Pan Card: मोठी बातमी! या तारखेपर्यंत करा हे काम अन्यथा Pan Card होईल बंद..

0

Pan Card: पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे दोन्हीं महत्त्वाचे कागदपत्रं माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहे. या दोन्हीं कागदपत्रांशिवाय आता जीवन जगणे खूप अवघड झालं आहे. जर तुमच्याकडे हे दोन्हीं कागदपत्रं नसतील, तर तुम्हाला पावलोपावली अडचणी येतात, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. जर तुमच्याकडे हे दोन्ही डॉक्युमेंट्स नसतील, तर तुम्हाला व्यवहार देखील करता येत नाहीत. सोबतच सरकारी अनेक योजनांच्या लाभापासून तुम्हाला वंचित राहावे लागते.

अलीकडच्या काळात प्रत्येकाकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड (Pan Card and Aadhar card link) असतं. मात्र या दोन्हीं डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी असल्याचे पाहायला मिळतं. आता हे दोन्ही डॉक्युमेंट्स संलग्न असणं फार आवश्यक आहे. जर तुम्ही देखील अद्याप आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक केलं नसेल, तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. कारण पॅनकार्ड संदर्भात इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून एक महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. ज्या पॅन कार्ड धारकांचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नाही, अशा पॅन कार्ड धारकांनी 31 मार्च 2023 पर्यंत आपले पॅन कार्ड आधारची लिंक करणे अनिवार्य आहे.

जर अजूनही, तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक केलं नसेल, तर लवकरात लवकर करून घेण्याचे निर्देश इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करून देण्यात आले आहेत. 31 मार्च 2023 पर्यंत पॅन कार्ड आधार लिंक करण्याची मुदत देण्यात आली आहे. एक एप्रिल 2023 पासून तुमचं पॅन कार्ड जर आधारशी लिंग नसेल, तर ते रद्द करण्यात येणार असल्यासची सूचना इन्कम टॅक्स डिपार्टमेंट करून देण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर त्याचबरोबर मेघालय आणि आसाम मधील नागरिकांना मात्र यामधून वगळण्यात आले आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (CBDT) या बाबत अपडेट दिली असून, आपल्या आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची मुदत 31 मार्च 2023 पर्यंत दिली आहे. यामधून जम्मू-काश्मीर, आसाम, मेघालय या राज्यातील नागरिकांना त्याबरोबरच जे पॅन कार्डधारक 80 वर्षापेक्षा अधिक आहेत, अशा कार्डधारकांना देखील या नियमातून वगळण्यात आलं आहे. आता आपण पॅन कार्डशी आधार कार्ड कसे लिंक करायचं? त्याचबरोबर आपलं पॅन कार्ड आधार लिंक आहे की नाही हे कसं पहायचं? जाणून घेऊया सविस्तर.

असं करा पॅन कार्ड आधारशी लिंक

तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा ‘ई फायलिंग’ या वेबसाईटवर जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला असणारा Quick links हा पर्याय निवडायचा आहे. हा पर्याय निवडल्यानंतर, तुम्हाला ‘Link Aadhaar’ हा पर्याय पाहायला मिळेल, तुम्हाला बरोबर Link Aadhaar’ वर क्लिक करायचं आहे. Link Aadhaar’ वर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमचं नाव पॅन आणि आधार क्रमांक टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला एक OTP पाठवला जाईल, OTP टाकून सबमिट पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमचे पॅन कार्ड आधार सोबत लिंक होईल

पॅन-आधारशी लिंक आहे का हे कसं तपासायचं?

जर तुम्हाला आपलं पॅनकार्ड आधारशी लिंक आहे की नाही माहीत नसेल, तर चिंता करण्याची आश्यकता नाही. पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही, हे तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन http://www.incometaxindiaefiling.gov.in असं सर्च करायचं आहे. यानंतर तुम्हाला ‘Quick links’ वर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर ‘Link Aadhaar’ वर क्लिक करायचे आहे. इथपर्यंत व्यवस्थित प्रोसेस झाल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक नवीन विंडो ओपन होईल. ज्यामध्ये स्टेटस जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा, असं पाहायला मिळेल. तुम्ही त्यावर क्लिक केल्यानंतर, पॅन आणि आधार डिटेल्स टाकावे लागणार आहेत. नंतर तुम्हाला ‘View Link Aadhaar Status’ या पर्यायावर क्लिक करायचे आहे. ही सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक आहे की नाही हे समजेल.

हे देखील वाचाTata Nexon: आता Tata Nexon मिळतेय दोन लाखांत; जाणून घ्या ऑफर विषयी सविस्तर..

Goutam Adani Vs Elon Musk: अवघ्या एका महिन्यात अदानी एलोन मस्कचा उठवणार बाजार, मस्कला ट्विटर भोवले

SSC CHSL Bharti 2023: स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये या उमेदवारांसाठी 4,500 पदांची मेगा भरती; जाणून घ्या डिटेल्स..

Dhananjay Munde Accident: धनंजय मुंडेंचा भीषण अपघात, गाडीचा चक्काचूर; छाती दोन जाग्यावर फ्रॅक्चर; पाहा व्हिडिओ..

urfi javed: उर्फी जावेदने शोधून काढले संजय आणि चित्रा वाघ कनेक्शन; जाणून घ्या उर्फि जावेद चित्रा वाघ वाद..

Cristiano Ronaldo Salary Breakup: रोनाल्डो कमावणार तासाला 21 लाख रुपये, एवढंच नव्हे तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.