Rishabh Pant Update: यामुळे ऋषभ पंतला इन्फेक्शनची शक्यता; जाणून घ्या रुग्णालयातली अपडेट..

0

Rishabh Pant Update: भारताचा विकेटकीपर आणि स्टार फलंदाज ऋषभ पंतचा (Rishabh pant) 30 डिसेंबरला दिल्लीहून डेहराडूनकडे जाताना रुडकीच्या (Roorkee) ‘गुरुकुल नरसन’ (Gurukul Narsan) परिसरात पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी भीषण अपघात झाला. अवघ्या पाच मिनिटात गाडीने पेट घेऊन देखील ऋषभ पंतचा जीव वाचला. सध्या त्याच्यावर डेहराडून मधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये (dehradun Max hospital) उपचार सुरू आहेत. ऋषभ पंतच्या जीवाला कोणताही धोका नाही, मात्र त्याला जबर मार लागल्याने त्याची पूर्णपणे रिकव्हर होण्यासाठी पाच सहा महिने कालावधी लागणार असल्याचं डॉक्टरांचं म्हणलं आहे.

ऋषभ पंतच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नसून, त्याच्या डोक्याचे आणि पाठीचे एमआरआय नॉर्मल आले आहेत. एकीकडे ही सुखावणारी बातमी असली तरी, दुसरीकडे मात्र ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी आता समोर आली आहे. ऋषभ पंत ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे, त्या हॉस्पिटलमध्ये आता पंतला भेटण्यासाठी अनेक जण येऊ लागल्याने त्याला पूर्णपणे विश्रांती मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता ऋषभ पंतचे नातेवाईक देखील चिंतेत आहेत.

ऋषभ पंतवर उपचार करत असलेले वैद्यकीय जे पथक आहे, त्यामधील एका सदस्याने माध्यमांशी बोलताना या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे. ऋषभ पंतची रिकवरी होण्यासाठी त्याला पूर्णपणे विश्रांतीची आवश्यकता आहे. शारीरिक त्याचबरोबर मानसिक विश्रांतीमुळे त्याची रिकव्हरी लवकर होऊ शकते. मात्र हॉस्पिटलमध्ये अनेक जण त्याला पाहण्यासाठी ये जा करत असल्याने, त्याला पुरेशी विश्रांती मिळत नाही. अपघातामध्ये झालेल्या जखमांच्या अजूनही त्याला वेदना होत आहेत.

हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी आलेल्या लोकांना ऋषभ पंत बोलत असल्याने, त्याची एनर्जी खर्च होते. हॉस्पिटलमध्ये जर त्याची एनर्जी वाचली, तर त्याला लवकर बरे होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे त्याला भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांनी देखील ही बाब लक्षात घेऊन, त्याला आराम करू द्यावा. ऋषभ पंत बरा झाल्यानंतर, तुम्हाला त्याची भेट घेऊन विचारपूस करता येऊ शकते. ऋषभ पंतला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी होत असलेल्या गर्दीमुळे दिल्ली क्रिकेट संघटनेचे काही पदाधिकारी देखील नाराज असून, ऋषभ पंतला संसर्ग होण्याची भीती त्यांनी देखील व्यक्त केली आहे.

ऋषभ पंतला हॉस्पिटलमध्ये अनेकजण भेटण्यासाठी येतात. त्याचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे, हे खरं आहे. मात्र हे जर असंच राहिलं, तर सततच्या भेटण्याने त्याला संसर्ग होऊ शकतो. असं म्हणत दिल्ली क्रिकेट संघटनेचे संचालक शाम शर्मा यांनी भीती व्यक्त केली आहे. ऋषभ पंत आता ठीक आहे. तो उपचाराला योग्य प्रतिसाद देखील देत आहे. BCCI ची मेडिकल टीम मॅक्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या संपर्कात देखील आहे.

दिल्ली क्रिकेट संघटनेचे संचालक शाम शर्मा (shyam Sharma) ऋषभ पंतच्या अपघातावर बोलताना म्हणाले, तो रस्त्यात पडलेला खड्डा चुकवायला गेल्याने हा अपघात झाला. त्याच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर प्लॅस्टिक सर्जरी केली असून, तो उपचाराला देखील उत्तम प्रतिसाद देत आहे. त्याच्या गुडघ्याच्या उती फाटली असल्याने त्याला रिकवरीसाठी काही महिने कालावधी लागणार आहे. ऋषभ आयपीएल (ipl) आणि बॉर्डर गावस्कर टेस्ट (border gavaskar test series) सिरीजला देखील मुकणार आहे.

दिग्गज पंतच्या भेटीला

मॅक्स हॉस्पिटलमध्ये रुग्णांना भेटण्यासाठी सकाळी अकरा ते दुपारी १ आणि संध्याकाळी ४ ते ५ ही वेळ ठेवली आहे. मात्र ऋषभ पंतला दिवसभर कोणीतरी भेटण्यासाठी येतच असतं. यामुळे त्याला पुरेशी विश्रांती मिळत नाही. दोन दिवसापूर्वी अनुपम खेर आणि अनिल कपूर देखील भेटण्यासाठी गेले होते. नितीश राणाही कुटुंबासह पंतला भेटण्यासाठी आला होता. DDCA क्रिकेट टीमने देखील पंतची विचारपुरस केली.

हे देखील वाचा Rishabh Pant Car Accident: पंतला भल्या पहाटे दिल्लीवरून डेहराडूनला अचानक जाण्याची वेळ का आली; धक्कादायक माहिती समोर..

Rishabh Pant: शिखर धवनने ऋषभ पंतला गाडी हळू चालवायला सांगितलं होतं, तरीही ऐकलं नाही; व्हिडिओ झाला व्हायरल..

Railway Bharti: भारतीय रेल्वेत 4 हजाराहून अधिक पदांची मेगा भरती; दहावीसह या उमेदवारांना संधी..

Maharashtra Forest Recruitment 2023: बारावी पाससाठी वनविभागात 9 हजाराहून अधिक जागांची मेगा भरती; जाणून घ्या डिटेल्स..

MSRTC Recruitment 2023: दहावी पास उमेदवारांसाठी एसटी महामंडळात निघाली मोठी भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

MPSC Recruitment 2023: MPSC मार्फत या पदांसाठी हजाराहून अधिक जागांची मेगा भरती..

CR Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांसाठी सेंट्रल रेल्वेत हजारो पदांची मेगा भरती; असा करा ऑनलाईन अर्ज..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.