LIC: एलआयसी मध्ये या उमेदवारांसाठी 9400 जागांची मेगाभरती; जाणून घ्या सविस्तर..

0

LIC: महागाई (inflation) बरोबरच बेरोजगारी (unemployment) देखील मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळते. उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरी (nokari) नसल्याने अनेकजण आता दहावी बारावीनंतरच कुठे तरी चार पैशाची नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतात. असं असलं तरी आता हळूहळू अनेक विभागात नोकर भरती राबवली जात आहे. सरकारने देखील आता हालचाली सुरू केल्या आहेत. सरकार कडून आता विविध विभागात सरकारी नोकरीच्या अधिसूचना काढण्यात येत आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) या विभागात आता मोठी भरती निघाली आहे. (LIC Recruitment 2023)

भारतीय आयुर्विमा महामंडळ ( LIC) या विभागात मेगा भरती निघाली असून, या संदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांसाठी ही मोठी संधी असणार आहे. कारण या विभागात तब्बल 9,400 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळ विभागामध्ये केल्या जाणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2023 निश्चित करण्यात आली आहे.

कोणकोणत्या विभागात 9400 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत? जाणून घेऊया सविस्तर..

नॉर्थर्न झोनल ऑफिस या विभागात 1 हजार 216 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. नॉर्थ सेंट्रल झोनल ऑफिस या विभागात 1 हजार 033 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. सेंट्रल झोनल ऑफिस विभागात 561 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. ईस्ट सेंट्रल झोनल ऑफिस विभागात 1 हजार 49 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. साउथ सेंट्रल झोनल ऑफिस या विभागात 1 हजार 408 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. साउथर्न झोनल ऑफिस विभागात 1 हजार 516 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. वेस्टर्न झोनल ऑफिस या विभागात 1 हजार 942 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ईस्टर्न झोनल ऑफिस या विभागात सहशे 69 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता/ वयोमर्यादा

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या पात्रते विषयी बोलायचं झाल्यास उमेदवार हे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. सोबतच इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, मुंबई विभागाची फेलोशिप असणे देखील आवश्यक आहे. उमेदवारांच्या वयोमर्यादेचा विचार करायचा झाल्यास उमेदवारांचे वय 1 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्ष असणे आवश्यक आहे. एससी/एसटी उमेदवारांना 5 वर्ष आणि ओबीसी उमेदवारांना 3 वर्ष अतिरिक्त सूट देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया/ नोकरीचे ठिकाण/ परीक्षेची वेळ

भारतीय आयुर्विमा महामंडळ विभागात उमेदवारांची निवड ही प्राथमिक, मुख्य आणि मुलाखत अशा प्रकारातून केली जाणार आहे. निवडणुकीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना प्रवेशपत्र 4 मार्च 2023 पासून देण्यात येणार आहे. पूर्ण परिक्षा 12 मार्च तर मुख्य परीक्षा 8 मार्च निश्चित करण्यात आली आहे. अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी यावर क्लिक करा. जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा

हे देखील वाचा MPSC: MPSC च्या 8 हजाराहून अधिक जागांची मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Belly fat: पोट सुटण्याची ही आहेत प्रमुख करणे; जाणून घ्या पोट कमी करण्याचे उपाय..

Pankaja Munde: देवेंद्र फडणवीसच पंकजाताईंना बदनाम करत आहेत? बावनकुळेंच्या विधानाने खळबळ; पाहा व्हिडिओ..

IND vs NZ: सामन्यापूर्वी हे पदार्थ खातात भारतीय खेळाडू; जाणून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडिओ..

Kissing Tips: पहिलं kiss चुकलं तर होईल सत्यानाश; जाणून घ्या पहिल्यांदा किस करताना कोणती काळजी घ्यायची..

SSC recruitment 2023: स्टाफ सिलेक्शन विभागात या उमेदवारांसाठी 11 हजाराहून अधिक पदांची मेगा भरती; जाणून घ्या डिटेल्स..

Women Like Condom: महिलांना हा कंडोम आवडतो सर्वाधिक; लैंगिक संबंधा दरम्यान देतो जास्त आनंद..

Woman Needs: स्त्रियांना पुरुषाकडून असतात या अपेक्षा; स्त्रियांवर छाप पाडायची असेल या गोष्टी तुमच्याकडे हव्याच..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.