SSC CHSL Bharti 2023: स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये या उमेदवारांसाठी 4,500 पदांची मेगा भरती; जाणून घ्या डिटेल्स..

0

SSC CHSL Bharti 2023: प्रत्येकाला सरकारी नोकरी (government job) असावी असं वाटत असतं. मात्र अनेकांना सरकारी नोकरी मिळेलच असं नाही. मात्र तरी देखील तुम्हाला प्रयत्न करत राहणं खूप गरजेचं असतं. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff selection commission) अंतर्गत संयुक्त उच्च माध्यमिक स्तरासाठी भरती करण्यात येणार असून, या संदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जाणून घेऊया स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रिया संदर्भातली सविस्तर डिटेल्स.

केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या या स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत संयुक्त उच्च माध्यमिक स्तरासाठी होत असलेल्या या भरतीसाठी एकूण साडे चार हजार जागांची भरती केली जाणार आहे. जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल, तर तुमच्यासाठी ही खूप मोठी सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख आज 4 जानेवारी 2023 असणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरून या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत करण्यात येणाऱ्या भरतीसाठी कनिष्ठ विभाग लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड ‘A’ ही पदे भरण्यात येणार आहेत. आता या पदासाठी उमेदवारांची पात्रता काय निश्चित करण्यात आली आहे? त्याचबरोबर कोणत्या पदासाठी किती पगार देण्यात येणार आहे? याविषयी जाणून घेऊया सविस्तर.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांची पात्रता ही कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण मंडळातून उमेदवार बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा काय ठेवण्यात आली आहे, हे जाणून घेऊ. एक जानेवारी 2022 रोजी उमेदवारांचे वय हे 18 ते 27 वर्षे यादरम्यान असणे आवश्यक आहे. एससी/एसटी उमेदवारांना या वयामध्ये पाच वर्षाची सूट देखील दिली जाणार आहे. सरकारी नियमानुसार ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्गाची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे.

परीक्षा फी आणि पगार

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना शंभर रुपये परीक्षा फी आकारली जाणार आहे. तुम्ही एससी/एसटी त्याचबरोबर पीडब्ल्यूडी उमेदवार असाल, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. त्याचबरोबर जर तुम्ही महिला उमेदवार असाल, तरी देखील तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

पगार आणि नोकरीचे ठिकाण

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत केल्या जाणाऱ्या या भरतीसाठी उमेदवारांना पदानुसार दरमहा वेतन दिले जाणार आहे. जर तुम्ही “डेटा एन्ट्री ऑपरेटर” असाल तर तुम्हाला 25,500 ते 81,100 रुपयांपर्यंत पेमेंट दिले जाणार आहे. “कनिष्ठ विभाग लिपिक” या पदासाठी उमेदवारांना 19900 ते 63,200 दरमहा पेमेंट दिले जाणार आहे. “डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड” ‘A’’ या पदासाठी 25,500 ते 81,100 रुपये दरमहा पगार दिला जाणार आहे. निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना संपूर्ण भारतभर नोकरीचे ठिकाण दिले जाणार आहे.

ऑनलाईन अर्ज

उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://ssc.nic.in/ असं सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ‘नोंदणी’ हा पर्याय पाहिला मिळेल. तुम्ही नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला लॉगिन करावं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला तपशील देण्यात येईल. तो तुम्हाला वेवस्थीत भरवा लागणार आहे.

त्यानंतर तुम्ही भरलेल्या फॉर्मची प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही डिक्लेरेशन वाचल्यानंतर सहमत असाल तर ‘हो’ हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ‘फायनल सबमिट’ हा पर्याय पाहिला मिळेल. यावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल. तुम्ही आलेला ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर, तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

हे देखील वाचाurfi javed: उर्फी जावेदने शोधून काढले संजय आणि चित्रा वाघ कनेक्शन; जाणून घ्या उर्फि जावेद चित्रा वाघ वाद.. 

Cristiano Ronaldo Salary Breakup: रोनाल्डो कमावणार तासाला 21 लाख रुपये, एवढंच नव्हे तर..

Chanakya Niti: या गोष्टीत पत्नीचे समाधान नाही झाले तर पैशाची चणचण सतत भासते..

Rishabh Pant Update: यामुळे ऋषभ पंतला इन्फेक्शनची शक्यता; जाणून घ्या रुग्णालयातली अपडेट..

Maharashtra Forest Recruitment 2023: बारावी पाससाठी वनविभागात 9 हजाराहून अधिक जागांची मेगा भरती; जाणून घ्या डिटेल्स..

MPSC Recruitment 2023: MPSC मार्फत या पदांसाठी हजाराहून अधिक जागांची मेगा भरती..

MSRTC Recruitment 2023: दहावी पास उमेदवारांसाठी एसटी महामंडळात निघाली मोठी भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.