digital voter ID: आता घरबसल्या मोबाईलवर डाउनलोड करता येणार डिजिटल मतदार ओळखपत्र; जाणून घ्या प्रोसेस .. 

0

digital voter ID: आपण सध्या डिजीटल युगात जगत आहे. आज जवळपास सगळ्यांकडेच स्मार्टफोन आहेत. (Smartphone) स्मार्टफोन मुळे या डिजीटल युगात वावरणे सुद्धा सोपे झाले आहे. पैशांचे व्यवहार असोत किंवा महत्वाच्या कागदपत्रांच्या फाईल्स असो सगळं काही डिजिटल स्वरुपात उपलब्ध आहे. त्यामुळे वेगाने होणार्‍या या डिजिटल क्रांतीमुळे माणसाचा अतिशय किंमती वेळ वाचत आहे. परिणामी प्रत्येक गोष्टीचे रुपांतर आता डिजिटल स्वरुपात केलं जात आहे.

अनेक कागदपत्रांना डिजिटल (digital documents) स्वरुपात वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच काही महत्वाची कागदपत्रे घरबसल्या मिळवण्याची सोय सरकारने केली आहे. ड्रायव्हिंग लायसन्स (driving licence) याचे ऊत्तम उदाहरण आहे. अशातच आणखी एक महत्वाचा निर्णय सरकारकडून जारी करण्यात आला आहे. ज्यामुळे आता घरबसल्या डिजिटल स्वरुपात मतदार ओळखपत्र तुमच्या मोबाईलवर घरबसल्या मिळवता येणार आहे. (Voter ID)

अनेकदा धावपळीमध्ये आपल्याकडून कागदपत्रे हरवतात. काही महत्वाची कागदपत्रे हरवल्यास सरकारी योजनांचा लाभ सुद्धा आपण घेऊ शकत नाही. त्यानंतर पुन्हा ते डॉक्युमेंट तयार करणे म्हणजे प्रचंड क्लिष्ट पद्धतीतून जावे लागते. परंतू सरकारने यावर मार्ग काढला आहे. आता विविध कागदपत्रे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अगदी सहज मिळवू शकता. तसेच डिजिटल स्वरुपात ते सेव्ह सुद्ध करुन ठेवू शकता. इंटरनेट कनेक्शन असणारा स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा टॅबमध्ये तुम्ही हे डॉक्युमेंट सेव्ह करु शकता आणि गरज पडेल तिथे दाखवू सुद्धा शकता. सरकारकडून आता अनेक डिजीटल कादपत्रांना मान्यता सुद्धा देण्यात आली आहे. मतदार ओळखपत्राला सुद्धा डिजीटल स्वरुपात वापरता येणार असल्याची मान्यता मिळाली आहे.

मतदार ओळखपत्र हे एक अत्यंत महत्वाचे कागतपत्र आहे. जर तुमचे नाव मतदान यादीत नसेल तर तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार नसणार आहे. म्हणून मतदान करण्याच‍ा अधिकार असणार्‍या प्रत्येकाकडे मतदान यादीत नाव आणि मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे. अशातच आता तुम्ही डिजीटल स्वरुपात मतदार ओळखपत्र मिळवू शकणार आहे. जाणून घेऊया या संदर्भात सविस्तर

सर्वप्रथम तुम्हाला https://eci.gov.in/e-epic/ या भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. मतदारांची नोंदणी करणे, मतदान कार्डमध्ये बदल करणे किंवा डिजिटल मतदान कार्ड डाउनलोड करणे याकरिता या वेबसाईटचा वापर केला जातो. या वेबसाईटवर सर्वप्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल.

या ओटीपीचा वापर करुन तुम्हाला तुमचा पासवर्ड बनवावा लागेल. त्यानंतर संबंधित पासवर्ड वापरुन लॉगिंग करावे लागणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया पार पाडावी लागेल. ज्यामध्ये काही कागदपत्रांची तसेच तुमच्या फोटोची मागणी केली जाते. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर डाऊनलोड ऑप्शनवर क्लिक करुन अगदी सहजरीत्या तुम्ही तुमचे डिजिटल मतदान ओळखपत्र मिळवू शकता.

अगोदर मतदान ओळखपत्र मिळवण्याची प्रक्रिया खूपच त्रासदायक होती. केवळ निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच तुम्हाला तुमचे मतदार ओळखपत्र बनवता येत होते. मात्र आता सरकारने त्यात काही महत्वाचे बदल केले आहेत. तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने सुद्धा इलेक्शन कार्ड मिळवू शकता.

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन मोबाईल नंबर टाकून तुमची आयडी जनरेट होईल. आयडीवर लॉगिन करण्यासाठी तुम्हाला पासवर्डचा उपयोग करावा लागेल. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रं अपलोड करावी लागतील. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर, काही दिवसांतच मतदान ओळखपत्र पोस्टाने तुमच्या घरी येईल.

हे देखील वाचा Relationship tips: महिलांच्या या पाच अवयवांकडे पुरुष होतात सर्वाधिक आकर्षित; पाचवा आहे खूपच रंजक..

Money laundering case: जॅकलीन, नोरा कशा अडकल्या सुकेशच्या जाळ्यात? जॅकलीनला तर रात्रीत चार वेळा..

Amruta fadnavis: मुस्लिम मुलासोबत नवीन करिअर सुरू करणं अमृता फडणवीसांना चांगलंच भोवलं; पाहा काय झालं..

Marriage Tips: लग्नापूर्वी दोघांनाही या गोष्टी माहिती असायला हव्याच, अन्यथा महिन्यात तुटू शकतं नातं..

IND vs NZ: द्विशतकानंतरही तुला संधी का मिळाली नाही? इशान किशनच्या उत्तराने रोहित शर्माची बोलतीच बंद; पाहा व्हिडिओ..

Chanakya Niti: तुमच्यामध्ये हे चार गुण असतील तर अफाट कष्ट करूनही मिळणार नाही यश..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.