IND vs NZ: सामन्यापूर्वी हे पदार्थ खातात भारतीय खेळाडू; जाणून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडिओ..

0

IND vs NZ: भारतीय क्रिकेट संघातील (Indian cricket team) प्रत्येक खेळाडूंचे लाखोंच्या घरात चाहते आहेत. मैदनावरील खेळासोबतच त्यांच्या वैयक्तिक जीवनातील काही गोष्टी जाणून घेण्यासाठी देखील चाहते प्रचंड उत्सुक असतात. खेळाडूंच्या फिटनेस, डायट अशा वयक्तिक गोष्टींविषयी सुद्धा अनेकांना उत्सुकता लागलेली असते. पण काही प्रोटोकॉलमुळे खेळाडूंना काही गोष्टी जाहीर करता येत नाहीत. मात्र आता भारतीय खेळाडू नेमके काय खातात? याविषयी संपूर्ण माहिती आता समोर आली आहे.

भारतीय संघ सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. विजयाची घोडदौड सुरु आहे. प्रत्येक खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. मात्र त्याचवेळी हा फॉर्म एकदिवसीय वर्ल्डकप पर्यंत अशाच कायम रहावा अशी मिश्कील टिप्पणी सुद्धा केली जात आहे. भारतीय संघाचा हा फॉर्म असाच कायम राहणार की आयसीसी स्पर्धेत पुन्हा एकदा भारतीय संघ आपल्या नांग्या टाकणार हे विश्वचषक स्पर्धेतच स्पष्ट होईल. मात्र सद्या तरी भारतीय संघ कमालीचा फॉर्ममध्ये आहे.

जवळपास भारतीय संघातील सर्वच खेळाडू जबरदस्त कामगिरी करत आहेत. यातच आता भारतीय खेळाडू काय खातात याविषयीची उत्सुकता अखेर संपली आहे. भारतीय खेळाडू नेमका कोणता डायट घेतात? तसेच सामन्यापूर्वी त्यांना काय खायला दिले जाते? ही माहिती उघड झाली आहे. एका व्हिडिओतून ही माहिती समोर आली आहे. भारतीय संघाच्या ड्रेसींग रुममधील हा व्हिडिओ असून, भारताचा लेग स्पिनर युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) दाखवलेल्या व्हिडिओत किचनचा देखील सहभाग आहे. सामन्या अगोदर खेळाडू नेमके काय खातात खायला? हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट झालं आहे.

सध्या भारत विरुद्ध न्यझीलंड (IND vs NZ) एकदिवसीय मालिका सुरु आहे. रायपूरच्या (Raipur) शहीद वीर नारायण सिंह मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वीचा हा व्हिडिओ आहे. भारतीय संघ‍ाच्या ड्रेसींग रुम (dressing room) आणि किचनचा हा व्हिडिओ काढण्यात आला आहे. (Kitchen and dressing room video) ज्यामध्ये भारतीय खेळाडूंना सामन्यापूर्वी खायला दिले जाणारे सर्व पदार्थ दाखवण्यात आले आहेत. भारतीय खेळाडू या पदार्थांचे तोंडभरून कौतूक करत असल्याचे सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

खेळाडूंना सहसा पोषक घटक असणारे पदार्थच खायला दिले जातात. जेणेकरुन त्यांच्या शरीरातील उर्जा टिकून राहील. जसे की उकळलेल्या भाज्या, मास, फळे मात्र या व्हिडिओमध्ये तर खेळाडूंना वेगळेच पदार्थ दिले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये नान, स्टीम राईस, जिरा राईस, दाल, चायनीज, पास्ता इन मिक्स सॉस, टमाटर पनीर सारख्या चविष्ट आणि मसालेदार पदार्थांचा समावेश आहे.

भारताचा लेग स्पिनर चलने आपल्या चहल टीव्हीच्या माध्यमातून भारतीय ड्रेसिंग रूम मधील वातावरण कसं असतं हे एक व्हिडिओ काढत सांगितले आहे. युजवेंद्र चहलने एका व्हिडिओमध्ये वॉक थ्रू करताना ड्रेसिंग रूम आणि किचन मधील सर्व पदार्थ कसे असतात, हे देखील दाखवून देत या पदार्थांविषयी सविस्तर सांगितले आहे. रविंद्र चहल व्हिडिओच्या माध्यमातून ड्रेसिंग रूम आणि किचन विषयी माहिती देत असताना भारताचे कर्णधार रोहित शर्मा ने देखी चहलला चांगलाच टोमणा मारला आहे.

यजुवेंद्र चहलचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. भारतीय संघाचा फॉर्म परत येण्यामागचे कारण असे कॅप्शन देत नेटकर्‍यांकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे. यजुवेंद्र चहलने हा व्हिडिओ शुट केला असून, व्हेज पास्ता त्याला सर्वाधिक आवडला असल्याचे त्याने या व्हिडिओत सांगितले आहे. मात्र खेळाडूंनी सामन्या अगोदर असे पदार्थ खाण्यावरुन नेतकर्यांच्या यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत.

रोहित म्हणाला, तुझे भविष्य चांगले आहे

चहल टीव्हीच्या माध्यमातून चहल चाहत्यांना ड्रेसिंग रूम आणि किचन विषयी माहिती देत असताना अचानक रोहित शर्मा या व्हिडिओत येतो. चहल किचन विषयी माहिती देत असताना रोहित शर्मा त्याला म्हणतो, तुझं भविष्य चांगलं आहे. यावरून देखील रोहित शर्मा सोशल मीडियावर ट्रोल झाल्याचं पाहिला मिळत आहे. याचा अर्थ चहलला आता अंतिम 11 मध्ये संधी मिळणार नसल्याचे रोहित शर्माने अप्रत्यक्ष सांगितले आहे. असं देखील बोललं जात आहे.

हे देखील वाचा Rohit Sharma: सगळ्यांना चकवून बारक्याची रोहित शर्माला कडकडून मिठी; सिक्यूरीटीला विनंती करत रोहीत म्हणाला..

Rishabh Pant: क्रिकेट विश्वात खळबळ, ऋषभ पंतवर हे काय बोलून गेला रिकी पाँटिंग..

SSC recruitment 2023: स्टाफ सिलेक्शन विभागात या उमेदवारांसाठी 11 हजाराहून अधिक पदांची मेगा भरती; जाणून घ्या डिटेल्स..

KL Rahul Wedding: शाहरुख, विराटसह हे दिग्गज उपस्थिती; अशी आहे जय्यत तयारी, जाणून घ्या कुठे आणि किती वाजता होणार लग्न..

Couple Blood Group: लग्नापूर्वी रक्तगट माहीत असायलाच हवा; रक्तगट सारखाच असेल तर? जाणून घ्या सविस्तर..

Sikandar Shaikh: मोठा निर्णय! सिकंदर वरील अन्यायामुळे पुन्हा रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार..

Woman Needs: स्त्रियांना पुरुषाकडून असतात या अपेक्षा; स्त्रियांवर छाप पाडायची असेल या गोष्टी तुमच्याकडे हव्याच..

Women Like Condom: महिलांना हा कंडोम आवडतो सर्वाधिक; लैंगिक संबंधा दरम्यान देतो जास्त आनंद..

Kissing Tips: पहिलं kiss चुकलं तर होईल सत्यानाश; जाणून घ्या पहिल्यांदा किस करताना कोणती काळजी घ्यायची..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.