Rishabh Pant Car Accident: गुडघा मनगट घोटा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे ऋषभ पंतची कारकीर्द संपुष्टात? तब्बल इतके वर्ष राहणार क्रिकेट पासून दूर..

0

Rishabh Pant Car Accident: आज पहाटे दिल्लीवरून (Delhi) डेहराडूनकडे (dehradun) जात असताना ऋषभ पंतचा (Rishabh pant) भीषण अपघात झाला. हा अपघात रुडकीच्या (Roorkee) गुरुकुल नरसन (Gurukul Narsan) परिसरामध्ये झाला. पहाटे पाच वाजून 21 मिनिटांनी हा भीषण अपघात झाला. ऋषभ पंतची गाडी डिव्हायडरला धडकल्यानंतर, पलटी झाली. आणि पुढच्या पाच मिनिटात गाडीने पेट घेतला. मात्र घाबरून न जाता ऋषभ गाडीची काच तोडत बाहेर आला. पंत बाहेर आल्यानंतर, स्थानिकांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये भरती झाला. (Rishabh pant car crash divider)

मेडिकल रिपोर्टनुसार ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली असून, त्याचा पाय देखील फ्रॅक्चर झाला आहे. हा अपघात प्रचंड भीषण होता. अवघ्या पाच मिनिटात गाडी जळून खाक झाली. मात्र सुदैवाने तो बचावला. ऋषभ पंचा जीवाला आता धोका नसला तरी त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. ऋषभ पंत आता क्रिकेट पासून तब्बल दीड ते दोन वर्ष दूर राहावं लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. ऋषभ पंतचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. (Rishabh pant car burning)

पायाच्या घोट्याला देखील मोठी जखम झाली आहे. कपाळावर दोन कट देखील आले आहेत. हाताच्या मनगटाला देखील फ्रॅक्चर असल्याची माहिती आता समोर आली आहे. ऋषभ पंतच्या पाठीला देखील प्रचंड मार लागला असून, पाठीच्या हाडांना देखील जखम असण्याची शक्यता आहे. ऋषभ पंतच्या पाठीची प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे. या सर्व उपचारानंतर रिकव्हरीसाठी ऋषभ पंतला तब्बल दीड ते दोन वर्ष लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भीषण अपघातामुळे झालेल्या दुखापतीतून सावरण्यासाठी ऋषभ पंतला तब्बल दीड ते दोन वर्ष रिकव्हरीसाठी लागणार असल्याने आता त्याला दोन वर्ष आपले बॅट हातामध्ये घेता येणार नसल्याने त्याच्या चाहत्यांसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. एक प्रकारे त्याच्या कारकिर्दीवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, येणारा काळ त्याच्यासाठी खूप आव्हानात्मक असणार आहे. दोन वर्ष क्रिकेट पासून दूर राहणाऱ्या खेळाडूला पुन्हा पुन्हा कमबॅक करणं खूप अवघड आहे. यापूर्वी देखील अनेक खेळाडूंनी दीड दोन वर्षानंतर कमबॅक केला आहे. मात्र ऋषभ पंतची दुखापत त्याच्या खेळावर परिणाम करणारी आहे.

कसोटी क्रिकेटला आपल्या तालावर नाचवणाऱ्या ऋषभ पंतला आता क्रिकेट खेळता येणार नसल्याने भारतीय संघासाठी बॉर्डर-गावस्कर मालिका आणि त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी मोठं आव्हान निर्माण झालं आहे. कसोटी क्रिकेट मधील अनेक अशक्यप्राय आव्हानांचा पाठलाग करून त्याने भारताला एकहाती विजय मिळवून दिला आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या 50 षटकाच्या वर्ल्डकप पासून देखील आता त्याला दूर राहावं लागणार आहे.

ऋषभ पंत लवकर बरा व्हावा, यासाठी देशातील अनेक क्रिकेट दिग्गजांनी देवाकडे पार्थना केली आहे. पंतचे चाहते देखील तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. ऋषभ पंतवर आता डेहराडून मधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये (dehradun Max hospital) उपचार सुरू आहेत. उद्या त्याला दिल्लीमध्ये उपचारासाठी आणण्यात येणार असल्याची माहिती आहे.

हे देखील वाचाRishabh Pant: खिखर धवनने ऋषभ पंतला गाडी हळू चालवायला सांगितलं होतं, तरीही ऐकलं नाही; व्हिडिओ झाला व्हायरल..

Rishabh pant accident video: घायल होता, अंगावर कपडे नव्हती, तरीही लोकं व्हिडिओ काढत होती; तेवढ्यातूनही पंत म्हणाला बंद कर..; पाहा व्हिडिओ..

Rishabh pant car accident Video: ..म्हणून झाला ऋषभ पंतचा अपघात; शुद्धीवर आल्यानंतर ऋषभ पंतने सांगितला घटनाक्रम..

Rishabh pant car accident: ऋषभ पंतचा भीषण अपघात; संपूर्ण कार जळाली कसाबसा बाहेर आला पण..; पाहा अपघाताचे CCTV फुटेज..

Chanakya Niti: हे चार गुण तुमच्याकडे असतील तर समाज करतो मुजरा..

MSRTC Recruitment 2023: दहावी पास उमेदवारांसाठी एसटी महामंडळात निघाली मोठी भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

MPSC Recruitment 2023: MPSC मार्फत या पदांसाठी हजाराहून अधिक जागांची मेगा भरती..

PM Kusum Yojana: आता मागेल त्याला दिला जाणार सौर पंप; जाणून घ्या सौर पंप मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.