Pankaja Munde: देवेंद्र फडणवीसच पंकजाताईंना बदनाम करत आहेत? बावनकुळेंच्या विधानाने खळबळ; पाहा व्हिडिओ..
Pankaja Munde: भारतीय जनता पार्टी (BJP) पंकजा मुंडे (pankaja munde) यांना डावलत असल्याच्या चर्चा केल्या दोन वर्षापासून सातत्याने होताना पाहायला मिळतात. अनेक कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी मी अजिबात नाराज नसल्याचं सांगून देखील त्यांची नाराजी लपून राहिलेली नाही. काल पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या नाराजीची चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाजपचाच एक गट पंकजा ताईंना बदनाम करत असल्याचे विधान केल्याने खळबळ उडाली आहे.
बीडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमा नंतर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांना बदनाम करणारा एक गट भाजपमध्येच असल्याचं खळबळजनक विधान केल्याने या विधानाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. बावनकुळे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला असून, याविषयी संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पंकजा मुंडे यांना देवेंद्र फडणवीस वेळोवेळी डावलत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर अनेकदा रंगत असतात. पंकजा मुंडे देखील देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या कार्यक्रमाला अनेकदा अनुपस्थित राहिल्याने या चर्चांना खतपाणी मिळत असल्याचं पाहायला मिळते.
एकीकडे देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे यांना डावलत असल्याच्या चर्चा वारंवार होतात. त्यातच बावनकुळे यांच्या या विधानाने पुन्हा एकदा मीडियावर देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल केले जात आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अप्रत्यक्ष पंकजा मुंडे यांची बदनामी देवेंद्र फडणवीसच करत असल्याचं सोशल मीडियावर आता बोलले जात आहे. देवेंद्र फडणवीस ताकतवर नेते असल्याने त्यांचं नाव चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट घेतलं नसलं तरी त्यांचा रोख हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडेचआहे. असं देखील आता सोशल मीडियावर बोलले जाऊ लागलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. एवढेच नाही तर पंकजा मुंडे लवकरच उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या देखील बातम्या आल्या होत्या. मात्र बीडमध्ये झालेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी मी अजिबात नाराज नसल्याचं म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे राजाच्या अंगावर फाटकी कपडे असली तरी देखील त्याची चमक कोणीही रोखू शकत नाही असं देखील त्या म्हणाल्या वेगळी चर्चा रंगली होती.
बावनकुळे का म्हणाले असं..
पक्षातलाच एक गट पंकजाताईची बदनामी करत आहे. बावनकुळे असं म्हणण्याचं कारण म्हणजे, बावनकुळे यांच्या अगोदर पंकजाताई बोलण्यासाठी स्टेजवर उभा राहिल्या होत्या. तुमच्या अगोदर मला बोलू द्या मी दोन मिनिटात पूर्ण करते. असं पंकजाताई बावनकुळे यांना म्हणाल्या. मात्र बावनकुळे नाही म्हणाले. बावनकुळे यांची हीच क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली.
सोशल मीडियावर व्हायरस झालेल्या या क्लिपवर स्पष्टीकरण देताना बावनकुळे म्हणाले, पंकजाताई या राष्ट्रीय नेते आहेत. आणि म्हणून माझ्या नंतर त्यांना बोलण्याचा मान मी द्यावा असा या मागचा आशय होता. मात्र हा व्हिडिओ छेडछाड करून मी त्यांना नाही म्हणालो. एवढाच व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. आणि म्हणून पक्षातीलच एक गट पंकजा मुंडे आणि पक्षाची बदनामी करत असल्याचं बावनकुळे म्हणाले.
हे देखील वाचा IND vs NZ: सामन्यापूर्वी हे पदार्थ खातात भारतीय खेळाडू; जाणून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडिओ..
Women Like Condom: महिलांना हा कंडोम आवडतो सर्वाधिक; लैंगिक संबंधा दरम्यान देतो जास्त आनंद..
Sikandar Shaikh: मोठा निर्णय! सिकंदर वरील अन्यायामुळे पुन्हा रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार..
Rishabh Pant: क्रिकेट विश्वात खळबळ, ऋषभ पंतवर हे काय बोलून गेला रिकी पाँटिंग..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम