Kiara Advani Sidharth Malhotra Marriage: कियारा अडवाणी सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नाची तारीख ठरली; जाणून घ्या कुठे आणि कसं होणार लग्न..

0

Kiara Advani Sidharth Malhotra Marriage: गेल्या एक-दोन वर्षांमध्ये बॉलिवूडमधील (Bollywood celebrity marriage) अनेक दिग्गज कलाकारांनी आपला वैवाहिक जोडीदार निवडत लग्नगाठ देखील बांधली आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध लोकप्रिय जोडी रणवीर कपूर आणि आलिया भट्ट (Ranbir Kapoor Alia Bhatt) या दोघांनी विवाह केल्यानंतर, बॉलीवूडमध्ये अद्याप दुसरं मोठं लग्न अद्याप झालेले नाही. मात्र आता लवकरच बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल 2023 मध्ये लग्न करणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि प्रीती म्हणजेच, कियारा आडवाणी लग्न करणार आहेत. (Sidharth Malhotra Kiara Advani Marriage dates)

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा Kiara (Advani Sidharth Malhotra relationship) गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही सार्वजनिक ठिकाणी आपल्या चाहत्यांना अनेक वेळा पाहायला मिळाले आहेत. दोघे काही वर्षापासून रिलेशनशिपमध्ये असून, दोघांनीही आपल्या रिलेशनशिपला आता लग्नामध्ये बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 2023 मध्ये फेब्रुवारीत हे जोडपं आपली लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली आहे.

याठिकाणी पार पडणार विवाहसोहळा

बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींचे (Bollywood celebrity) खासगी आयुष्य जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते. आपल्या आवडत्या कलाकारांविषयी जाणून घेण्याचं अनेकांमध्ये कुतूहल असतं. जर तुम्ही कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राचे चाहते असाल, तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. हे दोघेही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये राजस्थान (Rajasthan) मधील जैसलमेर पॅलेस हॉटेलमध्ये (Jaisalmer Palace Hotel) या दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. (A royal wedding ceremony is about to take place)

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार 2023 मधील फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हे दोघे लग्न करणार आहेत. या दोघांनीही आपल्या कामातून वेळ काढला असून, 6 फेब्रुवारीला राजस्थान मधील प्रसिद्ध जैसलमेर पॅलेस हॉटेलमध्ये या दोघांचा विवाह पार पडणार आहे. विवाहापूर्वी लग्नाचे प्री-वेडिंग फंक्शन देखील पार पडणार असून, हे कार्यक्रम चार आणि पाच फेब्रुवारीला पार पडणार आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी या दोघांच्या लग्न सोहळ्याला मोजकेच पाहुणे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी या दोघांच्या लग्न सोहळ्याची रूपरेषा ठरली असून, मेहंदी, हळदी, त्याचबरोबर संगीताचे कार्यक्रम देखील पार पडणार आहेत. बॉलीवूडमधील अनेक दिग्गज मंडळी या लग्नाला उपस्थित राहणार असल्याची देखील माहिती या दोघांच्या नातेवाईकांकडून स्पष्ट करण्यात आली आहे. मात्र बॉलीवूड मधील काही ठराविक मंडळीच या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत. यामधील विकी कौशल कॅटरिना कैफ (Vicky Kaushal Katrina Kaif) यांचा देखील समावेश आहे.

जसलमेर पॅलेस हॉटेल हे राजस्थान मधील खूप प्रसिद्ध हॉटेल आहे. अनेक स्टार लोकांनी या हॉटेलमध्ये आपला विवाह सोहळा पार पडला आहे. या हॉटेलचे दृश्य खूपच निसर्ग रम्य आहे. हॉटेलमधून आसपास असणारा निसर्गाचा सुंदर परिसर पाहायला मिळतो. हे हॉटेल किल्ला सदृश्य असं हॉटेल असल्याने अनेकजण विवाह सोहळा किंवा अनेक महत्त्वाचे कार्यक्रम पार पाडण्यास इथेच प्राधान्य देतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आत्तापासूनच हे हॉटेल सजवायला सुरुवात झाली असून, राजेशाही पद्धतीने हॉटेलची सजावट करण्यात येणार आहे.

हे देखील वाचाKL Rahul Athiya Shetty: राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या लग्नापूर्वीच हॉटेलमधला तो व्हिडिओ झाला व्हायरल; पाहा व्हिडिओ..

Rishabh Pant Car Accident: ऋषभ पंतच्या मेंदू आणि पाठीच्या कण्यावर मोठी अपडेट; चाहत्यांना चिंता आता..

Rishabh Pant Car Accident: पंत वेदनेने विव्हळत असताना मदत करायची सोडून लोकं पैशाची बॅग घेऊन पळाले? पाहा व्हिडिओ..

Rishabh Pant Car Accident: गुडघा मनगट घोटा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे ऋषभ पंतची कारकीर्द संपुष्टात? तब्बल इतके वर्ष राहणार क्रिकेट पासून दूर..

Relationship Tips: संबंध करताना या5 गोष्टींतून कळते तुमचा पार्टनर मनापासून साथ देतोय का..

Electric Bike: स्मार्टफोनच्या पैशात मिळतेय ही तगडी इलेक्ट्रिक बाईक; जाणून घ्या डिटेल्स..

PM Kusum Yojana: आता मागेल त्याला दिला जाणार सौर पंप; जाणून घ्या सौर पंप मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया..

Acharya Chanakya: पत्नीमध्ये हे चार गुण असतील तर यश तुमच्या पायाशी घालते लोटांगण..

MSRTC Recruitment 2023: दहावी पास उमेदवारांसाठी एसटी महामंडळात निघाली मोठी भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.