Maharashtra Forest Recruitment 2023: बारावी पाससाठी वनविभागात 9 हजाराहून अधिक जागांची मेगा भरती; जाणून घ्या डिटेल्स..

0

Maharashtra Forest Recruitment 2023: महागाई आणि बेरोजगारीच्या (inflation and unemployment) ये दुनियेत नोकरी (nokari) मिळवणं आणि करणं खूप आवश्यक झालं आहे. बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात असली तरी आता अनेक विभागात नोकरीच्या संधी उपलब्ध देखील होत आहेत. जर तुम्ही देखील नोकरीच्या शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. महाराष्ट्र वन विभागात (Maharashtra Forest) नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली असून, या संदर्भातली अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र वन विभागांतर्गत वनरक्षक या पदासाठी ही भरती केली जाणार असून, तब्बल नऊ हजार सहाशे चाळीस रिक्त पदांची भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र वन विभागात वनरक्षक (forest guard) या पदासाठी करण्यात येणाऱ्या 90640 रिक्त जागांसाठी आता इच्छूक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. महाराष्ट्र वन विभाग मार्फत वनरक्षक या पदासाठी करण्यात येणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांची पात्रता जाणून घ्यायची झाल्यास, कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून उमेदवाराने बारावी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र वन विभागात वनरक्षक या पदासाठी करण्यात येणाऱ्या या भरतीसाठी माजी सैनिक त्याचबरोबर नक्षलवाद्यांच्या हल्यामध्ये शहीद झालेले, किंवा गंभीर जखमी झालेले कर्मचारी, तसेच वन कर्मचा-याची मुलं देखील या भरतीसाठी पात्र असणार आहेत. या उमेदवारांना देखील शिक्षणाची अट ठेवण्यात आली आहे. मात्र या उमेदवारांना या भरतीमध्ये अधिक सवलत असणार आहे.

पगार आणि शारीरिक पात्रता 

महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत केल्या जाणाऱ्या वनरक्षक या पदासाठी उमेदवारांचा मासिक पगार आणि उमेदवारांची शारीरिक पात्रता काय ठेवण्यात आले आहे? हे देखील जाणून घेऊ. वनरक्षक या पदासाठी उमेदवारांना 20000 ते 25 हजार रुपये दरमहा पगार मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेबरोबर शारीरिक पात्रतेची देखील पूर्तता करणे आवश्यक आहे. शारीरिक पात्रता काय आहे? हे देखील आपण सविस्तर जाणून घेऊ.

शारीरिक पात्रता

महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत वनरक्षक या पदासाठी भरण्यात येणाऱ्या 90640 रिक्त जागांसाठी जर तुम्ही पुरुष असाल, तर तुमची उंची 163cm असणे आवश्यक आहे. जर तुम्ही महिला असाल, तर तुमची उंची 150cm असणे आवश्यक आहे. पुरुषांची छाती 79 सेंटीमीटर ठेवण्यात आली आहे. तर फुगवून 84cm ठेवण्यात आली आहे. महिलांसाठी देखील हाच नियम ठेवण्यात आला आहे. एसटी उमेदवारांसाठी उंचीची मर्यादा 152.5 निश्चित करण्यात आली आहे. तर महिलांसाठी 145 ठेवण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज

महाराष्ट्र वन विभाग अंतरा अंतर्गत वनरक्षक या पदासाठी करण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 31 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. या भरती प्रक्रियेसंदर्भातील जाहिरात 15 जानेवारीला प्रकाशित करण्यात येणार आहे. सोबतच या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा ही 1 ते 20 फेब्रुवारी या कालावधीमध्ये पार पडणार आहे. याबरोबर ऑनलाइन परीक्षेचा निकाल हा 25 फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहे. पाच ते वीस मार्च यादरम्यान उमेदवारांची आवश्यक चाचणी घेण्यात येणार आहे.

या सर्व परीक्षा झाल्यानंतर, उमेदवारांच्या निवडीची यादी 15 एप्रिल 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांचे जॉईनींग 30 एप्रिल 2023 पर्यंत करण्यात येणार आहे. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://mahaforest.gov.in/ असं सर्च करायचं आहे. त्यांनतर महाराष्ट्र वन विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल.

हे देखील वाचा MSRTC Recruitment 2023: दहावी पास उमेदवारांसाठी एसटी महामंडळात निघाली मोठी भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

MPSC Recruitment 2023: MPSC मार्फत या पदांसाठी हजाराहून अधिक जागांची मेगा भरती..

​​IOCL Recruitment 2022-23: या उमेदवारांसाठी इंडियन ऑइलमध्ये दीड हजारांहून अधिक पदांची मेगा भरती..

CR Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांसाठी सेंट्रल रेल्वेत हजारो पदांची मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

PM Kusum Yojana: आता मागेल त्याला दिला जाणार सौर पंप; जाणून घ्या सौर पंप मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया..

PMGKAY: मोफत रेशनच्या नियमात सरकारने केला मोठा बदल; आता रेशन मिळणार इतके..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.