Rishabh pant car accident: ऋषभ पंतचा भीषण अपघात; संपूर्ण कार जळाली कसाबसा बाहेर आला पण…; पाहा अपघाताचे CCTV फुटेज..

0

Rishabh pant car accident: भारताचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंतचा (Rishabh pant) भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने तो बचावला गेला असून, डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये (dehradun Max hospital) त्याच्यावर उपचार सुरू आहेत.  आज पहाटे रुरकीच्या गुरुकुल नरसन परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. स्थानिक लोकांनी लगेच ऋषभ पंतला रुग्णालयात दाखल केले. अपघात इतका भीषण होता, की काही मिनिटात कार संपूर्ण जळून खाक झाली आहे. हा एक्सीडेंट कसा झाला? मी कसा वाचलो हे ऋषभ पंतने आता स्वतः सांगितलं आहे.

काच तोडून पंत आला बाहेर

हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर, ऋषभ पंतने हा एक्सीडेंट कसा झाला याविषयी सविस्तर सांगितलं आहे. पहाटे माझी झोप लागल्याने एक्सीडेंट झाल्याचे ऋषभ पंत म्हणाला आहे. झोप लागल्याने गाडी रस्त्याच्या डिव्हायडरला धडकल्याने पलटी झाली. आणि हा भीषण अपघात झाला. या अपघाताचे आता सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले असून, काही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात. भीषण अपघात झाल्यानंतर गाडी पलटी झाली, गाडीने पाच मिनिटांनी पेट घेतला. मात्र काच तोडून ऋषभ पंत वेळीच बाहेर आला, आणि थोडक्यात बचावला.

पाय मोडला डोक्याला मार

या भीषण अपघातात ऋषभ पंचा जीव वाचला असला तरी त्याला गंभीर दुखापत देखील झाली आहे. गाडीने पेट घेतल्यानंतर ऋषभ पंत गाडीची काच तोडून बाहेर आला, मात्र तोपर्यंत त्याच्या पाटीला आग लागली होती. पाठीला आग लागल्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र महाराष्ट्र लोकशाही प्रिन्सिपल आणि ईथिक्स पाळत असल्याने हे व्हिडिओ शेअर करत नाही. स्थानिकांनी लगेच ऋषभ पंत ला ओळखून 108 नंबर वर कॉल केला आणि हॉस्पिटलमध्ये भरती केले.

ऋषभ पंचा दुखापतीवर आता अपडेट आले असून, ऋषभ पंचा पाय देखील फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे. पाठीला आग लागल्याने पाठीची प्लास्टिक सर्जरी देखील करावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. ऋषभ पंचा डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली आहे. ऋषभ पंतलया सगळ्यातून सावरण्यासाठी आता दोन वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र ऋषभ पंत इतर कोणत्याही धोक्यापासून आता दूर आहे.

CCTV फुटेज समोर

ऋषभ पंत झालेल्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ऋषभ पंत गाडी चालवत असताना त्याला झोप लागली आणि कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या डिव्हायडरला आढळली. नंतर गाडी उलटली आणि काही मिनिटात गाडीने पेट घेतला. गाडी डीवाईडला आढळल्याचे सीसीटीव्ही फुटेज कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

हे देखील वाचाRelationship Tips: संबंध करताना या 5 गोष्टींतून कळते तुमचा पार्टनर मनापासून साथ देतोय का..

Wearing Bra While Sleeping: तुम्हीही ब्रा घालून झोपता? असाल तर त्वरीत थांबवा अन्यथा..

MSRTC Recruitment 2023: दहावी पास उमेदवारांसाठी एसटी महामंडळात निघाली मोठी भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

MPSC Recruitment 2023: MPSC मार्फत या पदांसाठी हजाराहून अधिक जागांची मेगा भरती..

PM Kusum Yojana: आता मागेल त्याला दिला जाणार सौर पंप; जाणून घ्या सौर पंप मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया..

PMGKAY: मोफत रेशनच्या नियमात सरकारने केला मोठा बदल; आता रेशन मिळणार इतके..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.