Rishabh Pant Car Accident: पंत वेदनेने विव्हळत असताना मदत करायची सोडून लोकं पैशाची बॅग घेऊन पळाले? पाहा व्हिडिओ..

0

Rishabh Pant Car Accident: दिल्लीहून (Delhi) डेहराडूनला (dehradun) जात असताना ऋषभ पंतचा काल शुक्रवारी पहाटे सव्वा पाच वाजता रुडकीच्या (Roorkee) गुरुकुल नरसन (Gurukul Narsan) परिसरामध्ये भीषण अपघात झाला. बरोबर  ५:२२ ला ऋषभ पंतची (Rishabh pant) गाडी डिव्हायडर धडकून पलटी झाली. आणि 5 वाजून 28 मिनिटांनी गाडीने पेट घेतला. एवढा भयंकर अपघात होऊन देखील ऋषभ पंतचा जीव वाचला हा करिष्मा असल्याचा बोललं जातंय. (Rishabh Pant Car crash divider)

नवीन वर्ष आपल्या परिवारासोबत सेलिब्रेशन करण्यासाठी ऋषभ पंत कुटुंबाला न सांगता सरप्राईज देण्यासाठी दिल्लीहून (Delhi) त्याच्या रूडकी (Roorkee) या घरी निघाला होता. गाडी चालवत असताना ऋषभ पंची डुलकी लागल्याने हा भीषण अपघात झाल्याचे ऋषभ पंत म्हणाला. अपघात झाल्यानंतर, पुढच्या पाच मिनिटात गाडीने पेट घेतला. मात्र तत्पूर्वी ऋषभ पंत गाडीतून बाहेर आला. ऋषभ पंतला गाडी पासून दूर स्थानिक बस ड्रायव्हरने नेले असल्याची माहिती आता समोर आली आहे.

ऋषभ पंचा एक्सीडेंट झाल्यानंतर तो बेशुद्ध अवस्थेत होता. असं ऋषभ पंतला वाचवणाऱ्या बस ड्रायव्हर सुशील कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. पंतने जर सीट बेल्ट लावला असता, तर ऋषभ पंतला बाहेर येता आलं नसतं. आणि मोठी दुर्घटना घडली असती, असं देखील सुशील कुमार यांनी सांगितले. (Bus driver Sushil Kumar) एक्सीडेंट झाल्यानंतर काही सेकंदातच गाडीने पेट घ्यायला सुरुवात केली होती, ऋषभ पंत गाडीच्या बाहेर बेशुध्द अवस्थेत येऊन पडला होता, आम्ही त्याला गाडीपासून दूर नेले.

या दरम्यान आम्ही पोलिसांना फोन लावला, ॲम्बुलन्सला फोन लावला. मात्र आमचा फोन सुरुवातीला कोणीच उचलायला तयार नव्हतं. फोन उचलल्या नंतर आम्ही क्रिकेटर ऋषभ पंतचा एक्सीडेंट झाला, असं म्हटल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली. असं देखील बस ड्रायव्हर सुशील कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पोलीस आणि ॲम्बुलन्स येण्यासाठी तब्बल अर्धा तास अवधी गेला, असे देखील ते माध्यमातून बोलताना सांगत होते. ॲम्बुलन्स आल्यानंतर, त्याला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. त्याच्या अंगावर कपडे नसल्याने आम्ही चादर टाकून त्याला गुंडाळलं.

दिल्लीहून डेहराडूनला जात असताना गाडी डिव्हायडरला धडकून हवेत विमानासारखी उडत गेल्याच दृश्य आम्ही डोळ्यांनी पाहिलं. ऋषभ पंतची गाडी आमच्या बसला धडकेल अशी देखील आम्हाला भीती होती. मात्र सुदैवाने असा कोणताही प्रकार घडला नाही. गाडी हवेत अनेक वेळा पलटी घेऊन रोडवर पडल्यानंतर आम्ही धावत गाडी जवळ गेलो. आणि त्याला वाचवलं. असं बस ड्रायव्हर सुशील कुमार यांनी माध्यमाला बोलताना सांगितले. मात्र दुसरीकडे मदत करण्याऐवजी लोकं पैशाची बॅग (money bag) घेऊन पळाल्याच्या बातम्या पसरल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.

एकीकडे बस ड्रायव्हरने पंतचा अपघात झाल्यानंतर लगेच मदत केली. मात्र दुसरीकडे एक्सीडेंट झाल्यानंतर मदत करण्याऐवजी काही लोक पैशाची बॅग घेऊन पळाली अशा देखील बातम्या पसरल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला. एखादा माणूस जखमी अवस्थेत पडल्यानंतर अशा प्रकारचं कृत्य माणूस म्हणून तुम्हाला जगण्याचा अधिकार देत नाही. माणूस आणि एक भारतीय म्हणून या गोष्टीची लाज वाटणाऱ्यासारखं हे कृत्य नक्कीच आहे. मात्र आता यावर मोठी अपडेट आली असून पोलिसांनी या बातम्यांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

हरिद्वार पोलिसांकडून लोकांनी ऋषभ पंतची पैशाची बॅग पळवली, या बातम्या खोट्या असल्याचे म्हंटल आहे. ऋषभ पंतची एक बॅग सापडली आहे. त्यामध्ये काही कपडे आहेत. एक सोन्याची चैन देखील मिळाली आहे. चार हजार रुपयांची रोकड हे सगळं या ठिकाणी मिळालं आहे. ऋषभ पंतच्या नातेवाईकांसोबत या वस्तूंची खात्री करण्यात आली असून, अपघात झाल्यानंतर लोकांनी पैशाची बॅग पळवली, या बातम्या खोट्या आहेत. असं बिलकुलही झालं नसल्याचं, हरिद्वार पोलिसांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा Rishabh Pant Car Accident: गुडघा मनगट घोटा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे ऋषभ पंतची कारकीर्द संपुष्टात? तब्बल इतके वर्ष राहणार क्रिकेट पासून दूर..

Rishabh Pant: शिखर धवनने ऋषभ पंतला गाडी हळू चालवायला सांगितलं होतं, तरीही ऐकलं नाही; व्हिडिओ झाला व्हायरल..

Rishabh pant accident video: घायल होता, अंगावर कपडे नव्हती, तरीही लोकं व्हिडिओ काढत होती; तेवढ्यातूनही पंत म्हणाला बंद कर..; पाहा व्हिडिओ..

Rishabh pant car accident Video: ..म्हणून झाला ऋषभ पंतचा अपघात; शुद्धीवर आल्यानंतर ऋषभ पंतने सांगितला घटनाक्रम..

Rishabh pant car accident: ऋषभ पंतचा भीषण अपघात; संपूर्ण कार जळाली कसाबसा बाहेर आला पण..; पाहा अपघाताचे CCTV फुटेज..

PM Kusum Yojana: आता मागेल त्याला दिला जाणार सौर पंप; जाणून घ्या सौर पंप मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया..

PMGKAY: मोफत रेशनच्या नियमात सरकारने केला मोठा बदल; आता रेशन मिळणार इतके..

Relationship Tips: बॉयफ्रेंडची आठवण आल्यावर मुली करतात ह्या घाणेरड्या गोष्टी..

Celebrity Sex Life: या कलाकारांनी सांगितल्या त्यांच्या आवडत्या सेक्स पोझिशन; आलियाची क्लासिक मिशनरी तर करिनाची आहे..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.