Tata Nexon: आता Tata Nexon मिळतेय दोन लाखांत; जाणून घ्या ऑफर विषयी सविस्तर..

0

Tata Nexon: सध्या बाजारामध्ये टाटा मोटर्सने (TATA motors) धुमाकूळ घातला आहे. Tata Nexon ही गेल्या काही वर्षात सर्वाधिक विक्री झालेली चार चाकी गाडी आहे. मजबुती बरोबरच इकॉनोमिकली देखील फायदेशीर असल्याने सर्वसामान्यांना या गाडीने अक्षरशः वेड लावले आहे. जर तुम्ही देखील टाटा मोटर्सचे चाहते असाल, आणि नवीन चार चाकी खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. ग्राहकांच्या जबरदस्त पसंतीस उतरलेल्या ‘टाटा नेक्सन एसयुव्ही’ आता केवळ दोन लाखांत घरी येत आहे.

भारतीय बाजारामध्ये गेल्या एक दीड वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात Tata Nexon SUV ची विक्री झाली आहे. मजबुती बरोबरच जबरदस्त मायलेज प्रदान करत असल्याने अनेकांनी या गाडीला पसंती दर्शवली आहे. तसं पाहायला गेलं तर, या चार चाकी गाडीची किंमत सात लाख 70 हजार पासून सुरू होते. मात्र ईएमआय (EMI) ऑफर्सच्या माध्यमातून तुम्ही ही कार केवळ दोन लाख रुपयांमध्ये घरी आणू शकता. जाणून घेऊया या संदर्भातली डिटेल सविस्तर.

टाटा मोटर्स कंपनी आता आपल्या अनेक व्हेरियंटवर अनेक भन्नाट ऑफर्स प्रदान करत आहे. यामध्ये Tata Nexon SUV XE, XM+ (S), (HS), XZ+ (L) अशा अनेक व्हेरियंटवर टाटा मोटर्सने ऑफर ठेवली आहे. टाटा मोटर्सच्या या व्हेरियंटची किंमत सात लाख 70 हजारापासून 14 लाख 18 हजार पर्यंत आहे. टाटा मोटर्सचे हे व्हेरियंट सब चार मीटर कॉम्पॅक्ट डिझेल त्याचबरोबर पेट्रोल इंजिनच्या पर्यायांमध्ये देखील उपलब्ध आहे. त्याचबरोबर मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन हा पर्याय देखील टाटा मोटर्स आपल्या ग्राहकांना देते.

नवीन चार चाकी गाडी खरेदी करताना अनेक जण किमती बरोबरच मायलेजचा देखील खूप मोठ्या प्रमाणात विचार करतात. किंमत, गाडीची मजबुती, आणि मायलेज या गोष्टी विचारात ठेवून गाडीत खरेदी केली जाते. या तिन्ही प्रकारात टाटा मोटर्स अगदी ग्राहकांच्या कल्पनेबरोबर जोडला गेला आहे. टाटा नेक्सन एस युव्ही तब्बल 21.5 kmpl चा प्रवास करते. एका लिटरमध्ये तब्बल साडे 21 किलोमीटरचा प्रवास ही कार करत असल्याने, ग्राहकांनी अक्षरशः या कारला डोक्यावर घेतलं आहे.

Tata motors चे Tata Nexon, Nexon XZ Plus हे मॉडेल गेल्या दीड वर्षांमध्ये सर्वाधिक विक्री झालेले व्हेरियंट आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या या कारची एक्स शोरूम प्राईस 10 लाख 39 हजार 900 रुपये आहे. तर ही कार 12 लाख 01 हजार 236 रुपयांत ऑन-रोड मिळते. मात्र ही गाडी तुम्हाला केवळ दोन लाख रुपये डाऊनपेमेंट करून खरेदी करता येणार आहे. दोन लाख रुपये डाऊन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला दरमहा किती ईएमआय येऊ शकतो, जाणून घेऊया या ऑफिस विषयी सविस्तर.

Nexon XZ Plus ही कार खरेदी करण्यासाठी तुम्ही दोन लाख रुपयाचे डाऊनपेमेंट केल्यानंतर, उर्वरित दहा लाख एक हजार दोनशे छत्तीस रुपयांचे तुम्हाला कर्ज घ्यायचे आहे. हे कर्ज तुम्हाला पाच वर्षासाठी घ्यायचं आहे. याचा व्याजदर केवळ नऊ टक्के असणार आहे. पाच वर्ष तुम्हाला दर महिन्याला वीस हजार 784 रुपयाचा हप्ता भरावा लागणार आहे. पाच वर्षानंतर तुम्ही या गाडीचे पूर्णपणे मालक होणार आहे. या दरम्यान तुम्हाला केवळ अडीच लाख रुपये व्याज द्यावे लागणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या स्वप्नातली ही कार खरेदी करू शकता.

हे देखील वाचा Goutam Adani Vs Elon Musk: अवघ्या एका महिन्यात अदानी एलोन मस्कचा उठवणार बाजार, मस्कला ट्विटर भोवले

Dhananjay Munde Accident: धनंजय मुंडेंचा भीषण अपघात, गाडीचा चक्काचूर; छाती दोन जाग्यावर फ्रॅक्चर; पाहा व्हिडिओ..

SSC CHSL Bharti 2023: स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये या उमेदवारांसाठी 4,500 पदांची मेगा भरती; जाणून घ्या डिटेल्स..

urfi javed: उर्फी जावेदने शोधून काढले संजय आणि चित्रा वाघ कनेक्शन; जाणून घ्या उर्फि जावेद चित्रा वाघ वाद..

Cristiano Ronaldo Salary Breakup: रोनाल्डो कमावणार तासाला 21 लाख रुपये, एवढंच नव्हे तर..

Chanakya Niti: या गोष्टीत पत्नीचे समाधान नाही झाले तर पैशाची चणचण सतत भासते..

MSRTC Recruitment 2023: दहावी पास उमेदवारांसाठी एसटी महामंडळात निघाली मोठी भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

MPSC Recruitment 2023: MPSC मार्फत या पदांसाठी हजाराहून अधिक जागांची मेगा भरती..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.