Cristiano Ronaldo Salary Breakup: रोनाल्डो कमावणार तासाला 21 लाख रुपये, एवढंच नव्हे तर..
Cristiano Ronaldo Salary Breakup: फुटबॉल विश्वचषकात चमकदार अशी कामगिरी करता आली नसली तरी देखील पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोची (Cristiano Ronaldo) फुटबॉल विश्वात असलेली मागणी काही कमी होत नाही. मध्यंतरी मँचेस्टर युनायटेड क्लबमधून रोनाल्डोची हकालपट्टी झाली. त्यानंतर आता तो पहिल्यांदाच युरोपमधून बाहेर पडला आहे. तो सौदी अरेबियाच्या (Soudi Arabia) फुटबॉल क्लब अल नासर (Al Nassr FC) या संघाकडून खेळताना पाहायला मिळणार आहे. फुटबॉल (Football) विश्वातील ही मोठी घडामोड असल्याचे बोलले जात आहे.
Al Nasar FC संघाने सोशल मीडियावर या बाबत एक पोस्ट देखील शेअर केली आहे. यामध्ये रोनाल्डोने संघाची जर्सी हातात पकडल्याचे पाहायला मिळत आहे. रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) जून 2025 पर्यंत अल नासर संघात खेळताना पाहायला मिळणार आहे. त्याने जून 2025 पर्यंत क्लबशी तसा करार केला आहे. अल नासर क्लबने म्हटले आहे की, “हा करार केवळ क्लबला उत्कृष्ट यश मिळविण्यासाठी प्रेरणा देईल असे नाही, तर आमच्या लीगसाठी, आमच्या देशासाठी आणि भावी पिढ्यांसाठी सर्वोत्तम कार्य करण्यासाठी आम्हाला प्रेरणा देईल.” अशा शब्दांत त्यांनी रोनाल्डो त्यांचा क्लबमध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आत्तापर्यंतचा सर्वात मोठा करार: रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) अल नासर क्लबसोबत केलेला करार हा फुटबॉल (Football) विश्वातील आतापर्यंतचा सर्वात मोठा करार आहे. विशेष म्हणजे रोनाल्डोने फुटबॉल विश्वचषकात चमकदार कामगिरी केलेली पाहायला मिळाली नाही. रोनाल्डोचे वय 37 वर्ष एवढे आहे. या गोष्टीचा करारावर काहीच परिणाम पाहायला मिळाला नाही. एवढी मोठी रक्कम मिळवून देणारा रोनाल्डोच्या कारकिर्दीतील हा शेवटचा करार असू शकतो, असे देखील आता बोलले जात आहे. या करारातून रोनाल्डोला वर्षाला सुमारे 1775 कोटी रुपये मिळणार आहेत. क्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) फुटबॉलच्या (Football) इतिहासातील सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू ठरला आहे. (Cristiano Ronaldo Salary Breakup)
फुटबॉल विश्वातील हा सर्वात मोठा करार समजला जातो. या करारामुळे किलियन एम्बाप्पे (kylian mbappe), लियोनेल मेसी (Lionel Messi) यांना देखील मागे टाकले आहे. किलियन एम्बाप्पे याने पीएसजी क्लब सोबत 1059 कोटी प्रति वर्ष असा करार केला होता. लियोनेल मेसी याने पीएसजी संघासोबत 918 कोटी प्रतिवर्ष असा करार केला होता. तर या अगोदर रोनाल्डोने मैनचेस्टर यूनाइटेड या क्लबसोबत 827 कोटी रुपयांना करार केला होता. नेमारने पीएसजी क्लबसोबत 719 कोटी प्रतिवर्ष असा करार केला होता. या बाबतीत रोनाल्डो अव्वल ठरला आहे.
या अगोदर रोनाल्डोने नाकारला होता ३००० कोटींचा प्रस्ताव: सध्या रोनाल्डोने जवळपास 1775 कोटींचा करार केला असला तरीदेखील या अगोदर रोनाल्डोने एक संधी गमावली आहे. ती संधी तब्बल 3000 कोटी रुपये वार्षिक कमाई करण्याची होती. ज्यावेळी क्रिस्तियानो रोनाल्डो मँचेस्टर युनायटेड क्लबकडून खेळत होता, त्यावेळी रोनाल्डो आठवड्याला सुमारे पाच कोटी रुपये कमवत होता. परंतु तो आता आठवड्याला 34 कोटींपेक्षा अधिक कमाई करणार आहे. रोनाल्डोला काही महिन्यांपूर्वी सौदी फुटबॉल क्लब अल हिलालने सुमारे 3000 कोटी रुपयांच्या कराराची ऑफर दिली होती. परंतु नंतर रोनाल्डोने ही ऑफर नाकारली होती आणि मँचेस्टर युनायटेड क्लबमध्येच खेळण्याचा निर्णय घेतला होता.
हेही वाचा: Chanakya Niti: या गोष्टीत पत्नीचे समाधान नाही झाले तर पैशाची चणचण सतत भासते..
Rishabh Pant Update: यामुळे ऋषभ पंतला इन्फेक्शनची शक्यता; जाणून घ्या रुग्णालयातली अपडेट.
Railway Bharti: भारतीय रेल्वेत 4 हजाराहून अधिक पदांची मेगा भरती; दहावीसह या उमेदवारांना संधी..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम