोव्हेंबरमध्ये तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला.

राहा (Raha) असं आलिया आणि रणवीरच्या मुलीचे नाव आहे. आलिया भट्ट सोशल मिडीयावर (Social media) चांगलीच सक्रीय असते. सोशल मिडीयावर सतत काही ना काही फोटो पोस्ट करत ती तिच्या चाहत्यांना अपडेट देत असते. त्यामुळे राहाचा चेहरा बघण्यासाठी आलियाचे चाहते उत्सुक आहेत. परंतू अद्याप आलियाने राहाचा फोटो पोस्ट केलेला नाही. तसेच अजून दोन वर्ष राहाचा चेहरा कुणालाही दाखवणार नसल्याची भूमिका त्या दोघांनी घेतली असल्याचे समजते. मात्र या दरम्यान आलियाने स्वत:चाच एक फोटो पोस्ट करत नव्या चर्चांना मार्ग करुन दिला आहे.

आलियाने पोस्ट केलेल्या फोटोमुळे बॉलीवूड इंडस्ट्रीत चर्चांना उधाण आले आहे. तिचा हा फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोच्या कमेंटमध्ये चाहत्यांकडून तिला अनेक प्रश्न विचारले जात आहे. आता आलिया आणखी नवीन कुठला धक्का देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. आलियाने पोस्ट केलेल्या या फोटोमधून ती काहीतरी सुचवण्याचा प्रयत्न करते आहे.

पोस्ट केलेल्या फोटोमध्ये आलियाच्या हातात दोन फुलं आहेत. ही दोन फुले तिने तिच्या चेहर्‍यासमोर धरली आहेत. तसेच तिने या फोटोला एक कॅप्शन सुद्धा दिले आहे. ‘2.0 Stay Tuned’ असे या कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे. त्यामुळे ती पुन्हा प्रेग्नंट असल्याचे तिला सुचवायचं असेल असा अंदाज अनेकांनी लावला आहे. तिच्या पोस्टवर या संदर्भात अनेक कमेंट्स सुद्धा आल्या आहेत. आलिया पुन्हा प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना बॉलीवुडमध्ये अक्षरश: उधाण आले आहे.

आलियाने यावर मात्र अद्यापपर्यंत कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे अनेकांना तिच्या उत्तराची अपेक्षा आहे. आलिया तिच्या प्रेग्नंसीमुळे मागील काही दिवसांपासून स्क्रीनपासून लांब आहे. त्यामुळे आलियाचे चाहते तिला पुन्हा एखाद्या नव्या भूमिकेत बघण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र या पोस्टवर तिच्याकडून काय स्पष्टीकरण येते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

हे देखील वाचाChanakya Niti: कुटुंबात वाईट काळ सुरू होण्यापूर्वी हे पाच संकेत देतात इशारा..

Relationship tips: महिलांच्या या पाच अवयवांकडे पुरुष होतात सर्वाधिक आकर्षित; पाचवा आहे खूपच रंजक..

Electric bike: केवळ इतक्या पैशात आता पेट्रोलच्या टू-व्हीलरला करता येणार ईलेट्रीक बाईक; जाणून घ्या सविस्तर..

IND vs NZ: द्विशतकानंतरही तुला संधी का मिळाली नाही? इशान किशनच्या उत्तराने रोहित शर्माची बोलतीच बंद; पाहा व्हिडिओ..

Amruta fadnavis: मुस्लिम मुलासोबत नवीन करिअर सुरू करणं अमृता फडणवीसांना चांगलंच भोवलं; पाहा काय झालं..

Marriage Tips: लग्नापूर्वी दोघांनाही या गोष्टी माहिती असायला हव्याच, अन्यथा महिन्यात तुटू शकतं नातं..

Pan Card: मोठी बातमी! या तारखेपर्यंत करा हे काम अन्यथा Pan Card होईल बंद..

PM Kisan Yojana: म्हणून PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या होतेय कमी; आत्ताच जाणून घ्या, अन्यथा मिळणार नाही १३ वा हप्ता..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.