Belly fat: पोट सुटण्याची ही आहेत प्रमुख करणे; जाणून घ्या पोट कमी करण्याचे उपाय..

0

Belly fat: बहुतांश लोक पोट सुटण्याच्या समस्येने त्रासलेले आहेत. (Weight loss) तरुणांमध्ये सुद्धा ही समस्या पाहायला मिळते. कमी वय असून, सुद्धा अनेकांचे पोट सुटत असल्यामुळे अनेकजण वयस्कर दिसू लागतात. पोट सुटल्यामुळे शरीराच्या हालचालीवर सुद्धा त्याचा परिणाम जाणवायला लागतो. याशिवाय पोट सुटल्यामुळे शरीराशी संबंधित इतरही आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोट कमी करण्यासाठी अनेकजण विविध प्रयत्न करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मात्र अचानक ही पोट सुटण्याची समस्या नेमकी उद्भवते कशामुळे हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे.

आजच्या धावपळीच्या युगात शरीराकडे आपले पूर्णत: दुर्लक्ष होते. (Healthy lifestyle) त्यामुळे तरुण वयातच विविध आजार होत असल्याचे चित्र आहे. मात्र आरोग्याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. शरीराला निरोगी ठेवायचे असल्यास आपला आहार फार महत्वाची भूमिका बजावतो. परंतू आहाराकडे सुद्धा आपण दुर्लक्ष केले आहे. चुकीच्या आहार पद्धतींमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते. त्यापैकीच एक पोट सुटण्याची समस्या सुद्धा आहे. आहारात सातत्याने चुकीच्या पदार्थांचा समावेश असल्यास शरीराच्या कंबरेतील चरबी वाढू लागते. कालंतराने पोटाजवळची चरबी सुद्धा वाढते आणि पोट सुटण्याची समस्या निर्माण होते.

पोट सुटण्याच्या समस्येपासून सुटका करण्यासाठी लोकं विविध प्रयत्न करतात. चालणे, व्यायाम करणे, जिमला जाणे यामुळे पोटावरची चरबी कमी होते. पण केवळ व्यायामाने या समस्येपासून सुटका होऊ शकत नाही. सुटलेले पोट कमी करण्यासाठी काही पदार्थांना तुमच्या आहारातून हद्दपार करणे जरुरी आहे. त्यामुळे नेमके असे कोणते पदार्थ आहेत ज्यांना तुम्ही टाळले पाहिजे. जाणून घेऊया सविस्तर.

अनेकांना सकाळी उठल्यानंतर गरम कॉफी किंवा चहा पिण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्यासाठी हानिकारक ठरु शकते. चहा आणि कॉफीमध्ये साखरेचे प्रमाण सर्वाधिक असते. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्यास शरीरावर त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. तसेच अनेकांना क्रीम कॉफी पिण्याची सवय असते. मात्र साखर आणि क्रीम तुमचे वजन वाढवण्यास कारणीभूत ठरु शकते. त्यामुळे कंबरेच्या व पोटाच्या जागेची चरबी वाढू लागते. परिणामी पोट सुटू लागते.

नाश्त्यातील हा पदार्थ सर्वात धोकादायक

सकाळी नाश्त्यामध्ये आपण काय खातो? हे फार महत्वाचे असते. सकाळच्या नाश्त्या मधून काही पोषक घटक आपल्या शरीरात जाणे गरजेचे आहे. परंतू जे बनवण्यास सहज आणि सोपे आहे. पुष्कळदा अशा पदार्थांनाचा नाश्त्यामध्ये समावेश केला जातो. जसे की ब्रेड बटर सारखे काही पदार्थ. मात्र अशा पदार्थांमुळे तुम्ही वजन वाढण्याबरोबरच आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण करता. ब्रेड बटरमध्ये रिफाईन्ड कार्ब्जचे प्रमाण सर्वाधिक असते. जे वजन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरते.

शरीरामध्ये आहारात मोठ्या प्रमाणात जंक फूडचा समावेश केला जातो. रस्त्यावर विक्रीसाठी असणारे, सहज उपलब्ध होणारे हे पदार्थ आपल्याला आकर्षित करत असतात. मात्र या पदार्थांमुळे तुमचे केवळ नुकसानच होते. अनेक पदार्थांना पुन्हा-पुन्हा त्याच तेलामध्ये तळल्याने त्यामध्ये फॅटचे प्रमाण वाढते. तसेच जंक फूडमध्ये कॉलेस्ट्रॉलची मात्रा सुद्धा जास्त असते. त्यामुळे शरीरावरील चरबी वाढण्यासोबत इतरही गंभीर आजार होऊ शकतात. जंक फूडचे सतत सेवन केल्यास हृदयाशी संबंधित गंभीर आजार सुद्धा तुम्हाला होऊ शकतात.

हे देखील वाचा  Pankaja Munde: देवेंद्र फडणवीसच पंकजाताईंना बदनाम करत आहेत? बावनकुळेंच्या विधानाने खळबळ; पाहा व्हिडिओ..

IND vs NZ: सामन्यापूर्वी हे पदार्थ खातात भारतीय खेळाडू; जाणून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडिओ..

Rohit Sharma: सगळ्यांना चकवून बारक्याची रोहित शर्माला कडकडून मिठी; सिक्यूरीटीला विनंती करत रोहीत म्हणाला..

SSC recruitment 2023: स्टाफ सिलेक्शन विभागात या उमेदवारांसाठी 11 हजाराहून अधिक पदांची मेगा भरती; जाणून घ्या डिटेल्स..

KL Rahul Wedding: शाहरुख, विराटसह हे दिग्गज उपस्थिती; अशी आहे जय्यत तयारी, जाणून घ्या कुठे आणि किती वाजता होणार लग्न..

Couple Blood Group: लग्नापूर्वी रक्तगट माहीत असायलाच हवा; रक्तगट सारखाच असेल तर? जाणून घ्या सविस्तर..

Women Like Condom: महिलांना हा कंडोम आवडतो सर्वाधिक; लैंगिक संबंधा दरम्यान देतो जास्त आनंद..

Sikandar Shaikh: मोठा निर्णय! सिकंदर वरील अन्यायामुळे पुन्हा रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार..

Woman Needs: स्त्रियांना पुरुषाकडून असतात या अपेक्षा; स्त्रियांवर छाप पाडायची असेल या गोष्टी तुमच्याकडे हव्याच..

Kissing Tips: पहिलं kiss चुकलं तर होईल सत्यानाश; जाणून घ्या पहिल्यांदा किस करताना कोणती काळजी घ्यायची..

Rishabh Pant: क्रिकेट विश्वात खळबळ, ऋषभ पंतवर हे काय बोलून गेला रिकी पाँटिंग..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.