Gautami Patil: गौतमी पाटील बाबतची ही गोष्ट जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

0

Gautami Patil: गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव आता सगळ्यांनाच परिचित आहे. गौतमीची लावणी (Gautami Patil lavani) आणि तिच्या मनमोहक अदांनी संपूर्ण महाराष्ट्रालाच वेड लावले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. (Gautami Patil dance show) तरुणांवर तर गौतमीने मोठी छाप पाडली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुण गौतमीच्या कार्यक्रमांना गर्दी करतात. आता तर अशी परिस्थिती आहे, जिथे गौतमीचा कार्यक्रम तिथे पोलिस सुरक्षा तैनात करावीच लागते. मात्र अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या गौतमी पाटील बाबतची ही गोष्ट जाणून घेतल्यास तुम्हाला धक्का बसेल.

मध्यंतरी गौतमी पाटीलवर प्रचंड टीका झाली होती. लावणीच्या नावाखाली अश्लिलतेचे प्रदर्शन करत असल्याचा आरोप गौतमीवर झाला होता. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. लावणी करताना अश्लील हावभाव करुन सार्वजनिक ठिकाणी अश्लीलतेचे प्रदर्शन करत असल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला होता. सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात हे प्रकार चालणार नाही, असे म्हणत तिच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागनी सुद्धा अनेक संघटनांनी केली होती.

गौतमी पाटीलच्या नृत्यातील तिच्या हावभावावरुन संपूर्ण महाराष्ट्रात तिच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात होती. अशावेळी स्वत: गौतमी पाटीलने समोर येत पत्रकार परिषद घेतली. आणि पत्रकार परिषदेत तिने तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल सांगितले. यादरम्यान तिने एक मोठा खुलासा केला होता.

गौतमी पाटीलचे मुळ गाव धुळे जिल्ह्यातील आहे. तिच्या आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना तिला करावा लागला. गौतमीचा जन्म होण्याअगोदरच तिचे आई-वडिल वेगळे झाले होते. गौतमीची आई नऊ महिन्याची गरोदर असताना तिच्या वडिलाने तिच्या आईला सोडून दिले. गौतमीच्या आईने मात्र हार न मानता गौतमीला मोठे करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मिळेल ते काम करत गौतमीची आई तिला शिकवत होती. परंतू एक दिवस अचानक गौतमीच्या आईचा अपघात झाला आणि त्यांना काम करणे अशक्य झाले.

आईचा अपघात झाल्यामुळे गौतमीला तिचे शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागले. परिस्थिती हलाखीची असल्यामुळे गौतमीने ऑर्केस्ट्रामध्ये काम करण्यास सुरुवात केली. महेंद्र बनसुळे यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये ती कामाला होती. यादरम्यानच गौतमीने लावणीचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि काही दिवसातच ती लावणी करण्यात परिपूर्ण झाली.

लावणीचे पूर्ण शिक्षण घेताच गौतमीने बॅक डान्सर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. अकलूज डान्स महोत्सवात तिने पहिल्यांदा बॅक डान्सर म्हणून काम केल होतं. या कामाचे तिला ५०० रुपये मिळाले होते. यानंतर गौतमीने तिच्या करिअरमध्ये प्रचंड वेगाने वाटचाल केली. अल्पावधीतच ती प्रसिद्ध झाली. आता गौतमी पाटील एका कार्यक्रमाचे दीड ते दोन लाख रुपये मानधन घेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गौतमीच्या मानधनाचा हा आकडा ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हे देखील वाचा Amruta fadnavis: मुस्लिम मुलासोबत नवीन करिअर सुरू करणं अमृता फडणवीसांना चांगलंच भोवलं; पाहा काय झालं..

Viral Video: भर रस्त्यावरच तरुणी आली खळीला; बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसून करू लागली घाणेरडा खेळ, पाहा व्हिडिओ..

Wrestling Protest: खेळाडूंच्या रूम समोर रूम घेऊन, दरवाजा उघडा ठेऊन बृजभूषण सिंह करायचा हा घाणेरडे कृत्य..

Age for marriage: लग्न करण्याचे योग्य वय जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

digital voter ID: आता घरबसल्या मोबाईलवर डाउनलोड करता येणार डिजिटल मतदार ओळखपत्र; जाणून घ्या प्रोसेस .. 

Money laundering case: जॅकलीन, नोरा कशा अडकल्या सुकेशच्या जाळ्यात? जॅकलीनला तर रात्रीत चार वेळा..

Chanakya Niti: तुमच्यामध्ये हे चार गुण असतील तर अफाट कष्ट करूनही मिळणार नाही यश..

Electric bike: केवळ इतक्या पैशात आता पेट्रोलच्या टू-व्हीलरला करता येणार ईलेट्रीक बाईक; जाणून घ्या सविस्तर..

Relationship tips: महिलांच्या या पाच अवयवांकडे पुरुष होतात सर्वाधिक आकर्षित; पाचवा आहे खूपच रंजक..

Age for marriage: लग्न करण्याचे योग्य वय जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.