urfi javed: उर्फी जावेदने शोधून काढले संजय आणि चित्रा वाघ कनेक्शन; जाणून घ्या उर्फि जावेद चित्रा वाघ वाद..

0

urfi javed: नवीन वर्षात भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी उर्फी जावेदला (urfi javed) अंगावर घेतल्याने आता चित्रा वाघ यांचीच मोठी गोची झाली आहे. आपल्या आगळ्या-वेगळ्या फॅशन सेन्समुळे दररोज प्रकाशझोतात राहणारी अभिनेत्री उर्फी जावेद तिने देखील चित्रा वाघशी दोन हात केल्याने गेल्या काही दिवसांपासून चित्रा वाघ आणि उर्फी जावेद या दोघांचा वाद (urfi javed and Chitra wagh dispute) सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. चित्रा वाघ यांच्या आरोपाला तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर देत ऊर्फी जावेद हीने चित्रा वाघ यांच्याशी दोन हात केले आहेत.

कसा सुरु झाला वाद

आपल्या आगळ्यावेगळ्या फॅशन सेन्समुळे उर्फी जावेद सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. ऊर्फी जावेद हिच्या कपड्यावर टीका करताना भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार हल्ला चढवताना मारहाणीची देखील भाषा केली. उर्फी जावेद ही विकृत बाई असून, तिचा हा नाच पोलिसांनी रोखायला हवा, असं चित्रा वाघ यांनी म्हंटले. एवढेच नाही, तर चित्रा वाघ यांनी मुंबईच्या रस्त्यांवर उर्फी जावेद ही विकृत बाई न्युडिटी पसरवत असल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार देखील दाखल केली.

चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेला आणि आरोपाला उत्तर देताना उर्फी जावेद तिने देखील जोरदार पलटवार करत जशास तसं उत्तर दिले. आपल्यावर झालेल्या टीकेला आणि आरोपाला उत्तर देताना उर्फी जावेदने चित्रा वाघ यांची हिस्ट्रीच बाहेर काढत, या युद्धाचे रणसिंग फुंकले आहे. चित्रा वाघ यांच्या आरोपाला उत्तर देताना पहिल्यांदा उर्फी जावेद हीने राजकारण्यांना दुसरी कामे नाहीत, का असा सवाल उपस्थित केला. इतरही काही बेकायदेशीर धंदे चालू आहेत, ते बंद करा. बेकायदेशीर डान्सबार बंद करा असा सल्ला चित्रा वाघ यांना उर्फी जावेद यांनी दिला.

नेमकं काय म्हणाली उर्फी जावेद

चित्रा वाघ यांच्या उत्तराला प्रत्युत्तर देताना काल उर्फी जावेद यांनी चित्रा वाघ यांचे प्रकरण बाहेर काढलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पार्टीत का गेल्या याविषयी देखील उर्फी जावेदने भाष्य केले. एवढेच नाही, तर चित्रा वाघ यांना संजय राठोड यांची आठवण देखील करून दिली. जेव्हा संजय राठोड विरोधात होते, तेव्हा संजय राठोड यांच्यावर सातत्याने आरोप करणाऱ्या चित्रा वाघ यांची आता संजय राठोड यांच्यावरोबर चांगली मैत्री झाली आहे.

आता मी देखील लवकरच भारतीय जनता पार्टी जॉईन करणार आहे. त्यानंतर मी देखील चित्रा वाघ यांची चांगली मैत्रीण होईल. असा उपरोधिक टोला देखील उर्फी जावेद यांनी चित्रा वाघ यांना लगावल्याने आता हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर उर्फी जावेद यांनी चित्रा वाघ यांच्या नवऱ्याचे प्रकरण बाहेर आल्यामुळे त्यांनी बीजेपी जॉईन केली. असं देखील म्हणत, उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना चांगलेच डिवचले आहे. उर्फी जावेदच्या हल्ल्यावर चित्रा वाघ यांची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.‌

हे देखील वाचा MPSC Recruitment 2023: MPSC मार्फत या पदांसाठी हजाराहून अधिक जागांची मेगा भरती..

Chanakya Niti: या गोष्टीत पत्नीचे समाधान नाही झाले तर पैशाची चणचण सतत भासते..

Rishabh Pant Update: यामुळे ऋषभ पंतला इन्फेक्शनची शक्यता; जाणून घ्या रुग्णालयातली अपडेट..

Railway Bharti: भारतीय रेल्वेत 4 हजाराहून अधिक पदांची मेगा भरती; दहावीसह या उमेदवारांना संधी..

Maharashtra Forest Recruitment 2023: बारावी पाससाठी वनविभागात 9 हजाराहून अधिक जागांची मेगा भरती; जाणून घ्या डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.