Money laundering case: जॅकलीन, नोरा कशा अडकल्या सुकेशच्या जाळ्यात? जॅकलीनला तर रात्रीत चार वेळा..

0

Money laundering case: मनी लाँड्रिंग प्रकरणात सध्या तुरुंगात असणार्‍या सुकेश चंद्रशेखरबाबत (sukesh chandrasekhar) अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) आणि जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez)  या दोघींनी मोठे खुलासे केले आहेत. २०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी सुकेश चंद्रशेखरला अटक करण्यात आली आहे. सध्या तो दिल्लीच्या मंडोली तुरुंगात आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणाचे तार बॉलीवूड इंडस्ट्री सोबत जुळत असल्याचे समोर आले होते. यामध्ये नोरा फतेही आणि जॅकलीन फर्नांडिस यांचे नाव समोर आले होते. त्यामुळे या दोघींच्या मागे सुद्धा चौकशीचा सासेमिरा लागला आहे. या चौकशीतून आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दिल्लीच्या पटियाला हाऊस (Delhi Patiala House) कोर्टामध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. यादरम्यान जॅकलीन आणि नोरा या दोघींनी सुद्धा सुनावणीला हजेरी लावत आपला जवाब नोंदवला आहे. या जवाबामध्ये दोघींकडून सुद्धा सुकेशबाबत मोठे खुलासे करण्यात आले आहेत. त्यामुळे सुकेशच्या अडचणी अजून वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सुकेश सतत मला त्याची गर्लफ्रेन्ड होण्याची मागनी करत होता असे नोराने सांगितले. माझी गर्लफ्रेन्ड झाल्यास तुला आलिशान घर देईल असे त्याने मला सांगितले होते. तसेच तू माझी गर्लफ्रेंड झाल्यास तुझी लाईफ बदलून टाकेल असे सुद्धा तो म्हणाला होता. या सगळ्यांमध्ये त्याची पार्टनर पिंकी इराणीची भूमिका सुद्धा महत्वाची आहे. नोरासाठीचे सर्व मॅसेज तो पिंकी इराणीकडे द्यायचा असे नोराने यावेळी सांगितले. याशिवाय मी त्याला अगोदर कधी भेटले सुद्धा नव्हते. मी त्याला पहिल्यांदा इडी कार्यालयातच पाहिले असल्याचा दावा सुद्धा नोराने केला आहे.

जॅकलीन फर्नांडिसने सुद्धा याप्रकरणी मोठे खुलासे केले आहेत. सुकेश चंद्रशेखर आणि त्याची पार्टनर पिंकी इराणीने माझा विश्वासघात केला असल्याचा आरोप तिने केला आहे. सुकेश आणि पिंकीवर मी खुप विश्वास ठेवला होता. ते दोघेही माझे चांगले मित्र होते. सुकेशने तर मला अंधारात ठेवत माझ्यासोबत मोठा विश्वासघात केला असल्याचे ती यावेळी म्हणाली.

पुढे बोलताना जॅकलीनने त्यांच्या सुरुवातीच्या काही दिवसांबाबत सांगितले. सन टीव्हीचा मालक असल्याचे सांगत सुकेशने माझ्याशी ओळख केली होती. मी तुझा खुप मोठा चाहता असल्याचे तो नेहमीच सांगायचा. कमी दिवसातच त्याने माझ्या फार जवळ येण्याचा प्रयत्न केला. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता या त्याच्या मावशी असल्याचे सुद्धा त्याने मला सांगितले. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये मी काम करायला हवे असा सल्ला तो नेहमी मला द्यायचा. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तुझ्यासाठी अनेक प्रोजेक्ट लॉन्च करायचे आहे. आपण एकत्र काम करूया असे सुद्धा त्याने अनेकदा म्हटले होते.

सुकेश रोज माझ्यासोबत खोटे बोलायचा. मला तर फार उशिरा त्याच्याबद्दल कळले. त्याला अटक झाल्यानंतर त्याचा खरा चेहरा माझ्यासमोर आला. या सगळ्या कृत्यांमध्ये त्याची पार्टनर पिंकी इराणी सुद्धा सहभागी आहे. त्या दोघांनी मिळून माझे करीयर उध्वस्त केले असल्याचे जॅकलीनने तिच्या जवाबात सांगितले आहे. सध्या जॅकलीन आणि नोरा दोघांचीही ईडीकडून चौकशी सुरु आहे.

ईडी कडून सुरू असलेल्या चौकशीमध्ये जॅकलीन फर्नांडिस म्हणाली, सुकेश मला दिवसातून चार-पाच वेळा व्हिडिओ कॉल करायचा. एवढेच नाही तर रात्री केव्हाही कॉल करून माझ्याशी बोलत असल्याचं जॅकलीन म्हणाली. सुकेशला अटक झाल्यानंतर जॅकलीन फर्नांडिस खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली होती. जॅकलीन फर्नांडिस पैशासाठी सुकेश सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची टीका तिला सहन करावी लागली होती.

हे देखील वाचा Amruta fadnavis: मुस्लिम मुलासोबत नवीन करिअर सुरू करणं अमृता फडणवीसांना चांगलंच भोवलं; पाहा काय झालं..

Alia bhatt pregnant: मुलीच्या जन्मानंतर दोन महिन्यांतच आलिया पुन्हा प्रेग्नंट; पोस्ट करून स्वतः दिली माहिती..

IND vs NZ: द्विशतकानंतरही तुला संधी का मिळाली नाही? इशान किशनच्या उत्तराने रोहित शर्माची बोलतीच बंद; पाहा व्हिडिओ..

Malaika Arora: मलायका माझ्या आयुष्यात आल्यामुळे आता मला रोज रात्री..,’; अर्जन कपूरचे खळबळजनक विधान..

Relationship tips: महिलांच्या या पाच अवयवांकडे पुरुष होतात सर्वाधिक आकर्षित; पाचवा आहे खूपच रंजक..

Marriage Tips: लग्नापूर्वी दोघांनाही या गोष्टी माहिती असायला हव्याच, अन्यथा महिन्यात तुटू शकतं नातं..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.