Rishabh Pant Car Accident: पंतला भल्या पहाटे दिल्लीवरून डेहराडूनला अचानक जाण्याची वेळ का आली; धक्कादायक माहिती समोर..

0

Rishabh Pant Car Accident: काल पहाटे दिल्लीवरून डेहराडूनला जात असताना ऋषभ पंतचा दुर्दैवी अपघात झाला. एवढ्या मोठ्या स्टार खेळाडूच्या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरली. ऋषभ पंतचे चाहते या धक्क्यातून स्वतःला अजूनही सावरू शकले नाहीत. ऋषभ पंतचा भीषण अपघातात जीव वाचला हीच खूप मोठी गोष्ट असल्याचं अपघात पाहून प्रत्येकजण मान्य करत आहे. आता ऋषभ पंतच्या जीवाला कोणताही धोका नसला तरी त्याला खूप मोठ्या प्रमाणात जखम झाली आहे. त्याच्या डोक्याचे आणि पाठीचे एमआरआय केले असून, सुदैवाने सगळे रिपोर्ट नॉर्मल आले आहेत.

ऋषभ पंतवर सध्या डेहराडून मधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये (dehradun Max hospital) उपचार सुरू आहेत. लवकरच ऋषभ पंतला मुंबईमध्ये शिफ्ट करण्यात येणार असल्याची देखील माहिती आहे. ऋषभ पंतचा हा एक्सीडेंट कसा झाला? तो कसा वाचला? त्याला किती दुखापत झाली आहे? याविषयी आता अनेकांना माहिती पडलं आहे. मात्र एवढा मोठा स्टार असताना ऋषभ पंतला अचानक भल्या पहाटे दिल्लीहून डेहराडूनला जाण्याची वेळ का आली, या संदर्भात अनेक तर्क वितर्क लावले जात असतानाच, महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

ऋषभ पंत हा खूप मोठा स्टार क्रिकेटर आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. महेंद्रसिंग धोनीसह अनेक दिग्गजांना जमलं नाही, ते ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये अवघ्या एक-दोन वर्षात करून दाखवलं आहे. आपल्या खांद्यावर एवढी मोठी जबाबदारी असताना देखील ऋषभ पंतला अचानक भल्या पहाटे एकट्याला गाडी घेऊन का निघावं लागलं. या दिवसांत दिल्ली डेहराडून मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात धुकं पडतं. पंतला माहीत असतानाही तो असा एकटा एवढ्या रात्री का निघाला?

एका मीडिया रिपोर्टनुसार, ऋषभ पंत आणि त्याची आई सरोज पंत (Saroj Pant) या दोघांमध्ये आदल्या दिवशी फोनवर चर्चा झाली होती. आता सुट्टी आहे, सुट्टी असून, देखील तू आम्हाला वेळ देत नाही. अशी तक्रार देखील ऋषभ पंतची आई सरोज पंतने ऋषभ पंतकडे केली होती. ऋषभ पंत दुबईमध्ये असताना त्याचा आणि आईचा फोन झाला होता. आणि तेव्हा या दोघांमध्ये ही चर्चा झाल्याचं एका मीडिया रिपोर्टने म्हटलं आहे.

ऋषभ पंत आणि त्याची आई या दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर, ऋषभ पंत लगेच दुबईहून दिल्लीला आला. दिल्लीला आल्यानंतर, पहाटे तो डेहराडून मधील रुडकी (Roorkee) मधील आई राहते, त्या घरी निघाला. आईला सरप्राईज देण्यासाठी त्याने मी घरी येत असल्याचं सांगितलं नाही. नवीन वर्ष एकत्र सेलिब्रेशन करायचं, असा ऋषभ पंचा प्लॅन होता. आदल्या दिवशी दुबईहून दिल्लीला प्रवास केल्याने ऋषभ पंची रेस्ट पुरेशी झाली नव्हती. मात्र आई सोबत बोलणं झाल्यानंतर, आईला सरप्राईज देण्यासाठी ऋषभ पंतने या सर्व गोष्टींचा किंचितही विचार केला नाही.

आपल्या आईच्या प्रेमापुढे ऋषभ पंतला कोणतंही संकट दिसलं नाही. नवीन वर्षाचं सेलिब्रेशन आपल्या परिवारासोबत करण्यासाठी ऋषभ पंत आई राहते, त्या रूडकी या घरी निघाला होता. मात्र गाडी चालवत असताना डुलकी लागल्याने त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले. आणि गाडी डिव्हायडरला धडकून मोठा अपघात झाला. आपल्या आईच्या प्रेमाखातर ऋषभ पंतने दिल्ली आणि डेहराडून हे अंतर जवळपास 180 किमी असतानाही जाण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्याचं हे सरप्राइज पूर्ण होऊ शकलं नाही.

हे देखील वाचाKL Rahul Athiya Shetty: राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या लग्नापूर्वीच हॉटेलमधला तो व्हिडिओ झाला व्हायरल; पाहा व्हिडिओ..

Kiara Advani Sidharth Malhotra Marriage: कियारा अडवाणी सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाची तारीख ठरली; जाणून घ्या कुठे आणि कसं होणार लग्न..

Rishabh Pant Car Accident: ऋषभ पंतच्या मेंदू आणि पाठीच्या कण्यावर मोठी अपडेट; चाहत्यांना चिंता आता..

Rishabh Pant Car Accident: पंत वेदनेने विव्हळत असताना मदत करायची सोडून लोकं पैशाची बॅग घेऊन पळाले? पाहा व्हिडिओ..

Rishabh pant car accident Video: ..म्हणून झाला ऋषभ पंतचा अपघात; शुद्धीवर आल्यानंतर ऋषभ पंतने सांगितला घटनाक्रम..

Chanakya Niti: या चार गोष्टींमुळे आयुष्यातून निघून जाते लक्ष्मी; प्रचंड मेहनत करूनही मिळत नाही यश..

Relationship Tips: संबंध करताना या 5 गोष्टींतून कळते तुमचा पार्टनर मनापासून साथ देतोय का..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.