SSC recruitment 2023: स्टाफ सिलेक्शन विभागात या उमेदवारांसाठी 11 हजाराहून अधिक पदांची मेगा भरती; जाणून घ्या डिटेल्स..
SSC recruitment 2023: स्टाफ सिलेक्शन कमिशन (ssc) अंतर्गत बंपर भरती काढण्यात आली आहे. दरवर्षी स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत पदभरती काढण्यात येत असते. मात्र यावर्षी या भरती अंतर्गत मोठ्या प्रमाणात जागा भरल्या जाणार आहेत. सरकारी नोकरीची (government job) इच्छा असणारे अनेक विद्यार्थी स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत घेतल्या जाणार्या नोकर भरतीच्या नोटिफिकेशनची वाट बघत असतात. अशातच स्टाफ सिलेक्शन कमिशनच्यावतीने नुकतीच अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
सध्या रोजगाराचा (unemployment) फार गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. खाजगी नोकरी बिनभरवशाची झाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुण आता सरकारी नोकरीकडे (sarkari Naukri) वळले आहेत. स्टाफ सिलेक्शन कमीशन अंतर्गत घेण्यात येणार्या या भरतीत एकूण 11,409 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणार्या तरुणांसाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार दोन पदांसाठी ही भरती घेतली जात आहे. ज्यामध्ये 11,409 तरुणांना संधी मिळणार आहे.
पदानुसार पात्रता व निकष ठरवून देण्यात आलेले आहेत. त्यामुळे पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 17 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे या तारखेपर्यंत आलेले अर्जच स्विकारले जातील. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत घेण्यात येणार्या या मेगा भरतीसाठी नेमकी कोणकोणती पदे भरली जाणार आहेत? तसेच त्यासाठी काय पात्रता निकष ठरवून देण्यात आले आहेत? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.
मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल ) या पदासाठी एकुण 10,880 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठीची शैक्षणिक पात्रता केवळ १० उत्तीर्ण ठेवण्यात आली आहे. त्यामुळे १० वी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी सुद्धा या पदासाठी अर्ज करु शकतात. तसेच या पदासाठी 18 ते 25 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांनाच अर्ज करता येणार आहे.
स्टाफ सिलेक्शनच्या या मेगाभरती अंतर्गत भरले जाणारे दुसरे पद हवालदाराचे आहे. हवालदार या पदासाठी 529 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या पदासाठीची शैक्षणिक पात्रता १० वी उत्तीर्णच ठेवण्यात आली आहे. तसेच या पदासाठी 18 ते 27 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. सरकारी नियमानुसार उमेदवारांना वयोमर्यादित सूट दिली जाणार आहे. ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्ष अतिरिक्त, तर एससी आणि एसटी उमेदवारांसाठी पाच वर्ष अतिरिक्त सूट दिली जाणार आहे.
अशी असेल निवड प्रक्रिया
अर्ज करणार्या परीक्षार्थींचीच ऑनलाईन परीक्षा होईल. ही परीक्षा संगणक आधारित चाचणीवर असणार आहे. हवालदार पदासाठी मात्र परिक्षेनंतर शारिरीक कार्यक्षमता चाचणी सुद्धा घेण्यात येणार आहे. या चाचणीमध्ये पुरुष उमेदवारांना 15 मिनीटात 1600 मीटरपर्यंत धावणे आवश्यक आहे.
तसेच महिला उमेदवारांना 20 मिनीटांत 1600 मीटर पूर्ण करावे लागणार आहे. काही महत्वाचे बदल सुद्धा या भरतीत करण्यात आले आहेत. ज्यामध्ये MTS पदासाठी आता केवळ एकच चाचणी होणार आहे. संगणक निवड चाचणी अंतर्गत केवळ एकच पेपर उमेदवारांना सोडवावा लागेल. 270 गुणांचा हा पेपर असणार आहे. ज्यामध्ये 90 प्रश्न असतील. तसेच या पेपरची दोन भागात विभागणी केली जाईल.
परीक्षा फी/ नोकरीचे ठिकाण
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरण्यात येणाऱ्या या रिक्त जगण्यासाठी ओपन आणि ओबीसी उमेदवारांना शंभर रुपये फी आकारण्यात येणार आहे. पीडब्ल्यूडी कर्मचारी आणि एससी एसटी उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांना भारतात कुठेही नोकरी करावी लागणार आहे.
असा करा ऑनलाईन अर्ज
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरण्यात येणाऱ्या या रिक्त जगण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन http://ssc.nic.in/ असं सर्च करायचं आहे. यांनतर तुमच्या समोर स्टाफ सिलेक्शन कमिशन विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन झालेली असेल. खाली स्क्रोल केल्यानंर तुम्ही सविस्तर अर्ज करू शकता. जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा
हे देखील वाचा KL Rahul Wedding: शाहरुख, विराटसह हे दिग्गज उपस्थिती; अशी आहे जय्यत तयारी, जाणून घ्या कुठे आणि किती वाजता होणार लग्न..
Women Like Condom: महिलांना हा कंडोम आवडतो सर्वाधिक; लैंगिक संबंधा दरम्यान देतो जास्त आनंद..
Sikandar Shaikh: मोठा निर्णय! सिकंदर वरील अन्यायामुळे पुन्हा रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार..
Rishabh Pant: क्रिकेट विश्वात खळबळ, ऋषभ पंतवर हे काय बोलून गेला रिकी पाँटिंग..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम