KL Rahul Athiya Shetty: राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या लग्नापूर्वीच हॉटेलमधला तो व्हिडिओ झाला व्हायरल; पाहा व्हिडिओ..

0

KL Rahul Athiya Shetty: भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल (KL Rahul) आणि बॉलीवूड (Bollywood) सुपरस्टार सुनील शेट्टी Sunil Shetty) यांची मुलगी अथिया शेट्टी (athiya Shetty) गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. (KL Rahul athiya Shetty deting each other) जानेवारीमध्ये हे दोन्हीं कपल लग्न करणार असल्याची माहिती आहे. (KL Rahul and Athiya Shetty marriage) श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या तीन T20 (IND vs SL) सामन्यांच्या मालिकेसाठी केएल राहुलला वगळलं आहे. श्रीलंके विरुद्ध होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत केएल राहुलला संधी देण्यात आली आहे. मात्र तोपर्यंत केएल राहुल लग्नासंदर्भात असणारी सर्व कामे आटपून घेत आहे.

केएल राहुल आणि अथिया शेट्टी जानेवारीमध्ये एकमेकांसोबत लग्न करणार असल्याची माहिती आहे. मात्र त्यापूर्वीच बुधवारी जुहूमधील एका हॉटेलमध्ये या दोघांना स्पॉट करण्यात आलं. बुधवारी या हॉटेलमध्ये दोघेही बाहेर येताना कॅमेरात कैद झाले. दोघेही वेगवेगळ्या वेळेत बाहेर आल्याने चाहत्यांसाठी हा चर्चेचा विषय बनले आहेत. एवढेच नाही, तर हॉटेलमधील दोघांमध्ये जे झालं, त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

3 जानेवारीपासून श्रीलंका आणि भारत यांच्यामधील तीन टी-20 आणि 3 एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. आगामी टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) तयारीसाठी अनेक नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. विराट कोहली Virat Kohli) ऋषभ पंत (Rishabh pant) रोहित शर्मा (Rohit Sharma) केएल राहुल (KL Rahul) या दिगज खेळाडूंना टी-ट्वेंटी संघातून बाहेरचा रस्ता दाखवला असून, आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकासाठी आतापासूनच बीसीसीआयने तयारी सुरू केली आहे.

केएल राहुलला देखील टी-ट्वेंटी संघातून वगळलं असलं तरी एकदिवसीय मालिकेत त्याचा समावेश करण्यात आला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 15 जानेवारीला संपणार आहे. 15 जानेवारीला एकदिवसीय मालिका संपल्यानंतर, केएल राहुल आणि अथिया शेट्टी 23 जानेवारीला लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अथिया शेट्टी आणि केएल राहुल या दोघांचा लग्नापूर्वीच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, दोघेही जुहू मधील एका हॉटेलमध्ये शूटिंगसाठी गेल्याचं समोर आलं आहे. केएल राहुल आणि अथिया शेट्टी या दोघांचा हॉटेलमध्ये जाताना आणि बाहेर येतानाचा देखील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोबतच हॉटेलच्या आतमधील व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हॉटेलमध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओत केएल राहुल काहीतरी खात असताना पाहायला मिळत आहे. तर त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टी मेकअप करताना पाहायला मिळत आहे. अथिया शेट्टी मेकअप करत असताना ती देखील केएल राहुलच्या प्लेटमधील काहीतरी खात असल्याचं दिसत आहे. आपलं शूट संपवून दोघेही हॉटेलमधून बाहेर पडताना दोघांची वेळ वेगवेगळी होती. राहुलने ब्लू जीन्स आणि स्काय ब्लू रंगाचा टी शर्ट घातला होता. त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टी हीने देखील त्याच रंगाचे कपडे परिधान केले होते.

हे देखील वाचाPM Kusum Yojana: आता मागेल त्याला दिला जाणार सौर पंप; जाणून घ्या सौर पंप मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया..

Rishabh Pant Car Accident: ऋषभ पंतच्या मेंदू आणि पाठीच्या कण्यावर मोठी अपडेट; चाहत्यांना चिंता आता..

Rishabh Pant Car Accident: पंत वेदनेने विव्हळत असताना मदत करायची सोडून लोकं पैशाची बॅग घेऊन पळाले? पाहा व्हिडिओ..

Rishabh Pant Car Accident: गुडघा मनगट घोटा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे ऋषभ पंतची कारकीर्द संपुष्टात? तब्बल इतके वर्ष राहणार क्रिकेट पासून दूर..

Rishabh Pant: शिखर धवनने ऋषभ पंतला गाडी हळू चालवायला सांगितलं होतं, तरीही ऐकलं नाही; व्हिडिओ झाला व्हायरल..

Physical Relationship Tips: ..म्हणून सकाळी उठल्यावर पुरुषाच्या त्या अवयवाला येते ताठरता? जाणून बसेल धक्का..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.