MPSC: MPSC च्या 8 हजाराहून अधिक जागांची मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

0

MPSC: पुष्कळ जण लहाणपणीच सरकारी अधिकारीऱ्याचे (Government officer) स्वप्न उराशी बाळगतात. त्यामुळे शालेय शिक्षण झाल्यानंतर ते लगेच स्पर्धा परिक्षांचा अभ्यास सुरु करतात. खेडेगावातील लाखो विद्यार्थी शहरांमध्ये स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करताना पाहायला मिळतात. गेल्या काही वर्षापासून मोठी नोकर भरती झाली नसल्याने लाखो विद्यार्थी नोकर भरतीच्या जाहिरातीची वाट पाहत आहेत. (MPSC Recruitment 2023)

कोरोनाचे कारण पुढे करत असंख्य विद्यार्थ्याना नियुक्तीसाठी तात्कळत ठेवण्यात आल्याचे पाहायला मिळत होते. अशावेळी वर्षानुवर्षे मेहनतीने अभ्यास करणार्‍या युवकांनाही मोठ्या नुकसानीला समोर जावे लागले. मात्र आता सरकारने एक मोठा निर्णय जाहीर करत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध पदांसाठी 8169. रिक्त जागा भरल्या जाणार असल्याची अधिसुचना आयोगामार्फत जारी करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ऊत्साहाचे वातावारण आहे. उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले असून २५ जानेवारीपासून अर्ज करता येणार आहे. तसेच १४ फेबृबारी २०२३ अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या मेगाभरतीत नेमक्या कोणत्या पदासाठी किती जागा आहेत? तसेच पात्रता निकष काय आहे. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.

कोणत्या पदासाठी किती जागा

सहायक कक्ष अधिकारी या पदासाठी एकूण – 78 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. राज्यकर निरीक्षक या पदासाठी 159 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. पोलिस उपनिरीक्षक या पदासाठी 374 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. दुय्यम निबंधक आणि मुद्रांक निरीक्षक या पदासाठी 49 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क (गृह) या पदासाठी 6 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. तांत्रिक सहायक गट-क (वित्त) या पदासाठी 1 जागा, कर सहाय्यक, गट – क (वित्त) या पदासाठी एकूण 468 रिक्त पदे, लिपीक टंकलेखक या पदासाठी 7034 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता/ आणि वयोमर्यादा

कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. पदवी परीक्षांसाठी बसलेले उमेदवार संयूक्त पूर्व परिक्षेस पात्र होतील. परंतु पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्याची जी तारीख आहे, त्या तारखेच्या आतमध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

शारीरिक पात्रता

पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी उमेदवारांची शारीरिक पात्रता जाणून घ्यायचे झाल्यास पुरुषांसाठी १६५ सेंमी उंची असणे आवश्यक आहे. न फुगिवता छाती 79 सेंमी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर फुगवल्या नंतर 84 सेंमी असणे आवश्यक आहे. महिलांसाठी उंचीची मर्यादा 157 सेंमी असणे आवश्यक आहे.

पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी उमेदवारांचे वय एक मे 2023 रोजी 31 वर्ष असणे आवश्यक आहे. तर इतर पदासाठी ही मर्यादा 38 करण्यात आली आहे. कॅटेगरीच्या उमेदवारांना सरकारी नियमानुसार पाच वर्षापर्यंत सूट दिली जाणार आहे. उमेदवारांना मराठी आणि इंग्रजी टायपिंग येणे आवश्यक आहे. एका मिनिटांत मराठीचे मिनिटाला 30 तर इंग्रजीचे 40 शब्द इतके स्पीड आवश्यक आहे.

परिक्षेचे वेळापत्रक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्‍या परीक्षेचे वेळापत्रक सुद्धा जारी करण्यात आले आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब तसेच गट-क सेवा संयुक्त पूर्व परिक्षा ३० एप्रील २०२२ रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील एकुण ३७ जिल्हा केंद्रवार ही परीक्षा पार पडणार आहे. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेस पात्र ठरतील. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २ सप्टेंबर २०२३ ला पार पडणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा ९ सप्टेंबर २०२३ ला संपन्न होणार आहे.

मेगाभरतीसाठी MPSC मार्फत घेण्यात येणार्‍या परीक्षांची फी अधिसूचनेत देण्यात आली आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 294 तर ओपन कॅटेगरीच्या उमेदवारासाठी 394 रुपये परीक्षा फी आकारली जाणार आहे. mpsc.gov.in ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा

हे देखील वाचा Belly fat: पोट सुटण्याची ही आहेत प्रमुख करणे; जाणून घ्या पोट कमी करण्याचे उपाय..

Pankaja Munde: देवेंद्र फडणवीसच पंकजाताईंना बदनाम करत आहेत? बावनकुळेंच्या विधानाने खळबळ; पाहा व्हिडिओ..

IND vs NZ: द्विशतकानंतरही तुला संधी का मिळाली नाही? इशान किशनच्या उत्तराने रोहित शर्माची बोलतीच बंद; पाहा व्हिडिओ..

Rohit Sharma: सगळ्यांना चकवून बारक्याची रोहित शर्माला कडकडून मिठी; सिक्यूरीटीला विनंती करत रोहीत म्हणाला..

SSC recruitment 2023: स्टाफ सिलेक्शन विभागात या उमेदवारांसाठी 11 हजाराहून अधिक पदांची मेगा भरती; जाणून घ्या डिटेल्स..

KL Rahul Wedding: शाहरुख, विराटसह हे दिग्गज उपस्थिती; अशी आहे जय्यत तयारी, जाणून घ्या कुठे आणि किती वाजता होणार लग्न..

Couple Blood Group: लग्नापूर्वी रक्तगट माहीत असायलाच हवा; रक्तगट सारखाच असेल तर? जाणून घ्या सविस्तर..

Women Like Condom: महिलांना हा कंडोम आवडतो सर्वाधिक; लैंगिक संबंधा दरम्यान देतो जास्त आनंद..

Sikandar Shaikh: मोठा निर्णय! सिकंदर वरील अन्यायामुळे पुन्हा रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार..

Woman Needs: स्त्रियांना पुरुषाकडून असतात या अपेक्षा; स्त्रियांवर छाप पाडायची असेल या गोष्टी तुमच्याकडे हव्याच..

Kissing Tips: पहिलं kiss चुकलं तर होईल सत्यानाश; जाणून घ्या पहिल्यांदा किस करताना कोणती काळजी घ्यायची..

Rishabh Pant: क्रिकेट विश्वात खळबळ, ऋषभ पंतवर हे काय बोलून गेला रिकी पाँटिंग..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.