Chanakya Niti: या गोष्टीत पत्नीचे समाधान नाही झाले तर पैशाची चणचण सतत भासते..

0

Chanakya Niti: एक महान विद्वान, नीतितज्ञ, रणनीतीकार, अर्थतज्ञ, अशी आचार्य चाणक्य यांची ओळख आहे. हजार वर्षांपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेला चाणक्य नीति (Chanakya niti) या ग्रंथांमध्ये अशा अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे, ज्याच्या माध्यमातून माणूस आपले जीवन उज्वल बनवू शकतो. चाणक्य यांच्या नीतिशास्त्राचा अवलंब केला, तर माणूस अनेक संकटातून सहजरित्या बाहेर पडू शकतो. एवढेच नाही तर, ज्यांना आचार्य चाणक्यांची चाणक्य नीती माहीत आहे, असा मनुष्य कोणतेही चुकीचे काम करण्यापूर्वी हजार वेळा विचार करतो.

प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये लक्ष्मीची कृपा राहावी असं वाटत असते. आपण देखील इतरांप्रमाणे खूप श्रीमंत असावं, आपल्याकडे देखील मुबलक पैसा असावा असं अनेकांना वाटतं. यात गैर देखील काही नाही. मात्र त्यासाठी तुम्हाला काही नीतीचा अवलंब करावा लागतो. जर तुम्ही चार गोष्टीच्या चुकूनही जवळ गेला नाहीत तर, तुमच्यावर लक्ष्मीची कृपा राहते. असं आचार्य चाणक्य सांगतात. कोणत्या आहेत त्या चार गोष्टी? जाणून घेऊया सविस्तर.

आचार्य चाणक्य यांच्यामध्ये मनुष्यामध्ये जर लोभ, आळस, महिलांचे समाधान, क्रोध, सतत लोकांचा अपमान करण्याची भावना असेल, तर तुमच्या आयुष्यातून लक्ष्मी निघून जाते. यासोबतच मनुष्याने जर आणखी तीन गोष्टीचं पालन केलं नाही, पत्नी सोबत तो प्रामाणिक नसेल, आणि तो बाहेर आपला आनंद, समाधान शोधत असेल तर, अशा पुरुषांवर लक्ष्मी नाराज राहते. लक्ष्मी नाराज होण्याची कोणती कारणे आहेत? जाणून घेऊया, आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या चार गोष्टींविषयी सविस्तर.

पत्नी समाधानी 

आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) यांच्या म्हणण्यानुसार, एखादा पुरुष जर आपल्या पत्नीला सुख आणि समाधान देऊ शकत नसेल, आणि इतर महिलांमध्ये तो आपला आनंद आणि समाधान शोधत असेल, तर अशा पुरुषांवर लक्ष्मी नेहमी नाराज राहते. अशा पुरुषांना एक-एक रुपयासाठी झगडावं लागतं. आचार्य चाणक्य यांच्यामध्ये जो पुरुष आपल्या पत्नीला प्रसन्न ठेवू शकत नाही, त्या पुरुषांवर लक्ष्मी नेहमी नाराज राहते.

लोभी मनुष्याच्या आयुष्यात देखील लक्ष्मीचा वास नसतो असं आचार्य चाणक्य सांगतात. जो मनुष्य कोणत्याही मार्गाने पैसा कमावण्याचा विचार करतो, लोकांची फसवणूक करतो. कितीही संपत्ती आली तरी देखील त्याचा लोभ सुटत नसेल तर, अशा मनुष्यावर देखील लक्ष्मी नाराज राहते. आचार्य चाणक्य सांगतात, अशा मनुष्यांना कधीही समाधान आणि आनंद शोधता येत नाही. कालांतराने अशा मनुष्याच्या आयुष्यातून संपत्ती देखील नाहीशी होत राहते. असे आचार्य चाणक्य सांगतात.

आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या मनुष्यामध्ये आळस असतो, अशा लोकांच्या आयुष्यात लक्ष्मी कधीच वास करत नाही. जो मनुष्य चंचल असेल, स्वच्छता राखत असेल, त्याचबरोबर कोणत्याही कामात कधीच आळस करत नसेल तर, अशा मनुष्याच्या आयुष्यात लक्ष्मीची खूप मोठ्या प्रमाणात कृपा असते. आपल्या कामांपासून सतत दूर पळणाऱ्या लोकांवर लक्ष्मीची अजिबात कृपा नसते. असे लोक नेहमी आजारी आणि कर्जबाजारी असतात, असे आचार्य चाणक्य सांगतात.

आचार्य चाणक्य सांगतात जो मनुष्य तापट असतो, जो मनुष्य मीपणाने वागतो, अशा मनुष्यांच्या आयुष्यात देखील लक्ष्मीची कृपा नसते. लोकांना सतत अपमानित करत राहणं, वडीलधाऱ्या माणसांचा आदर न ठेवणे, असा लोकांना नेहमी त्यांच्या आयुष्यामध्ये पैशाची चमचम भासत राहते. आचार्य चाणक्य सांगतात, मनुष्य त्यांच्या जीवनामध्ये जर वारंवार खोटं बोलत असेल, लोकांना फसवत असेल, तर अशा लोकांना देखील लक्ष्मी दुर्लक्षित करते.

हे देखील वाचाRishabh Pant Update: यामुळे ऋषभ पंतला इन्फेक्शनची शक्यता; जाणून घ्या रुग्णालयातली अपडेट..

Railway Bharti: भारतीय रेल्वेत 4 हजाराहून अधिक पदांची मेगा भरती; दहावीसह या उमेदवारांना संधी..

Maharashtra Forest Recruitment 2023: बारावी पाससाठी वनविभागात 9 हजाराहून अधिक जागांची मेगा भरती; जाणून घ्या डिटेल्स..

MSRTC Recruitment 2023: दहावी पास उमेदवारांसाठी एसटी महामंडळात निघाली मोठी भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

MPSC Recruitment 2023: MPSC मार्फत या पदांसाठी हजाराहून अधिक जागांची मेगा भरती..

PM Kusum Yojana: आता मागेल त्याला दिला जाणार सौर पंप; जाणून घ्या सौर पंप मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.