Rohit Sharma: सगळ्यांना चकवून बारक्याची रोहित शर्माला कडकडून मिठी; सिक्यूरीटीला विनंती करत रोहीत म्हणाला..

0

Rohit Sharma: भारतामध्ये क्रिकेट हा खेळ कमालीचा लोकप्रिय झाला आहे. आपल्या आवडत्या खेळाडूंना भेटण्यासाठी असंख्य चाहते प्रयत्न करत असतात. आपल्या आवडत्या खेळाडूंना भेटण्यासाठी चाहते काहीही करू शकतात. हे आपल्यासाठी नवीन नाही. सामना सुरू असताना अनेक चाहते थेट मैदानात धाव घेत खेळाडूंना मिठी मारण्याचा प्रयत्न करत असतात. हा प्रकार भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) सोबत अनेकदा घडला आहे. आज पुन्हा एकदा हा प्रकार रोहित शर्मा (Rohit Sharma) फलंदाजी करत असताना घडला. (IND vs NZ)

न्यूझीलंड विरुद्ध सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील दुसरा सामना (IND vs NZ 2nd ODI) आज रायपूर (raipur) मधील शहीद वीर नारायण सिंग इंटरनॅशनल क्रिकेट मैदानावर पर पडला. (Shahid Veer Narayan Singh cricket ground) या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंड फलंदाजांच्या नांग्या ठेचत केवळ 108 धावांत गारद केले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने हे आव्हान केवळ 20.1 षटकात 2 गड्याच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 50 चेंडूत 51 धावांची खेळी केली.

कर्णधार रोहित शर्माला सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) देखील चांगली साथ देत नाबाद 53 चेंडू 40 धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत भारताने 2-0 अशी विजयी आघाडी घेत मालिका आपल्या नावावर केली. मात्र दुसरीकडे मालिका विजयापेक्षा सर्वाधिक चर्चा झाली ती रोहित शर्मा फलंदाजी करत असताना त्याच्या चाहत्याने मैदानावर धाव घेत कडकडून मारलेल्या मिठीची.

भारताची दुसरी इनिंग सुरू असताना रोहित शर्मा फलंदाजी करत होता. याच दरम्यान रोहित शर्माच्या एका चिमुकल्या चाहत्याने थेट मैदानात धाव घेतली. मैदानावर धाव घेतल्यानंतर, त्याच्या पाठीमागे सिक्युरिटी गार्ड (security guard) देखील धावत सुटले. मात्र हा बेरक्या प्रचंड वेगात होता. सिक्युरिटीला चकवून रोहित शर्माचा थेट जवळ पोहचला. रोहित शर्माला देखील काही काळायच्या आत चिमुकल्या चाहत्याने रोहित शर्माला कडकडून मिठी मारली.

चिमुकल्या चाहत्याने रोहित शर्माला मिठी मारल्यानंतर, पाठीमागेच असणाऱ्या सिक्युरिटी गार्डने चिमुकल्याच्या अंगावर झेप घेत रोहित शर्माच्या चाहत्याला वेगळं केलं. आपल्या चाहत्याला काही इजा होऊ नये म्हणून, रोहित शर्माने देखील सिक्युरिटी गार्डला वेवस्थित बाहेर घेऊन जाण्याची विनंती केली. रोहित शर्मा आणि त्याच्या चिमुकल्या चाहत्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ खाली अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आपल्या आवडत्या खेळाडूंना चाहते भेटण्यासाठी येत असतात. मात्र खेळाडू देखील चाहत्यांचा रिक्स्पेक्ट करतात की नाही हे फार महत्त्वाचं असतं. धोनीच्या पावलावर पाऊल ठेवत, रोहित शर्मा देखील आपल्या चाहत्यांचा सन्मान करत आहे. ही चांगली बाब असल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी रोहित शर्माचं कौतुक केले आहे.

हे देखील वाचाSSC recruitment 2023: स्टाफ सिलेक्शन विभागात या उमेदवारांसाठी 11 हजाराहून अधिक पदांची मेगा भरती; जाणून घ्या डिटेल्स..

Rishabh Pant: क्रिकेट विश्वात खळबळ, ऋषभ पंतवर हे काय बोलून गेला रिकी पाँटिंग..

KL Rahul Wedding: शाहरुख, विराटसह हे दिग्गज उपस्थिती; अशी आहे जय्यत तयारी, जाणून घ्या कुठे आणि किती वाजता होणार लग्न..

Couple Blood Group: लग्नापूर्वी रक्तगट माहीत असायलाच हवा; रक्तगट सारखाच असेल तर? जाणून घ्या सविस्तर..

Women Like Condom: महिलांना हा कंडोम आवडतो सर्वाधिक; लैंगिक संबंधा दरम्यान देतो जास्त आनंद..

Sikandar Shaikh: मोठा निर्णय! सिकंदर वरील अन्यायामुळे पुन्हा रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार..

Woman Needs: स्त्रियांना पुरुषाकडून असतात या अपेक्षा; स्त्रियांवर छाप पाडायची असेल या गोष्टी तुमच्याकडे हव्याच..

Kissing Tips: पहिलं kiss चुकलं तर होईल सत्यानाश; जाणून घ्या पहिल्यांदा किस करताना कोणती काळजी घ्यायची..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.