Rishabh Pant Car Accident: ऋषभ पंतच्या मेंदू आणि पाठीच्या कण्यावर मोठी अपडेट; चाहत्यांना चिंता आता..

0

Rishabh Pant Car Accident: भारताचा स्टार क्रिकेटपटू (Indian Star cricketer) ऋषभ पंतचा (Rishabh Pant) काल पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी दिल्लीवरून डेहराडूनला (Delhi dehradun) आपल्या रुडकी या घरी जात असताना गुरुकुल नरसन परिसरात भीषण अपघात झाला. ऋषभ पंतच्या अपघाताची बातमी वाऱ्यासारखे पसरली. ऋषभ पंतच्या जीवाला आता कसलाही धोका नसला तरी, त्याला खूप मोठ्या प्रमाणात मार लागला आहे. आदल्या दिवशी दुबईवरून (Dubai) ऋषभ पंत दिल्लीत आला होता. पुरेशी झोप झाली नसताना देखील नवीन वर्ष परिवारासोबत घालवण्यासाठी तो आपली आई राहत असणाऱ्या रुडकी (Roorkee) या घरी निघाला होता. (Rishabh pant car burning)

आदल्या दिवशी दुबईवरून प्रवास करून दिल्लीला आल्यानंतर पुरेशी झोप न होता ऋषभ पंत आईला सरप्राईज देण्यासाठी आई राहत असणाऱ्या ‘रुडकी’ या घरी निघाला. मात्र डूलकी लागल्याने त्याचा गाडीवरचा ताबा सुटला. आणि भरधाव वेगाने असणारी गाडी रोडच्या डिव्हायडरला आढळली. गाडीचा वेग प्रचंड असल्याने, गाडी विमानासारखी हवेत तब्बल दोनशे मीटर डिव्हायडर तोडत गेली असल्याचं, प्रथम दर्शनी बस ड्रायव्हर सुशीलकुमार यांनी माध्यमांना बोलताना सांगितले. (Bus driver Sushil Kumar)

अपघात झाल्यानंतर काही मिनिटांनी ऋषभ पंतला जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. सरकारी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर, ऋषभ पंतला आता डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये (dehradun Max hospital) भरती करण्यात आलं असून, मॅक्स हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ऋषभ पंतची पाठ रोडबरोबर खूप मोठ्या प्रमाणात घासल्याने त्याच्या पाठीची प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे. सोबतच कपाळावर देखील दोन कट असल्याने चेहऱ्याची देखील प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे.

ऋषभ पंतच्या पाठीला, डोक्याला, पायाला, हाताला, घोट्याला प्रचंड दुखापत झाली असल्याने त्याला रिकव्हरीसाठी आता किमान एक वर्ष तरी क्रिकेट पासून दूर राहावं लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता ऋषभ पंतच्या चाहत्यासाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ऋषभ पंतच्या डोक्याचा आणि पाठीचा MRI करण्यात आला आहे. चाहत्यांच्या आशीर्वादाने ऋषभ पंतच्या मेंदूला आणि पाठीच्या कण्याला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. डोक्याचा आणि पाठीचा ‘MRI हा नॉर्मल आला असल्याने तो लवकरच कम बॅक करू शकतो.

शारीरिक दुखापत काही वेळानंतर पूर्वीप्रमाणे होत असते. मात्र शरीराच्या आतील दुखापत ही आयुष्यभर तुमच्या बरोबरच राहते. साहजिकच यामुळे अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. यामध्ये डोक्याची दुखापत ही प्रचंड नाजूक असते. डोक्याची जखम हा सगळ्यात महत्त्वाचा भाग मानला जातो. डोक्याला जर दुखापत असेल, आणि मेंदूला काही इजा असेल तर पुन्हा उभा राहणं जवळजवळ अशक्य असतं. सुदैवाने ऋषभच्या डोक्याचे आणि पाठीचे सर्व MRI नॉर्मल आले आहेत. तमाम भारतीयांसाठी ही अपडेट समाधान आणि आनंद देणारी आहे.

मात्र दुसरीकडे ऋषभ पंतचा घोटा, हाताचे मनगट, गुडघा या अवयवांना मात्र जबर दुखापत झाली आहे. या भागावर काल खूप मोठ्या प्रमाणात सूज आणि पेन देखील होता. यामुळे या सर्व भागाचे एमआरआय करण्याचं डॉक्टरांनी टाळले आहे. आज या सर्व भागाचे एमआरआय करण्यात येणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतचे मनगट आणि गुडघा फ्रॅक्चर होण्याची अधिक शक्यता आहे. जरी असं असलं, तरी देखील काही वेळानंतर, पुन्हा पूर्व स्थितीत येऊ शकतात. अर्थात यामुळे पंत लवकरच चाहत्यांना मैदानात पाहायला मिळणार आहे.

हे देखील वाचाRishabh Pant Car Accident: पंत वेदनेने विव्हळत असताना मदत करायची सोडून लोकं पैशाची बॅग घेऊन पळाले? पाहा व्हिडिओ..

Rishabh Pant Car Accident: गुडघा मनगट घोटा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे ऋषभ पंतची कारकीर्द संपुष्टात? तब्बल इतके वर्ष राहणार क्रिकेट पासून दूर..

Rishabh Pant: शिखर धवनने ऋषभ पंतला गाडी हळू चालवायला सांगितलं होतं, तरीही ऐकलं नाही; व्हिडिओ झाला व्हायरल..

Rishabh pant accident video: घायल होता, अंगावर कपडे नव्हती, तरीही लोकं व्हिडिओ काढत होती; तेवढ्यातूनही पंत म्हणाला बंद कर..; पाहा व्हिडिओ..

Rishabh pant car accident Video: ..म्हणून झाला ऋषभ पंतचा अपघात; शुद्धीवर आल्यानंतर ऋषभ पंतने सांगितला घटनाक्रम..

Rishabh pant car accident: ऋषभ पंतचा भीषण अपघात; संपूर्ण कार जळाली कसाबसा बाहेर आला पण..; पाहा अपघाताचे CCTV फुटेज..

PM Kusum Yojana: आता मागेल त्याला दिला जाणार सौर पंप; जाणून घ्या सौर पंप मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया..

PMGKAY: मोफत रेशनच्या नियमात सरकारने केला मोठा बदल; आता रेशन मिळणार इतके..

MSRTC Recruitment 2022: राज्य महामंडळात मेगा भरती! दहावीसह या उमेदवारांना करता येणार कर्ज..

MPSC Recruitment 2023: MPSC मार्फत या पदांसाठी हजाराहून अधिक जागांची मेगा भरती..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.